नमस्कार मित्रांनो,
मागील स्वामी वाणीत आपण बघितले की, स्वामींनी गोसाव्याला सांगितले बैरागी बुवा..तुम्हाला श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे ना..ती नक्की पूर्ण होईल..भरवसा ठेवा. स्वामी भक्तहो जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपले शरीर, मन पात्र होते तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवनात चमत्कारिकरित्या प्रगट होते. हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे आणि आपली पात्रता वाढविण्याचे कार्य स्वतः स्वामी गुरु करत असतात.
गोसाव्या जलोदराच्या व्याधीतून मुक्त केल्यानंतर गोसावी अक्कलकोटमध्येच राहू लागला. स्वामींच्या लीला आणि स्वामींची शिकवण समजावून घेऊ लागला. द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाचे सगुण दर्शन व्हावे ही इच्छा त्याच्या अंतरंगात होतीच आणि ही स्वामिकृपा ग्रहण करण्यासाठी त्या गोसाव्याचे शरीर आणि मन पात्र झालेले होते. आणि तो योग आला एके दिवशी महेंद्र गीत पांडुरंग सोनार यांनी स्वामींसाठी मोत्यांची कुंडली आणली होती.
ती त्यांनी स्वामींच्या कानात घातली त्या दिवशी भक्त मंडळींची भरपूर गर्दी झालेली होती. अनेक लोक स्वामींचे दर्शन घेत होते आणि त्या गर्दीत हा गोसावी सुद्धा आलेला होता. गोसाव्याची अनन्य भक्ती स्वामींपर्यंत पोहोचलेली होती. आणि म्हणूनच गोसाव्याला स्वामींच्या ठिकाणी एकदम श्रीकृष्णाचे रूप दिसू लागले. द्वारकानाथाची सगुण स्वरूप बघून गोसावी आनंदाने नाचूच लागला. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू येऊ लागले आणि मुखातून शब्द उमटतू लागले हे श्रीकृष्णा, हे भगवंता, हे वैकुंठाधिपती, हे द्वारकाधीशा आणि स्वामींच्या चरणी तो वारंवार लोटांगण घालू लागला.
सभोवताली जमलेले लोक सुध्दा आश्चर्यचकित झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यानंतर आणखी एक नवल घडले स्वामींच्या कानात असलेले मोत्याचे कुंडले पाषाणाची झाली. स्वामींच्या अतर्क्य लीला बघून गोसाव्यांचा विश्वास अजूनच दृढ झाला. आपली द्वारकाधीशाची दर्शनाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर स्वामीच श्रीकृष्ण आहेत हा विश्वास अधिकच दृढ झाला आणि पुढे तो अक्कलकोटमध्येच राहीला.
स्वामींच्या समाधी लीलेनंतर तो पुन्हा तीर्थयात्रेला निघून गेला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा स्वामी वाणीचा बोध खूप छान आहे. मागील स्वामी वाणीमध्ये आपण बघितले की, जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व सृष्टीला हुकूम देतात. आणि यामध्ये स्वामी महाराज स्वतः श्री गुरु रूपाचे पात्र निभावत असतात.
आपली इच्छापूर्तीसाठी ज्या ज्या न का रा त्म क गोष्टी आडवे येतात त्यांना विलीन करून त्या न का रा त्म क सवय मोडून स्वामी महाराज विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सवयींचे संस्कार आपल्या मनावर करतात. आपले कर्म म्हणजेच स्वामींची सेवा ही समज दृढ करून कर्म केल्यास नक्कीच जुन्या सवयींचा त्रास न होता स का रा त्म क सवय झोपसतो. आणि बघा जसे त्या गोसाव्याचा जलदोराचा त्रास घालून कडुलिंबाचा पाला गोड करून त्यांची श्रद्धा बळकट केली आणि यामुळे तो अक्कलकोटमध्ये राहू लागला.
स्वामींच्या सहवासात राहून त्याला अनेक शिकवण देते लीला करत त्याची भक्ती दृढ केली आणि त्याची श्रीकृष्ण दर्शनाची पात्रता तयार केली आणि चमत्कारिकरित्या अचानक एके दिवशी त्याला स्वामींनी श्रीकृष्ण रूपात दर्शन देऊन त्याची इच्छा पूर्ण केली. अगदी तसेच आपल्या सुद्धा त्यांची पूर्तता होते म्हणून स्वामी भक्तहो आजच्या लिलेतून बोध घेता आपल्याला हा दृढ विश्वास ठेवायचा आहे की, आपली कोणतीही इच्छा असुदे.
प्रापंचिक असू दे किंवा सर्वोच्च आ ध्या त्मि क असुदे. आपली इच्छापूर्ती होण्यासाठीचे सृष्टीचे नियम, कृपेचे नियम सर्वांसाठी सारखेच आहे. जसे (अ) + (ब) = (क) ह्या सूत्रात आपण अ आणि ब ची किंमत 1 ठेवा किंवा करोडोमध्ये ठेवा. या सूत्रात बेरीजच होणार अगदी तसेच स्वामींचे नियम सर्व इच्छांसाठी सारखेच आहेत. आपली इच्छा कितीही छोटी असुदे व मोठी असूदे ज्या गोष्टीसाठी आपले शरीर, मन पात्र बनते ती आपल्याला मिळतेच.
यासह आजच्या लिलेत पांडुरंग सोनार यांनी मोत्यांची कुंडले आणले होती. पण त्यांना स्वामींची श्रीकृष्ण रूपात दर्शन झाले नाही. परंतु एका दारोदार भटकणाऱ्या गोसाव्यास श्रीकृष्णाचे दर्शन झाले. म्हणून एका मोत्याचे दगडामध्ये रूपांतर करून स्वामींनी आपल्याला हेच समज दिली आहे की, स्वामींच्याजवळ जायचे असेल आपली जीवनाचे सर्वोच्च इच्छा पूर्ण करायची असेल तर भक्तीच्या श्रद्धेच्या शक्तीने शरीर-मनाची पात्रता तयार करायला हवी.
आणि पात्रता ही बाह्य दिखाव्याची बाब नसून पात्रता ही आंतरिक बाब आहे. स्वामींसाठी कोणीही मोठा नाही व छोटा नाही किंवा आज आपली परिस्थिती कशीही असू द्या याच्याशी सुद्धा स्वामींना काही देणे घेणे नाही. या भूतलावरील प्रत्येक मानवाच्या इच्छा पूर्ण होत आहेत. कृपेचा पाऊस सतत पडतो आहे आपल्याला फक्त आपल्या शरीराला, मनाला कृपा ग्रहण करण्याच्या पात्रतेचे बनवायचे आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया.
हे समर्था आम्हाला तुमच्या सेवेच्या पात्रतेचे बनवा. ह्या जीवनाला स्वामीमय करा हे जीवनच तुमची सेवा करा. जीवनातील प्रत्येक कर्माला तुमची सेवा बनवा..जर कोणी माझ्या जीवनाकडे बघितले तर त्या बघणाऱ्या व्यक्तीला फक्त तुमचीच आठवण येऊ द्या. कारण तुमचा सेवेकरी बनण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. हे आई तुम्ही माझे पिता आहात, गुरु आहात, मला मार्गदर्शन करा, मला प्रेरणा द्या आणि आम्हाला तुमच्या सेवेच्या पात्रतेचे बनवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.