नमस्कार मित्रांनो,
आपले स्वागत आहे वायरल मराठी या फेसबुक पेजवर. गुरु ग्रह 19 फेब्रुवारी 2022 रोजी कुंभ राशीत अस्त होणार आहेत. या काळात गुरू ग्रहाचा प्रभाव नसेल. वैदिक ज्योतिषशास्त्रात बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह हा संतती, शुभ कार्यक्रम, विस्तार, भाग्य आणि ज्ञान इत्यादींचा कारक मानला जातो.
त्यामुळे या काळात विवाह व इतर शुभ कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा सल्ला दिला जातो. 20 मार्च 2022 रोजी जेव्हा गुरु ग्रह त्याच्या सामान्य स्थितीत परत येईल, तेव्हा फलदायी सिद्ध होईल. बृहस्पति कुंभ राशी अस्त कालावधी : गुरु ग्रह शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11:13 मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होईल आणि त्याच राशीमध्ये रविवार, 20 मार्च 2022 रोजी सकाळी 9:35 मिनिटांनी सामान्य स्थितीत परत येईल.
वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरु हा दुसऱ्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी आहे. आता चौथ्या भावात अस्त होईल. या काळात तुम्हाला आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागेल. याशिवाय प्रवासादरम्यान तुम्हाला पैशांची चणचण भासेल. कामाच्या ठिकाणी तणावाचं वातवरण असू शकते. दुसरीकडे, आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, डोकेदुखी, पाय दुखणे आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
धनु राशी : धनु राशीच्या लोकांसाठी बृहस्पति हा पहिल्या आणि चौथ्या स्थानाचा स्वामी आहे. आता तिसऱ्या स्थानात अस्त होईल. या काळात व्यक्तीला सक्तीची बदली किंवा नोकरी गमावावी लागू शकते. याशिवाय कामाची गती मंद राहील. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा प्रभावित होऊ शकते. दुसरीकडे, आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास डोळ्यात जळजळ, पाय दुखणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते
मकर राशी : मकर राशीच्या लोकांसाठी गुरू हा तिसऱ्या आणि बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. आता त्यांच्या दुसऱ्या स्थानात अस्त होईल. या काळात कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नोकरीत तुम्हाला अनुकूल परिणाम मिळणार नाहीत. याशिवाय या काळात पैसे वाचवणे शक्य होणार नाही.
कुंभ राशी : कुंभ राशीच्या लोकांसाठी बृहस्पति हा दुसऱ्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यांच्या पहिल्या स्थानात म्हणजेच लग्न स्थानात अस्त होईल. या काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी अचानक बदल होऊ शकतो. या काळात तुम्हाला खर्चात वाढ, उधळपट्टी इत्यादींना सामोरे जावे लागू शकते.
मीन राशी : मीन राशीच्या लोकांसाठी बृहस्पति हा पहिल्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी आहे आणि बाराव्या भावात अस्त होईल. कामाच्या ठिकाणी जास्त दबावामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात आर्थिक स्थिती सामान्य राहील. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा. दुसरीकडे, आरोग्याविषयी बोलायचे झाले तर सांधे, पाय दुखणे यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकते.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.