नमस्कार मित्रांनो,
शारदीय नवरात्र ज्याची सगळेजण वाट पाहत असतात ती नवरात्री यावर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी आहे. 7 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी देवी पृथ्वीवर येते आणि नवरात्रीची सुरुवात होते.
या वर्षी नवरात्रीची सुरुवात गुरुवारपासून होत आहे आणि शुक्रवार 15 ऑक्टोबर रोजी शेवट होणार आहे. अशातच नवरात्रीमध्ये 8 दिवस पूजा आणि नवव्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी योग आहे. कारण चतुर्थी तिथीचा क्षय झालेला आहे. मित्रांनो नवरात्रीच्या दिवशी देवीच्या वाहनाला ही खूप जास्त महत्त्व असते.
ज्योतिषी यावरूनच येणाऱ्या वर्षाचे फळ कथन करत असतात. आणि येणारे वर्ष कसे जाईल, आपल्या कुटुंबावर काय होईल काय नाही होईल याचा अंदाज लावत असतात. तर मित्रानो या वर्षी देवी नवरात्री मध्ये पालखीतून येत आहे. हो मित्रांनो देवीचे वाहनच पालखी आहे. नेहमी प्रमाणे वेगवेगळी वाहन असतात. कधी देवी चालत येते, कधी कोणत्या प्राण्यावर येते या वेळेस पालखीतून येत आहे.
आणि मित्रांनो पालखीतून होणारे देवीचे आगमन देशभरात व इतरांसाठी, आपल्यासाठी मध्यम स्वरूपाचे, मध्यम फलदायी मानले जाईल. म्हणजे शुभही नाही आणि अशुभही सुद्धा नाही. समस्या ज्या आहेत, महामारी असू द्या किंवा देशावर अन्य समस्या असू दे किंवा आपल्यावर ज्या समस्या आहेत त्या अजून संपणार नाही. मित्रांनो देवीचे वाहन यावेळी सुखकारक संकेत देत नाही.
तरी आपण रोग व इतर समस्या मधून मुक्ती मिळवण्यासाठी या नवरात्रीमध्ये श्रद्धेने देवीची उपासना करा आणि दररोज कवच तिलक आणि अर्गला स्तोत्राचे पाठ करून जमेल तशी सेवा करा. मित्रांनो वाहन ही एक मान्यता आहे. पण आपण श्रद्धेने देवीची सेवा केली, तर देवी सगळं काही आपल्याला देऊन जाते. सुख असु द्या, समृद्धी असु द्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.