नमस्कार मित्रांनो,
नखे वाढविणे, त्यांना वेगवेगळे आकार देणे, नखे रंगविणे ही आजकालची फॅशन आहे. परंतु खूप मोठी नखे हे आरोग्यासाठी घातक सिद्ध होतात. आपल्या नखांमध्ये विष असते असे म्हणतात म्हणून जर चुकून एखाद्या व्यक्तीला नख लागले तर तेथे जखम होते व त्याचे दुष्परिणाम भरपूर दिवस आपल्याला भोगावे लागू शकतात.
त्याशिवाय नखांमध्ये घाण जमा होते आणि ते जेवण करताना आपल्या पोटात गेल्यास पोटाचे विकार ही जडतात. म्हणून वेळोवेळी नखांची स्वच्छता करणे फार गरजेचे असते. आठवड्यातून एक दिवस तरी नखे जरूर कापावीत.
नखे कापण्यासाठी काही ठराविक वार ठरवलेले असतात. या दिवशी नखे कापावीत व या दिवशी नखे कापू नयेत असे काही नियम ठरवले आहेत. नखे कापण्यासाठी काही वार हे खूप शुभ मानले जातात. रविवारी शाळेला सुट्टी असते त्याबरोबरच नोकर व्यक्तींनाही रविवारी सुट्टी असते.
म्हणून शक्यतो रविवारीच शांततेत नक्की कापले जातात. म्हणून आपल्याला वाटते नखे फक्त रविवारीच कापावी लागतात. परंतु असे काही वार आहे की, ज्या दिवशी नखे कापल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी व भरभराटीचे येते. प्रत्येक वाराचे आपले एक वेगळे महत्त्व असते.
आणि प्रत्येक वारावर ग्रहाचा प्रभाव असतो आणि आपण ज्या दिवशी जे काही काम करतो त्या वाराशी संबंधित ग्रहाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या वारी नखे कापल्याने त्याच्या आपल्या जीवनावर कोणते परिणाम होतात ते. सोमवार सर्वांनाच वाटते की, आपल्या आरोग्य उत्तम राहावे आपण निरोगी व स्वास्थ्यपूर्ण असावे. म्हणून सर्वजण प्रयत्न करीत असतात.
उत्तम आरोग्याची प्राप्ती करायची असेल तर नखे सोमवारी कापावीत. आणि मनातल्या मनात निरोगी जीवनाची कामना करावी. मंगळवार हा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे.
मंगळवारी नखे कापल्यास आपल्याला भरपूर आर्थिक लाभ होतो. आपल्या डोक्यावर कधीही कोणाचेही कर्ज रहात नाही. मंगळवारी नखे कापल्यास आपल्याकडे पैसा टिकून राहतो पैशांच्या कोणत्याही समस्या अडचणी आपल्याला जाणवत नाही.
म्हणून आर्थिक लाभासाठी फक्त मंगळवारीच नखे कापावीत. बुधवार बुधवारावर बुद्ध ग्रहाचा प्रभाव असतो. बुद्ध ग्रह हा बुद्धीचा कारक ग्रह आहे म्हणून दर बुधवारी नखे कापले तर आपली बौद्धिक प्रगती होते.
त्याशिवाय सन्मानाने व चांगल्या मार्गाने पैसा मिळवण्यासाठी धन प्राप्ती होण्यासाठीही बुधवार हा अतिशय शुभ मानला जातो. आपल्याला आपल्या ज्ञानात भर घालायची असेल तर बुधवारी नखे कापावीत.
गुरुवार हा गुरु ग्रहाचा आहे. गुरु ग्रह हा जड ग्रह आहे म्हणून असे म्हणतात की, शक्यतो गुरु हलका होईल असे कोणतेही कामे गुरुवारी करू नयेत. म्हणून नखे कापणे ही या दिवशी निषिद्ध मानले जाते.
परंतु जर घरात काही अशुभ गोष्टी घडत असते तर त्या सर्वांवर आळा घालण्यासाठी गुरुवारी नखे कापावीत. गुरुवारी नखे कापून आपण आपल्या जीवनातील अशुभ गोष्टींना दूर करू शकतो. त्याशिवाय गुरु हा अ ध्या त्मि क ग्रह असून गुरुवारी नखे कापल्यास आपल्यातील सत्त्व गुणही वाढीस लागतो.
शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा वार आहे. आणि शुक्र हा कलेचा कारक आहे. म्हणून जर आपण शुक्रवारी नखे कापली तर यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीची भेट होण्यास आपल्याला मदत होते.
म्हणून जर आपल्याला कोणाला भेटण्याची तीव्र इच्छा होत असेल, ओढ असेल तर शुक्रवारी नखे कापवीत. शनिवारी अजिबात नखे कापू नयेत. शनिवारी नखे कापणे खूप अशुभ मानले जाते. शनिवारी नखे कापल्यास आपली आशशक्ती वाढते.
आपले मन वाईट गोष्टींकडे आकर्षित होते आणि आपल्या जीवनात अशुभ गोष्टी घडतात. म्हणून शनिवारी चुकूनही नखे कापू नयेत. रविवार बहुतेक व्यक्ती नखे कापत असतात. कारण या दिवशी शक्यतो सगळ्यांना सुट्टी असते.
परंतु रविवार हा नखे कापण्यासाठी अशुभ दिवस आहे. रविवारी नखे कापल्यास आपल्या कार्यात अडथळे निर्माण होतात, बाधा उत्पन्न होतात व काम पूर्ण होत नाही. म्हणून शक्यतो मंगळवारी, बुधवारी व शुक्रवारीच नखे कापावीत.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.