या 5 राशींना प्राप्त होणार आहे राजयोग

नमस्कार मित्रांनो,

24 फेब्रुवारीला शनिदेवांच्या उदयामुळे रागयोग या 5 राशींना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट मानवी जीवनावर होतो. या वर्षी 2022 मध्ये अनेक मोठं मोठे ग्रह मार्गक्रमण करत आहेत.

कर्म फळ देणारे शनिदेव या यादीत आहेत. शनि ग्रहाचा 22 जानेवारीला अस्त झाला होता आणि आता 24 फेब्रुवारीला पुन्हा उदय होतो आहे. शनी जातकांना कष्टाळू, मेहनती, न्यायी बनवतो. तसेच त्यांच्या प्रभावामुळे व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात सुद्धा यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

यासोबतच जीवनामध्ये स्थिरता येते. शनिदेवांचा प्रभावामुळे व्यक्तीचे आयुष्य देखील वाढते. शनीच्या उदयामुळे पाच राशींच्या संक्रमण कुंडलीत राजयोग तयार होत आहेत आणि त्या कोणत्या 5 राशी आहेत चला जाणून घेऊया.

1) पहिली राशी आहे मेष राशी – मेष राशीच्या कुंडलीच्या दशम भावात शनिदेवांचा उदय होत आहे. तसेच तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे जो भाग्य स्थानात विराजमान झालेला आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये राजयोग तयार होत आहे. ज्याद्वारे तुम्हाला रॉयल्टी मिळू शकते.

तुम्ही राजकारणात मोठ पद मिळवू शकता. त्याच बरोबर नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी सुद्धा मिळतील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतन वाढ सुद्धा मिळेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी करू शकाल ज्यामुळे तुमची प्रशंसा होणार आहे आणि व्यवसायातही लाभाचे संकेत आहेत.

2) दुसरी राशी आहे वृषभ राशी – शनिदेवांच्या उदयामुळे तुमच्या संक्रमण कुंडलीत राजयोग तयार होत आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच वृषभ राशीच्या लोकांना राजकारणातही यश मिळू शकते. राजकारणात यशस्वी होण्यासाठी ते दीर्घकाळ प्रयत्न करत असतील तर या काळात त्यांना मोठ पद मिळू शकते.

3) तिसरी राशी आहे कर्क राशी – शनी देव तुमच्या कुंडलीतील सप्तम स्थानामध्ये संक्रमण करत आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतही राजयोग आहे. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात चांगले फळ मिळू शकते. या काळात नवीन भागीदारी निर्माण होऊ शकते.

तसेच यावेळी तुम्हाला व्यवसाय आणि इतर कामांमध्ये तुमच्या जीवन साथीचे सहकार्य मिळेल. जर तुम्ही शनीचे संबंधित व्यवसाय करत असाल तर जस की, तेल पेट्रोलियम, खान, लोह तर तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. मित्रांनो या काळात तुम्ही राजकारणातही यशस्वी होऊ शकता.

4) चौथी राशी आहे तुळ राशी – तुमच्या कुंडलीतील चौथ्या भावात शनिदेवांचे संक्रमण होत आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीत मध्य त्रिकोण राजयोग तयार होत आहे. तसेच तुळ राशीवर शुक्राचे राज्य आहे आणि शनिदेव शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनिदेवांचा उदय तुमच्यासाठी नक्कीच शुभ सिद्ध होऊ शकतो.

या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहिल. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचे खूप कौतुक होईल. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही खूप नफा कमावू शकता.

5) पाचवी राशी आहे मकर राशी – मकर राशीचा स्वामी शनी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा राजयोग आहे. व्यवसाय देणारा भूल भाग्यासोबत बसला आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळू शकतं. तुम्ही निवडणूक जिंकू शकता किंवा तुम्हाला मंत्रीपदही मिळू शकते. या काळात तुम्ही कोणत्याही व्यवसायात नवीन करार करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो नक्कीच लाभदायी ठरेल.

तसेच शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. लाभाची चिन्हे आहेत. या वेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची दाट अपेक्षा आहे. जे प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत त्यांची तर प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *