नमस्कार मित्रांनो,
स्वामी महाराज कोनोळी गावाच्या रानातून चालले होते. त्यादिवशी स्वामी महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतच होते. दिवसभर चालणे सुरू असतांना स्वामींनी स्वतः काही खाल्ले नाही आणि इतरांना सुद्धा काही खाऊ दिले नाही. दिवसभराच्या उपवासाने सर्व लोक अक्षरशः व्याकुळ झाले. काट्याकुट्यातून कसेबसे रस्ता काढत पुढे चालले होते.
आता भुकेची व्याकुळता श्रीपाद भटांना सहनच झाले नाही आणि ते अक्षरश: वाटेत आडवेच पडले. आणि स्वामींना विनंती करत बोलू लागले की, स्वामी आम्ही भुकेने तडफडतो आहे. आता कृपा करून एखादा झाडाजवळ आपण थोडा वेळ थांबावे त्यानंतर मग वाटेल तिकडे न्यावे. श्रीपाद भटांनी असे बोलतात स्वामी हसले आणि एका झाडाच्या आश्रयाखाली सर्वजण थांबले. आता श्रीपाद भट सभोवताली पाण्याचा शोध घेण्यासाठी निघाले.
जवळ जवळ अर्ध्या कोसावर त्यांना पाणी मिळाले तेव्हा धोंडीबा, मालाबा, नेमदास, काशीकर बुवा आणि गोविंद पुराणिक या सर्व मंडळींना सोबत घेऊन त्यांनी पाणी आणले. पाणी आणल्यानंतर श्रीपाद भटांनी स्वामींना फलाहार करण्याबाबत विनंती केली. तेव्हा स्वामी त्यांना बोलले तुम्ही सर्व लोक भोजन करून घ्या. त्यानंतर आम्ही खाऊ असे सांगितले. तेव्हा श्रीपाद भट लगेच बउतरले की, महाराज ह्या वेळी इतक्या लोकांना भोजन कुठून मिळणार?
तेव्हा स्वामींनी पलीकडे असलेल्या शेतातील एका आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवून त्या झाडाकडे जाण्याचा इशारा केला. तेव्हा त्या झाडाकडे काय वाढून ठेवले असेल असा तेथील लोकांनी विचार केला आणि जाण्याचे टाळले. परंतु श्रीपाद भटांचा स्वामींवर पूर्ण वि श्वा स होता आणि स्वामी वचनावर विश्वास ठेवून तो परशुराम सह अजून काही सेवेकऱ्यांना सोबत घेऊन झाडाकडे आला.
तेव्हा तेथे आश्चर्ये बघायला मिळाले त्या ठिकाणी 1 पोक्त वयाची सुवासिनी उभी होती. तेव्हा श्रीपाद भटांनी त्यांना नमस्कार केला आणि बोलले माऊली आपण कोण आहात? येथे एकट्या कशा येथे जवळपास अन्नाची सोय आहे का? तेव्हा त्या बोलल्या येथे ह्या शेतात आंब्याच्या झाडाखाली आमची काही लोक जेवायला येणार होती. त्यांच्यासाठी स्वयंपाक तयार करून ठेवला होता परंतु आता त्यांची किती वाट बघू? खरं तर इतक्या अन्नाचे काय करू असा प्रश्न मला पडला होता बरे झाले आता तुम्ही आलात हे अन्न तुम्हीच घेऊन जा येथे पाणी सुद्धा आहे.
त्या स्त्रीने असे बोलताच श्रीपाद भट आणि सोबतच्या मंडळींना खूप आनंद झाला. त्यांनी आमटी, वरण, भात, भाज्या, पोळ्या भाकरी, चटण्या, कोशिंबीर तूप यांची भांडी आणि टोपल्या उचलल्या आणि स्वामींकडे निघाले. तेव्हा या सर्वांनी आपण सुद्धा स्वामींकडे चलावे गुरुप्रसाद घ्यावा ही विनंती केली. तेव्हा ती माऊली बोलली तुम्ही खूप भुकेले आहात तुम्ही पुढे चला मी येते मागून आणि त्यानंतर सर्व मंडळी स्वामींकडे आली.
संध्याकाळ झाली होती मशाल दिवे पेटवली. सर्वांनी जेवण केली परंतु स्वामींनी काहीही खाल्ले नाही. सर्वांची जेवणं झाली काही मंडळींनी स्वामींना त्या स्त्रीबद्दल विचारले असता अरे ती अन्नपूर्णा होती असे स्वामींनी सांगितले. स्वामी भक्तहो सर्वांना आश्चर्य वाटले आणि आरण्यात कोठेही खाण्यापिण्याची सोय नसतानाही स्वामींनी प्र त्य क्ष अन्नपूर्णा मातेच्या हातून जेवण खायला घातले. ही कृतज्ञतेची भावना सर्वांमध्ये जागृत झाली आणि सर्वजण झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कालच्या भांड्यांचे काय करायचे असा प्रश्न पडला? तेव्हा ही सर्व भांडी तुमचेच आहे बरोबर घ्या असे स्वामींनी सांगितले आणि ही प्रासादिक भांडी घेऊन सर्व सेवेकरी स्वामींचा जयजयकार करत निघाले श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची लीला तर खूपच मार्गदर्शक आहे. आजच्या लिलेतून असंख्य बोध मिळत आहे. यापैकी आज आपल्याला आजच्या पिढीसाठी बोध घेता हीच समज मिळत आहे की, जीवनाच्या वाटेवरून चालत असताना स्वामी गुरूंचे अधिष्ठान ठेवायचे आहे.
हृदयातील स्वामी गुरूंचे मार्गदर्शन घेत निडर होऊन प्रवास करायचा आहे. आणि हा प्रवास करत असताना जर संकट आले, समस्या आल्या तर अजिबात घाबरून जायचे नाही. कारण विश्वातील प्रत्येक समस्येचे उत्तर स्वामींकडे आहे किंबहुना स्वतः स्वामी महाराजच प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. बघा आजच्या लिलेत भुकेने व्याकूळ झालेल्या सेवेकर्यांची भूक भागवण्यासाठी स्वतः अन्नपूर्णा माता आली.
इथे अन्नपूर्णा माता म्हणजे त्या एकाच परमचैतण्याचा असा आयाम की, जो समस्त जीवांना अन्न पाण्याचा पुरवठा करत आहे. स्वामींचे असे अनेक आयाम आहेत जसे माता लक्ष्मी, माता सरस्वती थोडक्या जीवनात कितीही संकट समस्या आल्या तर त्या सर्व गरजांचा पुरवठा करणारा स्रोत मीच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आधार स्वामी आज आपल्याला देत आहेत.
चला तर मग आपण स्वामींना प्रार्थना करूया हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तुम्हीच आहात. ह्या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत, वा संकट येऊ देत आता आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण माझ्या जीवनात तुमचे अधिष्ठान आहे आणि जिथे तुमचे अधिष्ठान तिथे समस्या नाहीच आणि समस्या आल्याच तर त्या समस्येचे उत्तर नि श्चि त आहे. कारण तुम्ही स्वतः एक उत्तर आहात, तुम्ही स्वतः समाधान आहात, तुम्हीच आनंद आहात. हे परमचैतन्या असेच आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला प्रेरणा द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.