नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. भक्तहो आज तुम्हा सर्वांना एक स्वामींचा अ द्भु त अनुभव सांगणार आहे. एका स्वामी सेवेकरी ताईंना हा अनुभव आलेला आहे. त्यांच्या शब्दात तो अनुभव मी इथे सांगत आहे. न म स्का र मी व माझे कुटुंब 2009 ते 2010 पासूनच स्वामी भक्ती करतो. खूप नाही पण नामस्मरण करतो. 2016 मध्ये जानेवारी महिन्यात माझी आई खूप आजारी पडली.
तिला आम्ही पुणे येथे खाजगी मोठ्या रुग्णालयात भरती केले. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने देखील आई वाचू शकली नाही. आणि तिचे निधन 15 मार्च 2016 ला रात्री झाली. या दोन अडीच महिन्यात ती हॉस्पिटललचा होती. खूप आजारी आणि वारंवार व्हेंटिलेटरने ती खूपच शारीरिक थकली होती. मला दोन मोठ्या बहिणी त्यांची लग्न झालेली व वडील असा माझा परिवार.
आईला माझ्या लग्नाची खूप काळजी होती. आई जाण्याआधी ती व्हेंटिलेटरवर होती. हाता तोंडात पूर्ण नळ्या, पूर्ण डोळे बंद, चेहरा शरीर आजार आणि प्र चं ड थकलेले अशी तिची अवस्था होती. ती शुद्धीत नव्हतीच आई शिकलेली असल्याने तिचे इंग्लिशवर प्रभुत्व होतं. आमची स्वतःची इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने आईच प्रि न्सि प ल होती व वडील चे अ र म न होते. आईला बाबा दोघी बहिणीची कोणाचीच काळजी नव्हती.
कारण बहिणी पण सदन घरात दिलेल्या काळजी होती ती फक्त माझी कारण माझं लग्न झाले नव्हते. आईचे बंद डोळे व्हेंटिलेटर अस्वस्थ परिस्थितीत तिच्या हाताला सलाइन असताना बेडवर हात आपटला आणि मला जवळ बोलवलं. जेमतेम खुनवुन वही पेन मागितली. मी तिच्या जवळ उभी होती तिच्या मनात कोणतं काहूर होतं माहीत नाही. पण नकाँन्सेस असताना अंदाजे तिने स्वामींचे उलट करून वाक्य लिहिले मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको आणि हाताने खुनवुन मला खाली बसवलं.
हात उचलायचा प्र य त्न केला माझ्या चेहर्याजवळ पण तिचे डोळे बंद होते. तसाच मी पटकन आईचा हात माझ्या गालावर ठेवला. तिने चेहरा चाचपडून पाहिला माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि डोक्यावरून कुणास ठाऊक त्या दिवशी आई जणू स्वामी होते आणि ते तिच्याकडून हे सर्व करून घेत होते. माझी आई मला कायमचे सोडून गेली. परत न दिसण्यासाठी आईला घरी आणलं तिची जाण्याची तयारी घरात आलेले नातेवाईक महिला करत होत्या.
आई सवासिनी गेले असल्याने आईला खूप छान सजवलं होतं. पण मी आईकडे पाहतच नव्हते खूप रडत होते. एक काकू म्हणाल्या अग अंजली आईला बघून तरी घे आई किती सुंदर लक्ष्मी दिसते. मी आईकडे पाहिलं तर आईचा तो हॉस्पिटलचा थकलेला चेहरा जणू हरवला होता. आई अगदी लक्ष्मीसारखी तेजस्वी दिसत होती. प्र स न्न चेहरा आणि जणू तिला मरणाचं तेज आलेलं.
पण तिच्या हातून स्वामींनी माझ्यासाठी त्यांचं वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे उलटं का होईना पण वदवून घेतलं होतं. या 20 मे 2019 ला माझ्या कुटुंबाची आणि माझी फसवणूक होत आहे हे माझ्या लक्षात आले. तो दिवस शंकर महाराजांचा समाधी दिवस होता आणि मला माहीत नव्हते तो दिवस समाधी दिवस आहे. मला वाटलं गुरूवारची गर्दी असेल मी धनकवडीला दर्शन घेऊन घरी आले आणि मला माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
संकट मोठे मी आणि माझं कुटुंब यातून जातोय. 28 जुलैला आरोपीची बेल नाकारली जाणं खूप महत्वाचं होतं आणि त्या दिवशी वकिलांना पोलिसांना सर्वांना वाटलं आज बेल मिळेल. पण मी स्वामी समर्थांना आणि शंकर महाराजांना प्रार्थना केली की, आज मी कोर्टात जाईन पण आज त्याची बेल तुम्ही फेटाळला आणि या पहिले पण सर्व बेल त्याच्या गुरुवारीच फेटाळल्या गेल्यात.
आणि खरच त्या दिवशी 28 तारीख झाली पण वार बुधवार होता. पण ज्यांनी स्वामींच्या आणि शंकर महाराजांच्या रूपात ती बेल फेटाळली आणि निकाल गुरुवारी झाला. मी आरोपीवर खूप प्रेम करते त्याने मला फसवलं. माझी ही चूक होती मी खूप विश्वास ठेवला त्याच्यावर भविष्यात काय होईल माहिती नाही. पण स्वामी समर्थ महाराज आणि शंकर बाबा महाराज खूप सगळं चांगलंच करतील हे नक्की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.