नमस्कार मित्रांनो,
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्र मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून, गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशी साजरा केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचं स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानले गेले आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या गाय आणि त्याचे वासरू यांची पूजा केली जाते. अश्विनमध्ये द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करावे आणि काय करू नये वसुबारस व्रत कसे करावे ही सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत. अंधाराकडून प्रकाशाकडे तज्ञाकडून ज्ञानाकडे येणारा सण म्हणजे दीपावली वसूबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो.
म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसूबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते. यंदा सोमवारी 1 नोव्हेंबर 2021 रोजी आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस आहे. समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन, द्रव्य आणि पैसा त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. सवत्स गाय म्हणजे जे गाईला दूध पित वासरू आहे आणि त्यानंतर पुढील मंत्राची प्रार्थना करावी. तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते | मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि || हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदा माते तु माझे मनोरथ सफल कर असा याचा अर्थ आहे.
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप, ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात, गोड पदार्थ करून गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवासनी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.
हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गाईला फार विशेष महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ते सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते.
सत्त्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बरिष्ट करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पुज्यभावे देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते.
अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सहित पूजन करून दीपोत्सव सुरुवात होते मैत्रिणींनो या दिवसाचे काही नियम देखील आहेत याचे काटेकोरपणे पालन करायला हवे. वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खात नाही महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेला पदार्थ खात नाहीत अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.