नमस्कार मित्रांनो,
स्वामी महाराज कृपेचा सागर आहेत. स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येणाऱ्या प्र त्ये क भाविकांची मनोकामना पूर्ण करत होते. स्वामी महाराज कल्पवृक्ष आहेत. अशी ख्याती जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये झाली तेव्हा मागणारांच्या रांगाच रांगा लागू लागल्या परंतु यात कधी कधी मागणार आहे इतका आंधळा झालेला असेल की, तो काय मागत आहे याचीसुद्धा त्याला भान राहत नसे आणि अशा लोकांना स्वामी संकेत सुद्धा देत.
असाच एक भाविक आला. त्याने स्वामींच्यासमोर आपली इच्छा व्यक्त केली. स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले कुग्राम वस्ती कुलहीन सेवा. त्या वेळेला त्याला काहीच समजले नाही. परंतु तिथल्या काही सेवेकर्यांनी त्याला समजावून सांगितले की, अरे तू निरतर्क मागतो आहेस. याची जर प्राप्ती आली तर त्याचा तुला काहीच फायदा होणार नाही. स्वामींचे संकेत हे त्याला समजले. आपली झालेली चूक त्याच्या लक्षात आली आणि उपस्थित सर्वांनी अनन्य भक्तीच्या भावनेने स्वामी नावाचा जय जयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आजची स्वामी वाणी म्हणजे कृपाच आहे. आजच्या स्वामी वाणीतून निरर्थक कर्माचा त्याग करून सार्थक कर्म करण्याची प्रेरणा स्वामी महाराज तुम्हा-आम्हा सर्वांना देत आहेत. बघा कुग्राम वस्ती म्हणजे असे गाव की, जिथे अन्न, वस्त्र आणि निवारा अशा मुलभूत गरजांची पूर्तता होऊ शकत नाही. अशा गावात राहणे जसे निरर्थक आहे किंवा कुलहीन सेवा कर. खर तर यातून अनेकांना गैरसमज होऊ शकतो.
परंतु कुलहीन सेवा याचा खरा अर्थ समजावून घेताना कुलहीन सेवा म्हणजे अशा लोकांची सेवा की ज्यांना सेवेची गरज नाही. उदाहरणार्थ जसे कोणी करोडपती आहे आणि आपण त्यांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आपण त्याला दहा रुपये दान देण्याची सेवा करतो. खर तर ही निरर्थक गोष्ट आहे. अशा कर्माला कुलहीन सेवा असे म्हटले आहे. असो थोडक्यात आजच्या लिलेतून प्रेरणा घेताना आपल्याला सुद्धा निरर्थक गोष्टींचा त्याग करायचा आहे.
आणि आपल्याला असे सार्थक कर्म करायचे आहे की, जे आपल्या ध्येयाच्या दिशेने असतील. बघा जसे कोणाला पैशाची समस्या असेल तर गप्पा टप्पा, सोशल मीडिया व इतर काहीही असेल, अशा ठिकाणी उगीच वेळ वाया घालवण्याचे सार्थक कर्म करण्यापेक्षा स्वामींना प्रार्थना करत नवीन पार्ट इन्कमचा व्यवसाय निवडून पैसा प्राप्तीच्या दिशेने असलेले सार्थक कर्म करायचे आहे. किंवा कोणाच्या नातेसंबंधात दुरावा आलेला असेल तर एकमेकांच्या चुकांचा पाढा वाचत बसण्याचे निरर्थक कर्म करण्यापेक्षा स्वामी आपले कुटुंब प्रमुख आहेत.
या विश्वासाने एकमेकांना मात करून संबंध सुधारण्याच्या दिशेने सार्थक कर्म करायचे आहे. थोडक्यात आजच्या स्वामी वाणीतून बोध घेता आपल्याला अनन्य भक्ती भाव मनात ठेवून निरर्थक कर्माचा त्याग करत ध्येयाच्या दिशेने असलेले सार्थक कर्म हे स्वामी सेवा या भावनेने करायचे आहे. बघा निश्चितच आपले भविष्य उज्वल असेल आनंदी कसे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया.
हे स्वामीराया आज तुम्ही बोध देत सांगितले की, बाळा निरर्थक कर्माचा त्याग कर आणि सार्थक कर्म ध्येयाच्या दिशेने असलेले कर्म माझी सेवा म्हणून कर तुला एकच निश्चित आहे. हे आई आज तुम्ही ही प्रेरणा दिली तुम्हाला धन्यवाद. असेच मार्गदर्शन करा, प्रेरणा द्या, भक्ती द्या आणि तुम्हाला अपेक्षित स मृ द्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घ्या
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.