नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला लातूरच्या एका ताईंचा अनुभव सांगणार आहे. या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दात आज तुम्हाला सांगणार आहे. मी मूळची लातूरची 2018 मध्ये माझं कुटुंब नियोजनाचे ऑ प रे श न झालं. सर्व काही चांगलं चालू होतं. माझे मि स्ट र मला घेऊन जाण्यासाठी आले व मी त्यांच्या सोबत सासरी गेले.
पुढे काही दिवसांनी माझे मि स्ट र मला काही कारणांमुळे माहेरी जाऊ देत नव्हते. त्यांना माझ्या माहेरचे नाव जरी काढले तरी खूप राग येत होता. काय झालं ते काही कळत नव्हतं. पण त्यांनी मला सांगितलं की, जर तुला तुझ्या माहेरची माणसं पाहिजे असतील, तर तू मला विसरायचं आणि त्यानंतर मी कधीच माझ्या माहेरच्या माणसांचं नाव काढलं नाही. मला तर काही कळत नव्हतं.
मी माझ्या माहेरची गोष्ट कधीच काढली देखील नाही. मी अडीच वर्ष माझ्या आई वडिलांशी बोलले नाही की, त्यांना भेटली देखील नाही. मला त्यांची खुप आठवण येत होती. पण काहीच पर्याय नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे मी स्वामी माऊलींना तेवढे मानत नव्हते. मला स्वामीं बद्दल तेवढी माहिती देखील नव्हती. मला माझ्या आई वडिलांना भेटून बोलून अडीच वर्ष झाली होती. मी माझ्या माहेरी जाण्यासाठी खूप व्याकूळ झाले होते.
मी एकदा देवपूजा करत असताना काय माहिती माझी नजर स्वामींच्या मूर्तीवर पडली. तस तर मी दररोज देवपूजा करते पण त्या दिवशी मला काहीतरी वेगळं वाटत होतं. माझं मन खूप उदास झाल होतं. मी स्वामींकडे पाहिलं आणि मला खूप रडायला आलं. मी माझ्या मनातलं त्या दिवशी सगळे स्वामींना सांगून टाकलं. तसं तर स्वामी माऊलींना काही सांगायची गरज नाही. त्यांना सर्व काही माहिती असतं. तरी हे मी म्हणाले स्वामी आई तुम्ही या जगाची आई आहात.
मी काय सांगणार माझं दुःख तुम्हाला. तरीही सगळे तुम्हाला माहित आहे. परंतु मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येत आहे. मला त्यांना भेटायचे आहे. त्यांना मला आज खूप पहावसं वाटत आहे असे सांगून मी माझं मन त्या दिवशी मोकळं केलं. आणि म्हणाले मला काही माहित नाहीये मला माझे आई वडील पाहिजेत. मी किती दिवस असं अनाथ असल्यासारखा जगायचं. असं खूप काही स्वामींना बोलले व माहेरी जाण्याचा हट्ट धरला.
पुढे 4 ते 5 दिवस गेले असतील मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की, खूप दिवस झाले मी माहेरी गेली नाही. मी एकदा माहेरला जाऊन येऊ का? हे असं विचारत असताना मी खूप घाबरले होते. पण काय च म त्का र ते मला काहीच बोलले नाहीत. मी पण शांत झाले आणि दुसऱ्या दिवशी ते पुण्याला जाणार होते. मी मनात म्हणाले स्वामी हे काहीतरी करा आणि ते पुण्याला निघाले. गाडीत बसले तसे माझे मन आतून खूप दुखत होते आणि रडत देखील होते.
पण जाताना जे काही बोले ये ऐकून मला खूप मोठा झटका बसला. ते म्हणाले की, जाणार आहेस तर जा काही दिवस राहून ये आणि मिस्टरपण शांतपणे निघून गेले. मला तर काहीच कळत नव्हते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. काय बोलावं आणि काय करावं काहीच समजत नव्हतं. मी पळत जाऊन स्वामींशी गेले आणि त्यांना मुजरा केला त्यांचे आभार मानले. लगेचच मी माझ्या भावाला फोन केला आणि ताबडतोब यायला सांगितलं.
हे ऐकून माझा भाऊ खूप घाबरला आणि बोलला काय झालं, काही घडलं आहे का? मी त्याला काही बोलले नाही लवकर ये इतकंच सांगितलं आणि फोन ठेवला. तो 2 तासांनी आला. माझ्या माहेरच्यांना अडीच वर्षांनी भेटण्याचा आनंद खूप होता. मी लगेचच माहेरी गेली. मी अस अचानक आलेली पाहून सगळेच खूप घाबरले. कारण मी भावाला सांगितलं होतं की, घरी कोणालाही काहीच सांगू नकोस.
मी सगळ्यांना सर्व काही सांगितलं आणि आम्ही स्वामींचे आभार मानले. स्वामींमुळे मला माझे माहेर मिळाले. खरं तर मनापासून मी माझ्या स्वामी माऊलीचे आज तुमच्या सर्वांसमोर आभार मानते. स्वामी समर्थ महाराज तुमचा आ शी र्वा द असाच सर्वांवर आणि माझ्यावर राहू द्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.