तुरटीने असे करा वास्तु दोष दूर जीवन बदलणारे तुरटी चे उपाय

नमस्कार मित्रांनो,

आज आपण तुरटीचा उपाय बघणार आहोत. तुरटी एक खूप गुणकारी वस्तू आहे. तुरटीचा वापर आपण कितीतरी टोटके, तंत्र मंत्रांमध्ये करतो. आज आपण असाच धनलाभासाठी तुरटीचा एक उपाय बघणार आहोत. काही व्यक्ती या उपायांचा अवलंब करून आपले जीवन सुखी व समृद्ध करतात तर काही व्यक्तींना या सर्व अंधश्रद्धा वाटतात.

आता ज्याचे त्याचे विचार व ज्याचे त्याचे मत आपण त्यात काहीही करू शकत नाही. ज्यांना मानायचे त्यांनी मानतील व ज्यांना नाही मानायचे ते न मानो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणताही उपाय करताना त्यात विश्वास हवा.

विश्वास पूर्वक केलेले कोणतेही काम पूर्णच होते व त्या उपायाचा निश्चितच आपल्याला फायदा मिळतो. तुरटीचा वापर आपण फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत. तुरटीचा वापर आपण अँटीसेफ्टीक म्हणून करतो.

जखम झाली किंवा काही मार लागला तर त्या ठिकाणी तुरटीची पावडर टाकली जाते किंवा तुरटीचे पाणी टाकून ती जखम दुखले जाते. परंतु तुरटीचे काही असे उपाय आहे जे करून आपण आपली दशा व दिशा दोन्हीही बदलू शकतो.

जर आपण एखादे काम करीत असलो परंतु त्यात काही ना काही अडथळे येत असतील, आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तुरटीचा हा उपाय नक्की करून पहा. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी तसेच घरातील प्रत्येक खोलीत एक एक तुरटीचा तुकडा ठेवावा.

याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुरटी ज्या ठिकाणी ठेवलेले असते त्या ठिकाणाचा वास्तुदोष निघून जातो. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील, तुमची प्रगती होईल, तुमचे प्रत्येक कार्य विनासायास पूर्ण होईल.

जर तुम्ही भरपूर कष्ट करीत आहात परंतु तुमच्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल तर एका काळ्या कापडात एक तुरटीचा तुकडा बांधून घ्यावा व ही गाठोडी आपल्या दुकानाच्या पुढे किंवा घराच्या पुढे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला बांधून द्यावी. असे केल्याने वास्तूदोष दूर होतो.

आपल्या आसपासच्या न का रा त्म क ऊर्जा नष्ट होते. तसेच आपल्या घरात बरकतही येते आणि तुमच्या व्यवसायातही वृद्धी व्हायला सुरुवात होते. पैशांची आवक वाढते. जर तुमच्यावर खूप कर्ज झाले असेल, काही केल्याने ते फिटतच नसेल, कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल,

तर एक नागलीचे पान म्हणजेच विड्याचे पान घ्यावे. त्यामध्ये थोडेसे कुंकू टाकावे व त्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकून हे पान लाल रंगाचा दोर्‍याने बांधून घ्यावे. नंतर हे पान पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून त्यात ते माती खाली दाबून द्यावे. या उपायांमुळे थोड्याच दिवसात तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळेल.

थोडे थोडे करता करता तुमचे संपूर्ण कर्ज फिटेल व तुम्ही कर्ज मुक्त व्हाल. मित्रांनो तुरटीच्या या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्येपासून सुटका मिळवू शकता. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करून धनवान होऊ शकता.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *