तुमच्यावरील आपत्तीचा भार नक्कीच टळेल ही कथा ऐकून टळेल.

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे. ती कथा ऐकून तुमच्यावरील आपत्तीचा बार नक्कीच टळेल. कधी ना कधी प्र त्ये क मनुष्याच्या जीवनामध्ये एक अशी वेळ येते जिथे त्याला वाटते की, आता त्याच्याजवळ या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग नाही. असेच काही माता हरणीसोबत झाले.

एकदा एक माता हरीण आपल्या पिल्लाला जन्म देणार होते. आणि अशा परिस्थितीत ती एका सुरक्षित जागेसाठी जंगलात भटकत होती. त्या वेळी त्या हरणीने जंगलाच्या एका टोकाशी नदीच्या जवळ उंचच्या उंच राणाला पाहिले. त्या हरीणीला ती जागा आपल्या पिलाला जन्म देण्यासाठी गुप्त वाटली आणि ती आपल्या पिलाला जन्म देण्यासाठी त्या घनदाट रानाच्या मध्यभागी गेली.

जसे ते हरीण तिथे पोहोचले आणि तिला खूपच जोरात प्रवृत्तीला सुरू झाली. तेव्हा अचानक आकाशात काळे ढग जमू लागले, वीज चमकू लागली. परंतु ते हरिण अशा परिस्थितीत कुठे जाऊ शकत नव्हते. तेव्हा त्याने उजवीकडे पाहिले जेथे एक शिकारी त्याच्याकडे आपल्या बाणाचा निशाणा धरून उभा होता. ते डावीकडे वळले. त्याने पाहिले एक भुकेलेला सिंह झाडाच्या मागे दबा धरून बसला होता.

त्या हरणीच्या समोर सुकलेले रान होते. त्यालाही आग लागलेली होती. जेव्हा त्याने आपल्या पाठीमागे पाहिले तेव्हा नदीचे पाणी तुडुंब वाहत होते. ज्याला पार करून जाणे त्याच्यासाठी अ श क्य होते. आता मात्र हरीण पूर्णपणे घाबरले आणि खूपच जास्त हिमतीत परत गेले. आता त्याचे काय होइल अशा परिस्थितीत काही प्रश्न जे आपल्याला विचार करण्यास मजबूर करतात.

माता हरणीस आपल्या पिलाला सुखात जन्म देऊ शकेल का? किंवा माता हरणी जिवंत वाचू शकेल का? काय त्याचे पिल्लू सुरक्षित वाचेल किंवा काय ते माता हरीण त्या शिकारीच्या बानाचा निशाणा बनेल की, ते हरिण भुकेलेल्या सिंहाच्या तोंडाचा घास बनेल की, त्या जंगलाच्या दिशेनं आगीत ती आणि तिचे पिल्लू जिवंत जाळून खाक होईल. की तिच्या पाठीमागे वाहणाऱ्या नदीचे उसळलेले पाणी तिला आणि तिच्या पिल्लाला वाहून घेऊन जाईल हे सर्व पाहून त्या हरीण खूपच जास्त घाबरले होते.

ती सर्व जाणत होते की आता आपल्या वाचण्याचा कोणताच मार्ग नाही. त्या हरणीने आपले डोळे बंद केले आणि आपल्या स्वतःला त्या अवस्थेमध्ये सोडून दिले आणि मग जे काही घडले ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. अचानक जोरात वीज कडाडली आणि त्याची चमक त्या शिकाऱ्याच्या डोळ्यांवर पडली.

ज्याने त्याचा निशाणा चुकला तो बाण हरणीच्या बाजूने जात त्या सिंहाच्या डोळ्यात घुसला. तो डरकाळीने किंचाळत पळून गेला. जोराचा पाऊसही पडू लागला आणि त्यामुळे सुख्या रानात लागलेली आगही आपोआप विजली. अशाप्रकारे ती माता हरीण आपल्या पिल्लाला अगदी सुखदायक जन्म देऊ शकली. आता ते हरीण आणि त्याचे पिल्लू दोघेही सुरक्षित होते. भक्तहो कदाचित त्यामुळेच असे बोलले जाते की, देव तारी त्याला कोण मारी.

मग कुणी तसा केसही वाकडा करू शकत नाही. जरी पूर्ण जग त्याचे वैरी झाले असले तरी फक्त भगवंताच्या या नैसर्गिक व प्राकृतिक प्रोत्साहन देणाऱ्या कथेतून आपणास हे सांगण्यात येते की, जर आमच्या जीवनामध्ये आयुष्यात कधीही आपत्तीतून बाहेर येण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नसेल, तर अशा वेळी आम्हालाही त्या माता हरणीसारखे आपल्या स्वतःला ईश्वरचरणी स्वामींच्या स्मरणात अगदी शून्यमध्ये सोडले पाहिजे. आपल्यावरील आपत्ती आपोआपच नष्ट होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *