नमस्कार मित्रांनो,
स्वामींच्या लीला अगाध आहेत. आपले स्वामी परमचैतन्य आहेत. स्वामींचे अस्तित्व चराचरात व्यापून उरलेली आहे. या अनंतकोटी ब्रम्हांडात घडणार्या प्र त्ये क घटनेचा ज्ञान स्वामींना आहे आणि विविध लिलामधून अनेकांना वेळोवेळी ही प्रचिती देखील येत होती. यातच हरिश्चंद्र गोपालजी नावाचे एक गृहस्थ गुजरातमधील बडोद्यास राहत होते. एके दिवशी कोणी एका ब्राह्मणाने त्यांच्याकडे त्यांच्या घरी दोन हजार रुपयांची चोरी केली.
आणि तो फरार झाला स्वामी भक्तहो त्या काळात दोन हजार रुपयांचे मूल्य काही कमी नव्हते आणि म्हणून विचार करा की, दोन हजार रुपयांची चोरी झाल्यानंतर हरिश्चंद्र गोपालजी यांची काय अवस्था झाली असेल, निश्चितच हरिश्चंद्र गोपालजी हे खूपच ताण तणावात आले. आणि चोराचा पुष्कळ शोध घेण्याचा प्र य त्न देखील केला. परंतु सर्व प्रयत्न विफल झाले शेवटी ते अक्कलकोट येथे आले.
अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांनी थेट स्वामींना चोराबद्दल विचारले. स्वामींना असा प्रश्न विचारताच स्वामी जरा हसले आणि हरिश्चंद्र गोपालजी त्यांच्याकडे बघून बोलले अरे तुमचा चोर मोगलाईत पकडून ठेवला आहे आणि असे बोलून स्वामींनी त्या गावाचे नाव सांगितले. स्वामी भक्तहो हरिश्चंद्र गोपालजी यांचा स्वामी वचनावर विश्वास होता आणि स्वामींच्या वाणीवर वि श्वा स ठेवून हरिश्चंद्र गोपालजी यांनी स्वामींनी सांगितलेल्या गावात जाऊन तपास केला असता आ श्च र्य घडले.
स्वामी वाणीप्रमाणेच घडले दोन हजार रुपयांची चोरी करणारा ब्राह्मण तेथे सापडला. इतकेच नव्हे तर मुद्देमालासह सापडला. स्वामी वाणीची प्रचिती येताच हरिश्चंद्र गोपालजी आनंदाने नाचू लागले. स्वामी महाराज चराचरात व्यापून उरलेली आहे या अनंतकोटी ब्रम्हांडात कुठे काय सुरु आहे हे सर्व स्वामींना ठावूक असते. याची प्रचिती सर्वांना आली आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नावाचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आजची स्वामी वाणी म्हणजे बोधांचा खजिनाच आहे. स्वामी महाराज निर्गुण-निराकार अस्तित्व असून हे अस्तित्व चराचरत व्यापून उरलेली आहे. या दिव्य सत्याचा बोध आजच्या लिलेतून स्वामी महाराज आज आपल्याला देत आहेत. स्वामी भक्तहो आजची लिला खरोखर खूपच प्रेरणादायी आहे. बघा या लीला हरिश्चंद्र गोपालजी यांचे 2000 चोरीला जातात ते शोधण्यासाठी भरपूर प्र य त्न करतात. परंतु काही फायदा होत नाही.
परंतु जेव्हा ते जो स्वत: सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत अशा स्वामीनारायणकडे येतात तेव्हा त्यांना स्वामींचे मार्गदर्शन लाभते आणि त्यांची समस्या सुटते. थोडक्यात आजच्या लिलेतून जर आपल्या जीवनात एखादी समस्या असेल आणि आपल्याला ती सोडवायची असेल तर योग्य मार्गदर्शनाची किती गरज असते याचे म ह त्त्व स्वामी आपल्याला पटवून देत आहेत.
म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या लिलेतून बोध घेता समस्या कोणतीही असूदे, वैयक्तिक असुदे, सामाजिक असुदे व वैश्विक असुदे त्या प्रत्येक समस्येचे उत्तर म्हणजे स्वतः निर्गुण निराकार स्वामी महाराज आहेत. या परमशांतीतच सर्व समस्यांची उत्तरे आहेत आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा हे समर्थ अस्तित्वच विविध लोकांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असते. हा वि श्वा स दृढ करून आणि आपला अ हं का र सोडून आपल्याला योग्य पात्र अनुभवी मार्गदर्शकाचा सल्ला घ्यायचा आहे.
आणि ते अनुभवी व्यक्तीला स्वामींनीच विविध घटना प्रसंगातून अनुभव देऊन घडवलेले असते. आणि हे त्याचे भूत काळातील अनुभव कदाचित आज वर्तमान काळात आपल्या समस्येचे उत्तर असू शकते. हा भाव ठेवून त्याचा सल्ला आणि आपला विवेक यांचा सुरेख मेळ साधून आपले प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा समस्या नक्कीच सुटेल. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया.
हे स्वामीराया आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू द्या वा कोणतीही अडचण असू द्या. त्या सर्वांचे उत्तर तुम्ही स्वतःच आहात. जेव्हा आम्ही तुम्हाला आळकतो तेव्हा तुम्हीच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्हाला दिशा देतात आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतात हे समर्था तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान द्या की, तुमचे नाम नित्य आमच्या ओटी असू द्या, तुमचा ध्यास हृदयात असू द्या. कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही धन्यवाद स्वामी.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.