तुमच्या घरात झुरळांनी उच्छाद मांडलाय का? हे उपाय करून बघा, कसे पळतील बाहेर

नमस्कार मित्रांनो,

अनेकांना घरात झुरळांनी गोंधळ घातल्याचे दिसून येते. आपण आपले स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा सं पू र्ण घर जरी स्वच्छ ठेवले असले तरी रात्रीच्यावेळी हे झुरळं आपल्या घरावर हमला करतात. रात्री कधी तरी आपण लाईट चालू केल्या की समोर झुरळांचा उ च्छा द दिसतो.

घर, बाथरूमच्या आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या मार्गात त्यांची वस्ती असते. घरातील कामे संपल्यानंतर शांतता झाल्यानंतर ही झुरळं बाहेर येतात आणि अन्नाचा शोध घेतात आणि स्वयंपाकघरात ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या जवळ पोहोचतात.

यामुळे संक्रमण आणि अन्नातून विषबाधेसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता झुरळापासून सुटका करायची असेल तर काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो.

झुरळांपासून मुक्त होण्याचे सोपे मार्ग : 1) बेकिंग सोडा : झुरळांपासून मुक्त होण्यासाठी बाथरूम ड्रेन आणि किचन सिंक इत्यादीभोवती बेकिंग सोडा शिंपडा. बेकिंग सोड्याचा वास खूप तीव्र असतो, ज्यामुळे झुरळे पळून जातात आणि घरात प्रवेश करत नाहीत. तुम्ही एक कप कोमट पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा विरघळवून हे मिश्रण बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या मार्गात टाका, असे केल्याने तेथे उपस्थित असलेली झुरळे मरतील.

2) बोरिक ॲसिड : आपण बोरिक ॲसिडच्या मदतीने झुरळांपासून सुटका मिळवू शकता. तुम्ही ते रात्री बाथरूमच्या नाल्यांमध्ये, स्वयंपाकघरातील सिंक इत्यादींमध्ये टाका. त्यामुळे घरातील झुरळं गायब होऊ शकतात.

3) पांढरा व्हिनेगर : घरातून झुरळांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पांढरा व्हिनेगर वापरू शकता. ते वापरण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि जिथून झुरळं बाहेर पडतात, त्या भागात शिंपडा. झुरळं त्याच्या वासामुळं पळून जातील.

4) गरम पाणी : जर तुमच्या घरातून बाहेर पडणारे नाले झुरळांनी भरलेले असतील तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नाल्यात उकळते पाणी टाकू शकता. आपल्याला हवे असल्यास आपण त्यात बेकिंग सोडा देखील टाकू शकतो. यामुळे साचलेली घाण देखील साफ होईल आणि झुरळे देखील मरतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *