तुमच्या घरात भांडणे का होत असतील? पैसा का टिकत नसेल? समस्या आणि समाधान

नमस्कार मित्रांनो,

कोणत्याही यशाची हि गुरुकिल्ली म्हणजे घरामध्ये शांतता. कारण शांतीप्रिय वातावरणामध्ये ज्या कामाची सुरुवात केली जाते ते काम नेहमी पूर्ण होते. ज्या घरामध्ये शांतता नांदत असते त्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती हि चांगली असते. कारण ते लोक एकमेकांशी चांगले वागत असतात. आणि अशा घरी माता लक्ष्मीचे वास्तव्य असते.

म्हणून घरामध्ये, परिवारामध्ये शांतता असणे खूप महत्वाचे आहे.
आपल्याला घरात शांतता नांदत असेल तर चांगली गोष्ट आहे. जर घरात नेहमी कलह होत असेल, एकमेकांशी पटत नसेल, एकमेकांशी बोलत नसेल, एकमेकांच्या विचारांशी सहमत नसेल. भांड्याला भांड लागत असेल. तर ये उपाय नक्की करून पहा.

प्रत्येक घरामध्ये वास्तू पुरुष म्हणून एक पुरुष असतो. जर तो स्वतः शांत असेल तर घरामध्ये शांतात नांदत असते. म्हणून त्याला सदैव शांत व प्रसन्न ठेवणं हि प्रत्येकाची जबाबदारी असते. आता हे वास्तू पुरुष म्हणजे आपल्या घरातील जी वास्तू आहे,

त्या वास्तूलाच वास्तू पुरुष असे संभोधिले जाते. तर या साठी पहिला उपाय असा आहे कि रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर श्री वास्तू पुरुषाय नमः असे हाथ जोडून एकदा म्हणायचे आहे. व त्या वास्तू पुरुष्याला वंदन करायचे आहे.

त्याचप्रमाणे घरामध्ये कुठलेही अनाचार किवां अघटित कार्य होणार नाही याची काळजी करायची आहे.
कारण वास्तू पुरुषाला ते आवडत नाही. भांडण करू नये. दारू पियू नये आणि मुक्ख म्हणजे घरात आलेल्या अथीतींचा कधीही अपमान करू नये.

या गोष्टी कटाक्षाने टाळायला हवेत. ज्याणेंकरून आपल्या घरातील वास्तुपुरुष नेहमी शांत राहील. त्याच प्रमाणे वास्तुपुरुषाला रोज नैवैद्य दाखवणे हा हि एक उपाय आहे ज्याणेंकरून जो शांत राहील. त्याचप्रमाणे घरामध्ये दरअमावसेला, दर गुरुवारी धूप जाळावा.

ज्याणेंकरून घरातील वातावरण भक्तिमय होईल. घरातील वातावरण दूषित होणार नाही. त्याच प्रमाणे देवांच्या फोटोला सुवासिक फुलांचा हार घालावा. देवघरामध्ये सुवासिक फुल ठेवावे.

ज्यामुळे घरामध्ये एक सुगंधित वातावरण तैयार होईल. त्याचा परिणाम थेट आपल्या मनावर होईल. त्याच प्रमाणे घरामध्ये तिन्ही सांजेला श्री रामरक्षा व भीमरूपी श्रोत्र मोठ्या आवाजामध्ये म्हटलं कि,

घरामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत ज्या कलह निर्माण करणाऱ्या शक्ती आहेत त्या नाहीश्या होतील. व परिणामी घरामध्ये शांतता राहते. या सर्वांचे परिणामी म्हणजे आर्थिक परिस्तिथी सुधारेल. प्रत्येक काम पूर्ण होईल. घरातील व्यक्ती एकमेकांशी प्रमाणे वागतील. इतरांसोबत प्रमाणे वागले तर संसार हा सुखमयी होतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *