तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत का… स्वामींची ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा… सगळ्या इच्छा होतील पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज आपण स्वामींची एक गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यातूनच संदेश घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला माहिती आहे कि स्वामींचा कुठलाही एक संदेश आपण जर घेतलो त्यांची एक कुठलीही गोष्ट शिकलो तर आपल्या आयुष्यात किती आपणाला वेगवेगळे लाभ प्राप्त होतात.

मित्रांनो स्वामी अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढा या गावी रहात होते. स्वामी तेथे बारा वर्षे राहिले पण ते जंगलात राहत होते. जंगलात ते तपस्या, साधना यामध्ये वेळ घालवत. कधीतरीच ते मंगळवेढा गावात यायचे. मंगळवेढ्यात बसप्पा तेली नावाचा एक गरीब व्यक्ती राहत होता.

एक दिवस तो जंगलात गेला असता त्यांना स्वामी कंटकशैय्येवर झोपलेले दिसले. कंटकशैय्या म्हणजे काठीचा बिछाना. बसपाने जेव्हा स्वामींना कंटक शैलीवर पाहिले तेव्हाच त्याचा भक्तिभाव जागा झाला. तो स्वामी भक्त झाला आणि तेव्हापासून तो स्वामींच्या बरोबरच राहू लागला.

स्वामी जेथे जातील तेथे तो पाठीमागे जायचा.पण बसप्पाची बायको मात्र वैतागली होती. तिला वाटायचं आधीच आपली परिस्थिती गरिबीची आणि आपला नवरा असा एका साधूच्‍या बुवाच्या मागे मागे फिरतो. काम धंदा तर काही करत नाही त्यामुळे ती खूप चिडचिड करत असे. मात्र बसप्पा स्वामींची पाठ सोडत नव्हता. तो स्वामींच्या बरोबरच राहायचा. एक दिवस स्वामी अचानक रात्रीची उठले आणि चालू लागले. बसप्पाही स्वामींच्या मागे मागे चालू लागला.

स्वामी एका ठिकाणी थांबले तेथेच बसप्पाही थांबला.तिथे अचानक सगळीकडे सापच साप दिसू लागले. बसप्पाला काही कळेना तो घाबरून तसाच उभा राहिला. स्वामी म्हणाले बसप्पा तुला हवे तितकी साप घे. घाबरत घाबरत बसप्पाने एक साप उचलला आणि आपल्या झोळीत टाकला. त्यानंतर ते सगळे साप अदृश्य झाले.स्वामी बसप्पाला म्हणाले, जा आता तू तुझ्या घरी. स्वामींची आज्ञा बसप्पा बोलू शकत नव्हता. तो आपल्या घरी गेला.

घरी गेल्यानंतर त्याने आपली झोळी उघडून पाहिली. पाहतो तर काय तो साप सोन्याचा झाला होता. सोन्याच्या सापामुळे बसप्पाचे नशीबच उघडले. तो खूप श्रीमंत झाला. त्यानंतर बसप्पा जो भेटेल त्याला स्वामींच्याबद्दल सांगत असे. त्यांचा महिमा सांगत असे.

एक दिवस त्याला एक महिला भेटली. ती खूप रडत होती. बसप्पाने तिला विचारलं तू का अशी रडतेस? तेव्हा तिने सांगितलं की मला मूल होत नाही. बसप्पा तिला म्हणाला मी सांगतो तस तू केलीस तर स्वामींची कृपा तुझ्यावर होईल. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल.

त्या महिलेला बसप्पाने सांगितले की अरण्यात स्वामी राहतात. त्यांचं रोज दर्शन घे आणि असं ठरवलं की ज्या दिवशी स्वामींचे दर्शन होणार नाही त्या दिवशी मी जेवणार नाही. त्या महिलेने हा नियम, हे व्रत दोन वर्षे केले. स्वामी पण कधी कधी तिची परीक्षा बघत असत.

ते तिला दोन दोन दिवस दिसत नसत आणि ती महिलाही दोन दोन दिवस जेवत नसे. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वामी तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले समोर जे झाड दिसत आहे. त्यातून रस बाहेर पडत आहे.

तो तू प्राशन कर म्हणजे तुला अपत्य प्राप्ती होईल.स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ती महिला झाडाजवळ गेली आणि खरंच त्या झाडातून रस वाहत होता. तो रस प्यायली आणि घरी गेली. थोड्या दिवसाने तिला अपत्यप्राप्ती झाली.

मित्रांनो ती महिला 65 वर्षांची होती. याचा अर्थ काय तर तुम्ही स्वामीभक्ती निष्ठेने केली, तुमच्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळत. स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा.

अशाच आणखी माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *