नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो कुलस्वामिनी म्हणजे आपल्या कुळाची स्वामिनी, कुळाची माता, कुळाची देवी जिला आपण कुलदेवी म्हणत असतो. प्रत्येकाची कुलस्वामिनी ही वेगवेगळी असते. पण कुलस्वामिनी कोणतीही असू द्या त्यांची मूर्ती प्रतिमा घरात स्थापन केली असेल किंवा केली नसेल तरीही कुलस्वामिनीच्या नावाने घरात एक कलश नक्की स्थापन करावा.
या कलशाला वरुण कलश असे म्हणतात. याने आपल्या घरावर कुलस्वामिनीचा आ शी र्वा द असतो, त्यांची कृपा आपल्यावर असते आणि आपल्या परिवारावर कोणतेही संकट कुलस्वामिनी हे येऊ देत नाहीत आणि हे खूप महत्त्वाचे असते. आता कलश स्थापन कसा करावा?
मित्रांनो जसे आपण इतर पूजा विधीसाठी कलश स्थापन करत असतो तसाच हा कलश सुद्धा स्थापन करावा. कलशात नारळ, पाच पाने विड्याची किंवा आंब्याची पाने, पाणी, पैसा, सुपारी त्यात टाकावी. त्याला हळदी कुंकुवाचा प्रत्येकी तीन किंवा पाच रेषा ओडाव्यात आणि घराच्या मंदिरात तुमच्या डाव्या हाताला तो कलश तुम्ही स्थापन करावा.
म्हणजे जेव्हा तुम्ही देवाकडे तोंड करून बसाल तेव्हा तुमच्या डाव्या हाताला कलश स्थापन करावा. आता एक मुख्य गोष्ट म्हणजे कलश हा कुलस्वामिनीच्या वारीच स्थापन करावा. जसे कोणाच्या कुलदेवीचा वार मंगळवार असतो तर कोणाच्या कुलदेवीचा वार शुक्रवार असतो. या प्रकारे आणि प्रत्येकी समजा तुम्ही जर कलश मंगळवारी स्थापन केला तर प्रत्येक मंगळवारी त्या कलशावरची पाने आणि पाणी बदलावे.
नारळ, पैसा आणि सुपारी तेच ठेवावे. फक्त पाने खराब होतात म्हणून ते कुलस्वामिनीचा वारी बदलत राहावे. म्हणजे दर आठवड्याने पाणी आणि पाने बदलत राहावे. तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही आपल्या कुलस्वामिनीचा कलश आपल्या देवघरात स्थापन करावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.