नमस्कार मित्रांनो,
अरे बाळा काय तुझा आमच्यावर वि श्वा स नाही? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची, मी आहे ना तुझ्या पाठीशी.
तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामिला त्रास द्यायचा आपले दुःख सांगून? तर खरा त्रा स आता तू देत आहेस काही न सांगून. जीवनाला कोणतेही वळण आले तर स्थि र रहा. कारण स्थि र मनात माझे प्र ति बिं ब दिसेल.
विवेकबुद्धी विचार करून निर्णय घेतला असशील तरमागे हटू नको, ठाम रहा आणि कृतीत उतरव. कोणी तुझा काही एकूण घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला एकु जायचे आहे. त्यापर्यंत नक्की पोहचेल.
सुखच हवे असा अटटाहास करू नको, काही मी आहे ना तुझा मी आहे ना तुझ्या पाठीशी मी आहे नारणं प्रत्येक परिस्थिती मध्ये सुख हे लपलेलेच आहे. जसे दुधात दही लपलेले असते. तसाच तुझ्या कर्माच्या रवीने सुख बाहेर येईल.
काया, वाचा आणि मानाने तुझे कर्म एकच ठेव. म्हणजे मानाने ठरवशिल तेच बोल आणि तेच कर. म्हणजे एक परिपूर्ण कर्म तयार होईल.
नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा आश्रय घे.
लक्षात ठेव नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाचा काहीही अर्थ नाही.
कर्म करताना त्यातून शांती मिळेल की अशांती ह्याचा नीट विचार करून कर्माला सुरुवात कर. कोणालाही काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्यावर विश्वास असणारे कधीही तुला जाब विचारनार नाहीत.
आणि विश्वास नसणाऱ्यांचा सवालाच नाही त्यांनावकाय घेणे देणे?
तुला जेव्हाही एकटे वाटेल. कुटुंबातले दूर वाटत असेल तर तू एकटा नाही जवळचे लोक दूर आहेत त्यांच्याच दुःखाने हे समजून घेतले पाहिजे.
कुठलाही व्यवहार करताना मग तो दुनियादारी चा असेल. नाहीतर नजदीक च्या व्यक्तीशी सावधगिरी बाळग.
तात्पर्य_ तू दुखावला जाणार नाहीस. किंवा तुझ्यामुळे इतर दुखावले जाणार नाहीत.
सुख दुःख हे आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखी समज. वारा जसा एकसारखा राहत नाही. तसे सुख दुःख एकसारखे राहत नाही, म्हणून यांना एकसारखे समज म्हणजे यांचा तुझ्या मनावर काही परिणाम नाही होणार आणि तू सुखाच्या पुढे म्हणजे आनंदात राहशील.
बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. फक्त एकदाच हाक मार.
अरे राजा! समस्या बाधा फक्त प्रपंच्याताच आहेत का? हे तर नामस्मरणात देखील येतच राहतात. सृष्टी आहे, जीवन आहे, म्हणजे हेही असणारच त्यांना राहायला दुसरे स्थान कुठे आहे.
परोपकार, प्राणिमात्रांच्या सेवा करताना त्यावेळेस त्यांच्या हृदयातून येणारे आशीर्वाद देखील मुक्ती, मोक्षात सहाय्यक आहेत.
तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील.
कुठल्याही जीवाचे खरे सौंदर्य त्याचा शुद्ध भाव आणि आचरण आहे. हे जर तुझ्या दृष्टीनं तुला कोनाठयी जाणवले. तर अशा व्यक्तीं चा कधीही त्याग करू नकोस.
तुला कोणी फसवत आहे किंवा कोणी तुझा फायदा घेत आहे. असे ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलून त्याच्या आचरणावर लक्ष ठेव.
माझ्या भक्ताविषयी काय सांगू? माझे भक्त माझे अस्तित्व आहे. भक्तांची प्रार्थना माझी लीला होय.माझ्या भक्तांचे हसू माझे हसू आहे. आणखी काय सांगू? भक्तांच्या दर्शनासाठी मी ही तितकाच आसुसलेला असतो.
माझ्या भक्तांची सदैव जय हो!
श्री स्वामी समर्थ
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.