नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुळशीला आपण रोप नाही तर, साक्षात देवी लक्ष्मी मानतो. म्हणून प्रत्येकाच्या दारात पुढे तुळस ही असते. तुळस दारापुढे असणे हे आपल्यासाठी व आपल्या कुटूंबासाठी खूपच फायदेशीर असते.
तुळसीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. म्हणून नित्यनियमाने जर तुळशीचे पूजन केले तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होतो. असे आपल्या अनेक हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगीतले आहे.
परंतु तुळशीबद्दल आणखी 1 गोष्ट आपल्या धर्म ग्रंथांमध्ये सांगीतलेले आहे जे अनेक बहुतेक व्यक्तींना किंवा लोकांना माहीत नाही आहे. तुळशीला ही 1 वस्तू अर्पण केल्यास तुळशी मातेच्या आशिर्वादामुळे आपल्या जीवनात आनंद व सुखाची भरभराट होते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्यांच्या दारापुढे तुळस हिरवीगार, टवटवीत व बहरलेली असते त्याच्या घरी सुख समाधान व आनंदाने बहरलेले असते. हे बाहेरील तुळस पाहूनच आपल्या लक्षात येते. श्रीहरी विष्णूंना आपण जो नवैद्य देतो त्या नवैद्यमध्ये तुळशीचे पान आवर्जून टाकले जाते.
त्याशिवाय तो नवैद्य पूर्ण होत नाही. श्रीहरी विष्णूंच्या पूजनातही तुळशीच्या पानाचा वापर आवश्य केला जातो. तुळस मातेला लाल रंगांची ओढणी अर्पण केल्यास आपल्या घरात सुख समृद्धी येते. म्हणून तुळस मातेला लाल ओढणी जरूर अर्पण करावी.
तुळशी विवाहाच्या वेळी श्रीहरी विष्णू व तुळस मातेचा विवाह लावल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे कष्ट राहत नाही. अशा व्यक्तींना किंवा लोकांना स्वर्गाचेही प्राप्ती होते. तुळशीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा शिवलिंग ठेऊ नये.
काही घरामध्ये तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलेले असते हे खूप चुकीचे आहे. तुळशीखाली श्रीहरी विष्णूंची शालिग्राम स्वरूप प्रतिमा ठेवावी. काही व्यक्तींना वाटते शालिग्राम म्हणजेच महादेव आहेत. परंतु शालिग्राम म्हणजे महादेव नसून ते श्रीहरी विष्णूं आहेत.
पिंड आणि शालिग्राम यामध्ये फरक आहे. तुळशीच्या वृंदावनात किंवा कुंडीमध्ये इतर कोणतीही रोपे लावू नयेत. आता आपण जाणून घेऊया तुळस मातेला कोणती वस्तू अर्पण करायची असते ते. तुळस मातेला लाल रंगांची छोटीसी ओढणी जरूर अर्पण करावी.
यामुळे तुळस मातेची छाया सदैव आपल्यावर राहते. काही ठिकाणी आपण बघतो तुळस मातेला ओढणी अर्पण केलेली असते. परंतु ती ओढणी धुळमातीने अस्वच्छ झालेली असते. जुनी झाल्यामुळे फाटून जाते, तरीही ती तशीच ठेवलेली असते.
परंतु अशा ओढणीमुळे देवी तुळशीची कृपा नाही तर अवकृपाच आपल्यावर होते. म्हणून आपण जी ओढणी देवी तुळशीला अर्पण करतो ती वेळोवेळी स्वच्छ करावी व ओढणी खराब झाली, फाटली तर ती ओढणी पाण्यात विसर्जित करून नवीन ओढणी आणून तुळस मातेला अर्पण करावी. तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता असू नये.
चपला, बूट तुळशीजवळ काढू नयेत. तुळशीच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ व प्रसन्न असावा. तुळशीला दररोज सकाळी शुद्ध पाणी अर्पण करावे व संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तुळशीची पाने न खाणे कधीही तोडू नयेत. तसेच रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. यामुळे तुळस मातेचा आ शी र्वा द आपल्यावर कायम बरसत राहतो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.