नमस्कार मित्रांनो,
कधी कधी असं होतं की, आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. रात्रीचा दिवस करून मेहनत करतो. परंतु ती आपल्याला मिळत नाही आणि काही गोष्टी ज्यामुळे आपल्याला जवळ जवळ अशक्य वाटते ती आपल्याला सहज मिळते. असं का होतं?
एखाद्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे ते त्याच्यासाठी खूप मेहनत घेतो पण ती त्याला मिळत नाही. आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळेच घडत असते. याचे उत्तर शोधण्यासाठी आपण एक कथा पाहूया. एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णूंना भेटायला गेला. वैकुंठाच्या दाराजवळ सात कबूतर होते.
त्यातील एका कबुतरावर यमाची दृष्टी गेली. ते कबूतर खूप घाबरला आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. इकडे गरुडाने वैकुंठाच दार उघडून यमाला आत घेतले. यम विष्णूंना भेटायला गेला. ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलावून त्याला विनंती केली मला इथून घेऊन जा.
सातासमुद्रापार कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर आला वैकुंठातून की मला घेऊन जाईल. मला घेऊन चल गरुडाला त्याची दया आली आणि गरुडाने मग कबुतराला सातासमुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं. तिथे सूर्याची किरणे पण पोचत नव्हती. ती गुहा दलदलीने भरलेली होती. तिकडे यम विष्णूंशी बोलून वैकुंठाच्या दारात आले.
त्यांनी बघितलं जाताना तर सात कबूतर होते आता सहाच कशी आहेत? एक कबुतर कुठे गेलं मग यमाने गरुडाला विचारलं गरुड म्हणाला तुमची दृष्टी त्या कबूतर पडली ते कबूतर म्हणाला मला सातासमुद्रापार सोड.
मी सोडून आलो ज्या गुहेत गरुडाने कबुतराला सोडलं ती जागा कोंडलेली असल्यामुळे व प्राणवायू नसल्यामुळे त्याचे प्राण गेले. यम गरुडाला म्हणाला मी विष्णू देवाला हेच विचारायला आलो होतो की कबूतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर सात समुद्रापार जाणार असे विधिलिखित आहे.
कसं करायचं पण बघा त्याचा प्राण तिथे जाणार होता म्हणून त्याला तशी बुद्धी झाली. सातासमुद्रापार जायची व त्याचा जीव घुसघुसमटून गेला. तात्पर्य तुमच्या नशिबात नियतीने जे काही लिहिले आहे तसेच होणार. आपण त्यात कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही. आपले भविष्य जाणून घेण्याचे सामर्थ्य वृत्ती आपल्यात नाही आपण अज्ञानी आहोत. पण जर आपल्या इष्ट देवतेची सेवा व भक्त केली तर आपण प्रारंभ बदलण्याचे सामर्थ्य इष्ट देवतेत आहे.
आपण नामस्मरण सेवा केली की, आपोआप आपल्या पुण्यात भर पडते आणि आपली पत्रिकेतील ग्रह दोष जाऊन पत्रिका शुद्ध होते. जे आपल्याला कधीच मिळणार नसतील ते आपोआप तिला झोळीत पडते. म्हणून आयुष्यात प्र पं च करता करता त्यात यश मिळावे म्हणून ईश्वरी शक्तीची सोबत हवी ज्याने आपले नशीब बदलू शकते श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.