तिजोरीमध्ये ठेवा फक्त ही 1 वस्तू पैसा ठेवायला तिजोरी कमी पडेल

नमस्कार मित्रांनो,

आपल्या प्रत्येकाच्या घरात पैसे ठेवण्याची विशिष्ट जागा असते. प्रत्येकाची पहिली इच्छा असते की, आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मीच्या रुपात पैसा कायम भरलेला असावा. प्रत्येकाची इच्छा असते की, त्याची तिजोरी कधीही रिकामी होऊ नये. जर तुमची देखील अशीच इच्छा असेल,

तर या माहितीमध्ये आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्यापैकी तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर तुम्ही देखील लवकरच श्रीमंत व्हाल. याच्यामधली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे पिंपळाचे पान. पिंपळाचे पान शक्यतो खेडेगावात जास्त प्रमाणामध्ये आढळतात.

शहरात काही ठिकाणी आपल्याला ते दिसून येतात. अशा परिस्थितीत आपल्याला ही पान मिळवण्यासाठी फारसा त्रास सहन करावा लागणार नाही. कारण पिपळाचे पान शोधल्याने आपल्याला सहजच मिळतात. मित्रांनो आपल्या तिजोरीमध्ये पिपळाचे पान ठेऊन दिल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात धनाचा फायदा होईल.

यासाठी तुम्हाला पिपळाच्या पानावर थोडस तूप लावून त्यावरती थोडासा सिंदूर लावून त्या पानाना आपल्या तिजोरीत सलग 5 शनिवार ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जाणवेल की, तुमच्या घरात पैशाचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नारळ. प्रत्येक शुभकार्यात नारळ शुभ जातो.

नारळाचा उपयोग प्रत्येक पूजेत केला जातो. हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडले जातात. परंतु नारळाचा उपाय आपल्याला श्रीमंतदेखील बनवू शकतात. जर आपण लाल कपड्यात नारळ बांधून घेतला आणि त्या तिजोरीत किंवा आपले पैसे ज्याठिकाणी ठेवतो त्या जागी जर ठेवलं,

जिथे आपली लक्ष्मी असते ज्या जागी जर ठेवलं तर तुमची आर्थिक समस्या दूर होईल. तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर वाटचाल करायला सुरुवात कराल. तिसरी गोष्ट म्हणजे केसर. शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असतो. आणि हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवसाला धन लक्ष्मीचा दिवस सुद्धा मानतात. या दिवशी लक्ष्मी मातेची जो पूजा करतो,

मातेला जो प्रसन्न करतो त्याच्या घरात पैशाची कमतरता कधीच नसते. जर आपण शुक्रवारी पिवळ्या कपड्यात चांदीची कोणतीही वस्तू, चांदीची कोणतीही वस्तू घेऊ शकता आणि त्यासोबत केसर एकत्र जर बांधून ठेवलं तर तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील. यासोबत जर तुम्ही हळदीची गाठ ठेवली तर उत्तमच.

याने तर लवकर प्रभाव पडेल आणि तुमच्यावर धनाचा वर्षाव होईल. चौथी गोष्ट म्हणजे दहा रुपयांच्या नोटांची गड्डी. तुम्हाला जेव्हा श्रीमंत व्हायचे असते तेव्हा दहा रुपयांच्या नोटांची गड्डी आपल्या तिजोरीत न चुकता ठेवली पाहिजे. असे केल्याने आपली तिजोरी नेहमी भरलेली राहील. ती कधीच रिकामी होणार नाही.

याशिवाय तुम्ही तांबे किंवा चांदीची नाणी देखील ठेवू शकता. कारण जर या गोष्टी तिजोरीत राहिल्या तर आपल्या सर्व समस्या दूर होतात. माता लक्ष्मीच्या कृपेने आपण लवकरच श्रीमंत व्हायला सुरुवात होईल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *