स्वामींनीच माझ्याकडून सर्व काही करून घेतले…एक सत्य घटना

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो महाराजांचे काम करताना मनात किंतु परंतु आणू नयेत सेवा करणाऱ्या सेवेकरांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात ते कसे ते आजच्या या अनुभवातून आपण पाहणार आहोत. हा एक अनुभव एका स्वामी सेवेकरी दादांना आलेला आहे.

ते सांगतात मी एक साधारण टेलर आणि स्वामी महाराजांच्या कृपेने माझे सगळे काही एकदम छान चालेले आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या एक चांगला अनुभव आज मी तुम्हाला इथे सांगत आहे. स्वामी महाराजांच्या दरबारातील पडदे आणि वस्त्र शिवण्यासाठी एका सेवेकरी दादांनी सुरत वरून खरेदी केलेले कापड आणून ते केंद्रात दिले होते.

दरबारातील सकाळची पूजा अभिषेक करणारा सेवेकरी दादांनी नेहमीप्रमाणेच ते कापड माझ्या ताब्यात देऊन ते 13 एप्रिल 2021 म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी आदल्या दिवशीच शिवून देण्यास सांगितले. नेहमीप्रमाणे ते पडदे, आसन झालर सर्व काही कटिंग करून शिवायला सुरुवात केली.

माझ्याकडे आधीपासूनच असलेली सोनेरी लेस वापरून महाराजांचे आसन आणि झालर शिवून झाले आणि नंतर पडद्याला लावायला सोनेरी लेस कमी पडेल असे माझ्या लक्षात आले. माझ्याकडे जेवढे लेस होती तेवढी लेस काढून परत परत मोजून पाहिली पण जवळपास दोन ते तीन मीटर लेस अजुन हवी होती.

बाजारातून लेस आणावी लागणार होते. परंतु लॉक डाऊन मुळे सर्व दुकाने बंद असल्याने अडचण निर्माण झाली. माझ्या ओळखीचे दुकानदार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे चौकशी केली पण उपलब्ध झाले नाही. आदल्या दिवशी 12 तारखेला संध्याकाळी सेवेकरी दादांचा फोन आला.

तेव्हा सर्व काही हकीकत सांगितल्यावर त्यांनी आधीचा एक नवीन पडद्याचा सच आपल्याकडे असून उद्या तोच लावू असे सांगितले. परंतु एका भाविकाने श्रद्धेने पाठविलेले कापड आणि एवढा चांगला मुहूर्त असूनही आपण लावू नाही शकलो.

याची खंत माझ्या आणि दादांच्या मनाला वाटू लागली 13 तारखेला पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सेवेकरी दादा परत माझ्याकडे आला आणि काही वेगळा पर्याय आहे का? असे विचारले. त्यावेळी त्याला सांगितले दोन पैकी एका पडद्याची एक बाजू पूर्ण होऊन दुसरी बाजू अर्धीच होईल.

एवढेच लेस आहे, तरीपण तो म्हणाला जेवढी लेस आहे. तेवढी लावून टाक पण काही झाले तरी उद्या स्वामी जयंती मुहूर्तावर आपण हे पडदे लावूया. हे ऐकून मला आनंद झाला कापड आणि लेस पुन्हा काढले दोन्ही बाजूंच्या पडद्यासाठी दादाची आणि मी लेसचे सारखे भाग केले आणि मनात स्वामींचे नाव घेऊन मी पडदे शिवायला सुरुवात केली.

बघता बघता पडदे तयार झाले आणि नवल म्हणजे तेवढीच लेस संपूर्ण पडद्यावर लावून एक इंचाचा लेस चा तुकडा शिल्लक राहिला होता आणि स्वामी जयंतीच्या दिवशी महाराजांनी दरबारात पडदे लावून घेतले. 14 एप्रिल 2020 स्वामी जयंतीच्या दिवशी जे पडदे लावले.

मी टेलरिंग च्या कामात पण एक वर्षापासून आहे आणि माझा अंदाज अजून तरी चुकलेला नाही. पण इतके मन लावून काम करताना अंदाज चुकणे हे मला तरी शक्य वाटत नाही. महाराजांचे काम करताना मनात किंतु परंतु आणू नयेत सेवा करणारा सर्व सेवेकरांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात.

आजही महाराज आपल्या आसपास आहेत याची प्रचिती आहे माझा अनुभव अनेकांना छोटा वाटेल पण मला अनुभूती देणारा ठरला.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *