स्वामींनी सांगितलेली जीवनाचा उद्धार करणारी उत्तरे पाहून तुम्हीही नक्की चकित व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

१. प्रश्न : परमेश्वराला सर्वात जास्त कोण प्रिय आहे ? उत्तर : श्रीमत् भगवत गीतेंच्या १२व्या अध्यायातील १९ व्या श्लोकात, असे सांगितले आहे की, ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते. जो मिळेल त्यात समाधानी असतो. निवास स्थानाविषयी म्हणजेच प्रपंचाविषयी ज्याला आसक्ती नसते, असा स्थीर बुद्धी असलेला बुद्धीमान पुरुष परमेश्वराला प्रिय असतो.

२. प्रश्न : जो दिसत नाही पण कमालीचे नुकसान करतो असा मनुष्याचा शत्रु कोण ? उत्तर : महाभारतात धर्मराजाला यक्षाने नेमका हाच प्रश्न विचारला होता आणि त्यावर धर्मराजाने दिलेले उत्तर अतिशय समर्पक आहे. जो दिसत नाही; परंतु मनुष्याचे कमालीचे नुकसान करतो तो म्हणजे राग. राग आला की राख होणे निश्चित आहे. राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो.

३. प्रश्न : देव मिळवण्याचा कोणता मार्ग गुरुचरित्रात सांगितला आहे ? उत्तर : गुरुचरित्रात म्हटले आहे माणसाचे मन कायम शंकेने भरलेलं असतं. या शंकेची जागा श्रद्धेने घेतली की तेव्हा देव मिळतो.

४. प्रश्न : आयुष्यात सुखी होण्याचा कोणता मुलमंत्र भगवान श्रीकृष्णाने भगवतगीतेत सांगितला आहे ? उत्तर : भगवान श्रीकृष्ण म्हणतात आयुष्यात सुखी होण्यासाठी त्याला वर्तमानात जगणं गरजेचे आहे. मनुष्य त्यांच्या भुतकाळात रमतो. भविष्याची चिंता करण्यात गुंगून जातो आणि वर्तमानात कायम चिंता ओढवतो. जो काल आणि उद्या मध्ये न जगता फक्त आणि फक्त आजमध्ये जगतो तो सुखी आहे.

५. प्रश्न : जगात असे कोण आहे की त्याचे म्हणणे ऐकावेच लागते ? उत्तर : परिस्थिती. आपले मन एखादी गोष्ट सांगतो तेव्हा मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आई, वडील, मित्र, आप्त, गुरु जेव्हा सांगतात तेव्हाही तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा परिस्थिती बोलते. तेव्हा त्याला त्याचे ऐकावेच लागते. तिच्यावर हुकुम वागावच लागतं.

६. प्रश्न : काय धारण केल्यामुळे अंध:कारातून प्रकाशाकडे सहज वाटचाल करता येते ? उत्तर : ॠगवेदात म्हटले आहे, ॐ भू भूरर्स्व: तसत् …. म्हणजेच प्राणस्वरूप दु:खनाशक, सुखस्वरूप पापनाशक तेजस्वी अशा श्रेष्ठ परमात्म्याला अंत:करणात धारण केले की तो आपल्या अंत:करणात आणि जीवनात प्रकाश निर्माण करतो. आपल्या बुद्धीला सन्मार्ग दाखवतो.

७. प्रश्न : हे ब्रह्मांड अनेक आकाशगंगा मिळून तयार झाले आहे. या आकाशगंगा ज्यात सामावलेल्या आहेत, ते असे काय आहे ? उत्तर : नामस्मरण

आपला श्री स्वामी समर्थावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते .

तसेच आमच्या फेसबुक पेजला ” वायरल मराठी ” याला नक्कीच लाईक करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *