नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ आजचा हा अनुभव नंदुरबार येथे राहणारे स्वामी सेवेकरी योगिता ताई यांचा आहे. या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दात आज तुम्हाला सांगणार आहे. त्या ताई सांगतात की, स्वामींच्या कृपेने मला माझ्या जीवनात एक चांगला मार्ग मिळाला. याच विषयाचा अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे.
मी योगिता नंदुरबारची माझे पती खूप व्यसनी होते आणि जसे तुम्हाला माहिती आहे व्यसनी माणसाला सर्वाधिक प्रिय असते ते व्यसन बाकी गोष्टी त्यांच्यासाठी गौण असतात. तर ह्या व्यसनामुळे त्यांचे आमच्या कुटुंबाकडे पूर्णपणे दु र्ल क्ष होते. मी आणि माझ्या घरच्यांनी त्यांना सुधारण्याचा खूप प्र य त्न केला पण अपयश आले.
हळूहळू मुले ही मोठी होऊ लागली होती. आणि आता माझ्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न समोर आ वासून उभा होता. असेच कसेबसे दिवस पुढे जात होते अशात माझ्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्राची माहिती मिळाली. यांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून आणि सोबतच मला काहीतरी काम मिळावे अशी कामना मनात धरून मी स्वामींची सेवा करू लागले.
या सेवेत दरम्यान हेच दोन मनोदय मनात ठेवून मी एकदा दिंडोरी येथेही जाऊन आले. तिथे मला नारे नाग बली करण्याचा सल्ला मिळाला. मी जेव्हा हा मुद्दा घरी मांडला तेव्हा माझ्या पतीनेच यालाच स्पष्ट शब्दात नकार दिला. माझ्या माहेरकडेही पितृदोष होता. म्हणून मी त्यांना हा विधी करण्याचा सल्ला दिला.
आणि त्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी तो विधी केलाही. मी स्वामींची सेवा न चुकता करत होते. आणि याचे फळ मला मिळाले देखील. मला एके ठिकाणी नोकरीची संधी मिळाली. मी जेव्हा मुलाखतीला जात होते तेव्हा मी केंद्रात जाऊन स्वामींना हार, श्रीफळ आणि खडीसाखर अर्पण करून विनंती केली की, मला या नोकरीची खूप गरज आहे.
तेव्हा स्वामींच्यासमोर असलेले गुलाबाचे फुल अचानक खाली पडले. महाराजांचा आ शी र्वा द म्हणून ते फुल मी सोबत ठेवले. आणि अचानक मला ती नोकरी मिळून माझ्या कुटूंबाचा आर्थिक प्रश्न निवारला गेला. आर्थिक प्रश्न निवारला गेल्यावर मी पतीला कसे मनवले मी सगळा खर्च करते. तुम्ही फक्त सोबत असा.
आणि नारायण नाग बलीची पूजा आम्ही केली हळूहळू गोष्टी मार्गाला लागायला लागल्या. मुलगा मोठा होत होता त्याचा शिक्षणाचा खर्च माझ्या नोकरीमुळे सुटला. आणि एक दिवशी माझ्या नवऱ्याने सा क्षा त्का र व्हावा अशी दारू सोडली. खरचं
अशक्य ही शक्य करतील स्वामी आज माझे कुटूंब एक आदर्श घर आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.