नमस्कार मित्रांनो,
नागु अण्णांना दिली दृष्टी नागू अण्णा मोरगाव चे एक गृहस्थ होते. त्यांची एकाएक नेत्र ज्योती मंद होऊन ते अंधत्वाला प्राप्त होतात. नोकरी जाते, साठवलेले अन्न किती दिवस पुरणार, ते गरीबिनी गांजले जातात. ते तुळजापूरच्या भवांनी माते कडे जाऊन तिला साकडे घालतात आणी कठोर उपासना करतात.
देवी त्यांना साक्षात्कार देउन अक्कलकोटला स्वामींच्या शरणी जा अस सांगते. स्वामी नागू अण्णाला पंढरपूर ला जा अशे सांगतात. अंध नागू अण्णा कशे-बशे प्रवास करत पंढरपूरला पोह्चतात. त्यांना तिथे एक व्यक्ती भेटतो, तो आपले परिचय नेत्र वैद्य म्हणू देतो. तो नागू अण्णाला एका झोपडीत नेऊन त्यांच्या डोळ्यावर शस्त्र क्रिया करुनपट्टी बांधतो.
मग तो म्हणतो: ” नागू अण्णा आता तुम्ही विश्रांती घ्या, सकाळी स्वताच आपल्या डोळ्यावरील पट्टी उघडा. मीआता निघतो” दुसऱ्या दिवशी नागू अण्णा आपली पट्टी उघडतात तर त्यांना सर्व पूर्वी प्रमाणे दिसते. ते विचार करतात की आता त्या नेत्र वैद्याच्या पायावर एकदा डोक ठेऊ आणी मगच परत जाऊ.
पूर्ण गाव शोधले तरी त्यांना कोणी नेत्र वैद्य सापडत नाही. सापडणार तरी कसे, त्या वेळेला डोळ्याचे डॉक्टर सुद्धा नसायचे वैद्य आणी तोही शस्त्र-क्रिया करणारा कुठून भेटणार? त्यांना कळते की स्वामीनी खुद्द येउन त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली असावी. ते लगबगीनी अक्कलकोटला येतात.
पहिले आभार मानतात मग म्हणतात अहो स्वामी तुम्ही इथेच का नाही माझे डोळे बरे केले हो? स्वामी म्हणतात: ” प्रत्येकाची भोग संपण्याची वेळ आणी ठिकाण ठरलेले असतं, त्या शिवाय कुणाचे ही भोग संपत नाही.” नागू अण्णा स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतात. विशेष: या गोष्टीत विशेष म्हणजे स्वामींनी नागू अण्णाच्या डोळ्याचे operation केले.
आपले खगेश नावाचे सभासद आहे, त्यांचे गुरुजी यांचे पण स्वामींनी operation केले होते, ते पण स्वामीनी भौतिक देह त्याग केल्या नंतर. खगेश चे गुरुजी कान्हेरे गुरुजी आहे, मागच्या बातमी पर्यंत तरी ते पुण्यात राहत होते.
ही गोष्ट पण ‘ स्वामीनी केले operation” या topic मध्ये लिहिलेली आहे. रामदास स्वामींच्या मातोश्रींना पण अंधत्व आले होते आणी समर्थांनी त्यांच्या डोळ्यावर हात फिरवून दृष्टी दिली होती. (त्यांच्या आईला वाटले की मुलगा काही चेटकी विद्या शिकून आला आहे. यावर रामदास स्वामीनी काव्यात दिलेले उत्तर जग प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे भुताचे नादी लागलो खरे पण राम नावाच्या भुताच्या नादी लागलो.)
आपला श्री स्वामी समर्थावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते .
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले वायरल मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. वायरल मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.