नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपण स्वामींची सेवा, भक्ती करतो कशासाठी? तर आपण व आपले कुटुंब सुखी समृद्धी राहण्यासाठी आणि महाराजांपर्यंत भक्ती, सेवा केल्याने आपल्याला सुख शांती, समृद्धी सर्व काही मिळते. पण बऱ्याच जणांना असे देखील वाटते की, आम्ही स्वामींची भक्ती, सेवा करतो पण स्वामी आमची इच्छा कधीच पूर्ण करत नाहीत.
पण हे मानणे फार चुकेचे आहे. स्वामी सदैव तुम्हाला जे हवं आहे ते देण्याच्या तयारीत असतात. गरज असते ती फक्त स्वामींना श्रध्देने मानण्याची. तर मित्रांनो 3 अशा गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे.
जे केल्याने तुमची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतील. मित्रांनो तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? तर या गोष्ट आहेत १) मागणे, 2) विश्वास ठेवणे, 3) प्राप्त करणे.
मित्रांनो पहिली गोष्ट आहे 1) मागणे :
आता मागणे म्हणजे काय? तर आपल्याला माहीतच आहे महाराजांचे भक्त असंख्य आहेत आणि प्रत्येक क्षणाला कोणी ना कोणी महाराजांना काहींना काही मागतच असतो. कोणती ना कोणती इच्छा सांगत असतो. आणि आपण पहिली चूक इथेच करत असतो.
आपली इच्छा स्पष्टपणे महाराजांना सांगत नसतो. महाराज तुम्ही तर माझ्या मनातले ओळखताच. तुम्हाला सर्व काही माहीत असते. असे म्हणून देवा माझी इच्छा पूर्ण करा असे म्हणून देतो. होय बरोबरच आहे महाराज मनातलं ओळखतात. पण महाराजांच्यासाठी सर्व भक्त समान असतात.
अशा कोणत्याही एका भक्तांवर लक्ष्य केंद्रित करून नसतात. म्हणून आपलं कर्तव्य आहे की, आपली कोणतीही इच्छा स्वामींना स्पष्टपणे आणि पूर्ण श्रद्धेने सांगणे. आणि फक्त तुम्हाला जे हवं आहे तेच फक्त महाराजांना सांगा.
जे नको आहे त्या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या. दुसरी गोष्ट 2) विश्वास ठेवणे : आता विश्वास ठेवणे म्हणजे काय ? फक्त विश्वास ठेवा अन विश्वास ठेवू नका. आम्हाला असे बरेच युट्युबवर व्हिडिओ दिसले. जे आज सांगितले जाते हा मंत्र रात्री एकदा म्हणा आणि सकाळी च म त्का र बघा. अंघोळीच्या आधी हा मंत्र एकदा म्हणा आणि एका तासाने हे होईल.
हा अंध विश्वास सोडा. खरचं जर एकदा मंत्र म्हटल्याने आपल्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर पूर्वीच्या काळात साधू संतांनी वर्षानुवर्ष तपश्चर्या केली नसती. आणि महाराज पण आपल्याला काय सांगतात तर निरंतर जाप करत रहा फळ मी तुम्हाला नक्कीच देईन.
मित्रांनो महाराजांना कोणतीही इच्छा एकदा सांगितल्यानंतर फक्त विश्वास ठेवा आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. महाराजांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा.
तिसरी गोष्टी म्हणजे 3) प्राप्त करणे :
मित्रांनो आपण बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली गोष्ट सहज भेटल्यावर त्यावर विश्वासच ठेवत नाही. ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आहे हे मान्यच करत नाही. मित्रांनो महाराजांना जे हवं आहे ते मागा. आणि ते मिळेल याचा विश्वास ठेवा.
आणि ते आपल्याला सहज प्राप्त होणार या गोष्टीला मान्य करा. कारण जोपर्यंत आपले मन आणि मेंदू एखादी गोष्ट स्विकारत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्यासाठी अस्तित्वात येत नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण झाली आहे हे ते सतत आपल्या मनाला मेंदूला सांगत रहा.
तेव्हाच महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील. मित्रांनो या गोष्टी योग्यरितीने पाळल्यास तुमची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतील. मागणे, विश्वास ठेवणे आणि प्राप्त करणे या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.