नमस्कार मित्रांनो,
स्वामीमहाराज परब्रम्ह आहेत. अक्कलकोट नगरीत स्वामींनी असंख्य लीला केल्या. स्वामींनी अनेकांना अनुभव दिले. अनेकांच्या समस्या अगदी सहज सुटून गेल्या अ श क्य वाटणारी समस्या जेव्हा सहज सुटून जात. सहाजिकच त्या भक्ताचे मन स्वामीचरणी अधिकच दृढ होत. प्रपंच करता करता चित्त स्वामीचरणी असे आणि कधी एकदा अक्कलकोट येथे जातो आणि स्वामींचे दर्शन घेतो असे त्याला होईल.
स्वामीभक्तहो जेव्हा आपण स्वामींकडे एक पाऊल टाकतो तेव्हा स्वामी आपल्याकडे दहा पावले टाकत येतात असा स्वामींचा महिमा आहे. आणि या स्वामी महिम्याचा अनुभव अनेक भक्तांना येत होता. यातील असाच एक भक्त त्याला कृष्टरोग झालेला होता आणि काही दिवसांपूर्वी स्वामी कृपेने तो बरासुद्धा झाला. त्याची स्वामीचरणी अनन्य भक्ती जडली होती. त्याच्या मनाला सतत स्वामीचरणाची ओढ लागली होती. आणि याच भक्ती भावनेने तो दरवर्षी अक्कलकोट येथे सहकुटुंब स्वामींच्या दर्शनासाठी येई.
असेच एक वेळ तो सहकुटुंब अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी आला आणि आजानुबाहू स्वामींची मूर्ती बघून तो काही काळ समाधी अनुभवतच गेला. परमानंदाच्या अनुभवातच गेला. स्वामींना त्याचा भक्तिभाव आवडला. स्वामींनी सुद्धा त्याच्याकडे प्रेमाने बघितले आणि प्रेमाने बघत बोलले अरे बाळा तुझ्या परसात नूतन औदुंबर वृक्ष रुजला आहे त्याच्याखाली पादुका स्थापन कर. स्वामीभक्तहो अशी स्वामी वाणी होताच त्याला आ श्च र्य वाटले. कारण त्याच्या मागील बाजूच्या अंगणात औदुंबराचे झाडाचे रोपटे काहीही बघण्यात नव्हते.
परंतु जेव्हा तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर बघतो तर खरोखरच त्याच्या अंगणात नूतन औदुंबराचे झाड उगलेले होते. आणि या औदुंबराखाली स्थापित केलेल्या पादुकांना निमित्त करून प्र त्य क्ष दत्तात्रयांचे आगमन आपल्या अंगणात झाले आहे. ही भक्तीची भावना त्याच्या हृदयात दाटून येते. आणि या परमानंदात तो नाच लागतो आणि पुढे स्वामी हुकुमाप्रमाणे तिथे मंदिर बांधून त्यात पादुकांची स्थापना करून सेवा करू लागतो.
आणि पुढे स्वामी महाराज त्याचा प्रपंच त्याची जबाबदारी स्वतः घेतात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या लिलेतून आपल्याला असंख्य बोध मिळत आहेत. आजच्या लिलेत आज आपल्याला आजच्या पिढीला भक्तीचे म ह त्व आणि त्या भक्तीची शक्ती किती मोठी आहे की, ज्या भक्तीच्या शक्तीने स्वतः ईश्वर आपल्याला भेटायला येऊ शकतो याची समज मिळत आहे. बघा या लिलेत वर्णन केल्यानुसार ज्याप्रमाणे त्या भक्ताचा कुष्ठरोग बरा झाला. आणि त्यानंतर त्याची भक्ती वाढू लागली आणि ती इतकी वाढली की प्र त्य क्ष स्वामी त्याच्या घरी आले.
खर तर औदुंबर आणि त्याखाली पादुकांची स्थापना करण्याच्या बहाण्याने स्वामींनी त्याला मी तुझ्या पाठीशी आहे.माझा वास तुज्याच सभोवताली आहे ही प्रेरणा दिली. स्वामीभक्तहो आजही आपल्या बाबतीत असेच घडते आहे. जसे या लिलेत तो भक्त कुष्ठरोगाचे नि मि त्त करून स्वामींकडे आला. अगदी तसेच आपण सुद्धा वै य क्ति क व कौटुंबिक समस्यांना नि मि त्त करून स्वामींच्या सेवेत आलो. जशी त्या भक्ताला स्वामी भक्तीची गोडी लागली अगदी तशीच आपल्यालासुद्धा स्वामी भक्तीची गोडी लागलेली आहे.
आणि पुढे ज्याप्रमाणे स्वामींनी औदुंबराखाली पादुका स्थापन करून त्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. माझा वास नित्य तुज्या सभोवताली आहे. माझे संरक्षण कवच सतत तुज्या सभोवताली आहे हे अभिवचन दिले, त्याला प्रेरणा दिली. अगदी तसेच आजही आपल्याला सुद्धा स्वामी महाराज विविध माध्यमातून अशीच प्रेरणा देत आहेत. अर्थात ही प्रेरणा देण्यासाठी स्वामींनी आपल्यासाठी काय माध्यम निवडलेले आहे हे प्रत्येकाने स्वतः आ त्म चिं त न करून शोधायचे आहे.
कारण हे काहीही असू शकते. उदाहरणार्थ कदाचित काही लोकांच्या जीवनात अशी काही लोक आले असतील की, ज्यांच्याद्वारे स्वामी प्रेरणा देत असतील. काही लोकांच्या जीवनात काही प्रेरणादायी पुस्तक, ग्रंथ आलेले असेल. ज्यातून स्वामीभक्ती वाढते आहे. स्वामी सतत आपल्यासोबत आहेत अशी प्रेरणा मिळते आहे. थोडक्यात ते काहीही असू शकते कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे.
चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे माऊली जशी आम्हाला तुमची गोडी आहे तशीच तुम्हाला सुद्धा तुमच्या भक्तांची तुमच्या बाळांची गोडी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या भक्तांशिवाय राहू शकत नाही. आज आम्ही बालकांना ही समज दिली तुम्हाला धन्यवाद. हे स्वामी आई असेच आमच्या पाठीशी उभे रहा. आम्हाला प्रेरणा द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.