नमस्कार मित्रांनो,
त्या गोष्टी व वस्तु शुभ मानल्या गेल्या आहेत. आपल्यासाठी सकाळ ही दररोजची नवीन असते. ही रोजची नवीन सकाळ नवा आनंद, नवा उत्साह, नवी स्वप्न घेऊन येते. सकाळी उठल्यावर आपल्याला काहीतरी नवीन करण्याची उमेद असते.
असे म्हटले जाते की दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभरात काही तरी चांगल्या गोष्टी घडत असतात. कधी कधी काही नैसर्गिक अशा गोष्टी दिसतात कि ज्या आपल्याला संपूर्ण दिवसाशी निगडित असतात.
चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या शुभ गोष्टी, वस्तू ज्यांचे दर्शन झाल्यावर आपला दिवस चांगला जातो. त्यातली नंबर 1 आहे, सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्याला भिंतीवर सरपटणारी कोळी दिसणे.
तर आपल्यासाठी हा बढतीचा शुभ संकेत आहे. सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. दुसरी गोष्ट सकाळच्या वेळेस गाय आपल्या दारी येऊन हंबरणे. ही गाय शुभसूचक आहे. त्याचा अर्थ असा आहे की देवी महालक्ष्मी स्वतः आपल्या दारी चालत आलेले आहे.अशा वेळी त्या गाईची पूजा करा. तिला खाण्यासाठी पोळी द्या.
नंबर तीन कानात काहीतरी सुवर घुमत असणे. सकाळी उठल्या उठल्या जर कोणत्याही देवळातील घंटीचा आवाज येणे हे फार शुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा की देवाची आपल्यावर अनंत कृपा आहे व त्याचा शुभारंभ झाला आहे.
आपल्या कामांमध्ये सगळे येणारे अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे. आपल्याला घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जर का आपल्या घरात पूजा करण्याचा आवाज आला व जर आरतीचा आवाज झाला तर ते फार शुभसूचक आहे.
चार नंबरची गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत किंवा गच्चीवर कबूतर, पोपट, चिमणी यांसारखे पक्षी चिवचिवत असतील, म्हणजेच पक्षांचा आवाज येणे हा शुभसंकेत आहे.
याचा अर्थ असा आहे की आता आपले चांगले दिवस सुरू होऊ पाहत आहेत. आपल्यावर देवाची कृपादृष्टी आहे. देवाचे दूत पक्षी बनून आपल्याला तो शुभ संकेत द्यायला आले आहेत. आपल्या घरात पक्ष्यांना खाण्यासाठी दाणे व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
नंबर 5 आहे सकाळी शेन, हिरवे गवत दिसणे शुभ संकेत आहे. या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपल्याला दिवस चांगला जातो. या सर्व वस्तूंचे दिसणे आपल्यासाठी शुभसूचक आहे. खरतर सकाळची एक वेळ खूप शुभ आहे.
ती म्हणजे सकाळी चार ते सहा, ही वेळ ब्रह्म मुहूर्ताचे आहे असं म्हटलं जातं. यावेळी देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात. सप्ताहात त्या वेळेस गुरुचरित्राचे पारायण ठेवले जाते. सकाळी चार ते सहा या वेळेत केलेला अभ्यासही मुलांच्या लक्षात राहतो.
असं म्हटलं जातं की, या वेळेस खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते ते थेट आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे या वेळेत केलेले कोणतेही काम चांगल्या एकाग्रतेने होते. अशी एक म्हण आहे ‘लवकर निजे लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभो’’ आरोग्य लाभेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.