स्वामींचे चरण स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या…स्वामींचा तारक मंत्र बघा…

नमस्कार मित्रांनो,

स्वामींचा तारक मंत्र ..एक सिद्ध उपासना.

ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे …जो आजाराने त्रासलेला आहे ,जो चिंतेने ग्रासलेला आहे …ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काय तरी उपाय करताच …स्वामि नी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन … तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी ,तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही …शेवटही ती स्वामींची शक्ती …अगम्य शक्ती …हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते ..

आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ ,शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहेच …या मंत्रात एक कडवे आहे कि “अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी ,अशक्य हि शक्य करतील स्वामी ,,,”फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या … ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती …

तेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि “माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत ,ह्या जगाचा जो एकाच मालक आहे .ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो ,सर्वांचे रक्षण करतो …h असे स्वामी महाराज माझ्या मागे होते …आहेत …आणि राहणारच …तरी मी एक परत विनंती करतो कि सर्व जणानी हा तारक मंत्र म्हणायला सुरवात करावी …

हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन ,अग्गरबत्ती लाऊन त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा …आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वत च अनुभवून …स्वामी सद्देव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही …

कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे कि स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत … ते म्हणतात ना “भगवंताला.. माझ्या, आपल्या… स्वामिना बघायला तशी दृष्टि असावी लागते “…

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र नि:शंक होई रे मना। निर्भय होई रे मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥ जिथे स्वामीचरण तिथे न्युन काय। स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेविन काळ ना नेई त्याला। परलोकीही ना भिती तयाला॥२॥ अशक्य ही शक्य करतील स्वामी । उगाची भितोसी भय हे पळु दे। वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे। जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा। नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥ अशक्य ही शक्य करतील स्वामी । खरा होई जागा श्रद्धेसहीत। कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ। नको डगमगु स्वामी देतील हात॥४॥ अशक्य ही शक्य करतील स्वामी । विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ। स्वामीच ह्या पंचप्राणामृतात। हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती। न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती॥५॥ अशक्य ही शक्य करतील स्वामी । श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु असा हा “श्री स्वामी समर्थ” तारक मंत्र प्रत्येकाने दररोज किमान तीन वेळा किंवा निदान एक वेळा तरी म्हणावा.

तारक मंत्र : गंभीर प्रसंगी तारक मंत्र म्हणत असताना एक अगरबत्ती लावावी व त्या अगरबत्तीची विभूती एका पेल्यातील पाण्यात पडू द्यावी. तारक मंत्र म्हणून झाल्यावर हे पाणी तीर्थ म्हणून प्र|शन करावे तसेच घरातील इतरांनाही द्यावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर आणि कंमेन्ट नक्की करा.

अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *