स्वामींचा हा संदेश नक्कीच तुमचे जीवन सकारात्मक बनवेल.

नमस्कार मित्रांनो,

स्वामी भक्हो नमस्कार अक्कलकोट दरबार म्हणजे स्वामींची कार्यशाळाच होती. चालता बोलता स्वामी महाराज सहज शिकवण देत. स्वामी तिथल्या सेनेकऱ्यांना अतिशय प्रेमाने वागवत असे. सहजा कोणी सेवेकरी चुकला तर स्वामी त्याला नमस्कार हो नमस्कार असे बोलत. तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला नमस्कार घालतो आहे हे बघून त्या सेवेकऱ्याला मरण प्राय दुख होत. आणि तो कान उपटून स्वामींची माफी मागत.

स्वामी भक्तहो अशा पद्धतीने स्वामींच्या लीला सुरू होत्या. समजा काही सेवेकरी पत्ते खेळत आहेत आणि स्वामींनी त्यांना बघितले तर आयुष्य गेले रे गेले अस स्वामी बोलत. व कोणी फुकटच्या बडायक मारू लागला तर स्वामी त्याला बोलत अरे काय रे तुला काय करायचे आहे. इतकेच नव्हे तर कोणी सेवेकरी उंचावर बसला तर स्वामी त्याच्याकडे बघत आणि बोलत अरे खाली बैस. किंवा जर कोणाला ज्ञान हवे असेल तर स्वामी महाराज शिकून जा असे बोलत.

अशा पद्धतीने स्वामींच्या लीला सुरु होत्या. स्वामींच्या या मानव घडवण्याच्या कार्यशाळेतून अनेक लोक घडले. अनेक भक्त घडले. यातच एक परशुराम नावाचा सेवेकरी काशी यात्रेसाठी निघाला आणि स्वामींची आज्ञा घेण्यासाठी स्वामींकडे आला. त्याने आपली इच्छा स्वामींना कळवली. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले की, संत चरणांची माती तिच माझी भागीरथी. स्वामी भक्तहो स्वामींनी असे बोलताच परशुरामाला कळून चुकले की स्वामी आपले गुरु आहेत. स्वामींचे चरणच परम पवित्र तीर्थस्थान आहे.

इतरत्र जाण्याची गरज नाही आणि हा स्वामी संकेत त्याने ओळखला आणि त्याप्रमाणे काशीला जाण्याचा त्याने रद्द केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची स्वामीवाणी खूपच प्रेरणादायी आहे. आजच्या माहितीमध्ये स्वामी मुखातून निघालेल्या अनेक अमृत वचनांचा यांचा संग्रह आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व आजही तुम्हा आम्हा सर्वांना लागू पडत आहे. आणि हम गया नही जिंदा आहे हे स्वामीअभि वचन लक्षात ठेऊन जेव्हा आपल्याकडून काही चूक होईल तेव्हा लगेच समजायचे कि स्वामी आपल्याला नमस्कार हो नमस्कार असे बोलत आहेत.

जेव्हा आपले मन जुगार, वेसन व फेसबुक, व्हाट्सअप व इतर सोशल मीडियासारख्या गोष्टींमध्ये कामाव्यतिरिक्त उगीच टाईमपास करू लागली तर खुशाल समजायचे की, आयुष्य गेले रे गेले असे स्वामी महाराज बोलत आहेत. व चार चौघात आपले मन उगीच बडायगा मारू लागले तर अरे काय रे तुला काय करायचे आहे म्हणजे फुकटच्या बडायगा मारू नकोस आपल्या कामावर लक्ष दे असे स्वामी बोलत आहेत. स्वामी भक्तहो यासह आपल्याला ज्ञान हवे असेल तर मग ते शालेयपासून ते उच्च आ ध्या त्मि क आत्मज्ञानापर्यंत असेल.

तर अशा वेळेला स्वामी आपल्याला शिकून जा असे सांगत आहेत असे खुशाल समजावे. आणि ग्रहणशिल होऊन स्वामी लीला, विविध ग्रंथ, स का रा त्म क पुस्तके आपल्या जीवनातील विविध घटना व विविध लोकांच्याद्वारे मिळणारी संकेत लक्षात घेत स्वामी आपल्याला ज्ञान प्रदान करत आहेत हा विश्वास ठेवून आपले कर्म करायचे आहे. आणि यशस्वी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. ह्यासह पुढे जर आपले मन यशाने उन्नमत झाले, इतरांना तुच्छ आणि स्वतःला श्रेष्ठ समजू लागले तेव्हा अरे खाली बैस ही स्वामींवाणी निश्चितच आपल्याला ऐकू येईल.

तेव्हा खुशाल समजायचे की, स्वामींनी आपल्याला नम्र, अहंकाररहित होण्याची आज्ञा दिली आहे. आणि खरा कर्ता कोण आहे याचे मनन चिंतन करण्याचा हुकूम स्वामींनी दिला आहे. यासह जेव्हा परशुराम काशीस जाण्यास निघाला तेव्हा संत चरणाची माती तिचं माझी भागीरथी हा उपदेश देऊन त्याला स्वामी स्वतः कृपेचा स्तोत्र आहेत. सकारात्मकतेचा स्तोत्र आहेत. मी स्वतः इथे असताना इतरत्र जाण्याची गरज नाही. असे सांगून गुरू साक्षात परब्रह्म ही कृतीशील साधना सांगितली.

हाच तुम्हा आम्हा सर्वांसाठी आजच्या पिढीसाठी सुद्धा संकेत समजून आपण ज्या उद्देशाने तीर्थक्षेत्री स का रा त्म क ऊर्जा ग्रहण करण्यासाठी जातो, तोच उद्देश समोर ठेऊन जर आपल्या सभोवताली संत मंडळी असतील व आपले कोणी मित्र मंडळी, नातेवाई असतील की, जे स का रा त्म क आहेत. ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटते. आपल्याला प्रेरणा मिळते. तर अशा लोकांच्या सानिध्यात राहणे सुद्धा तीर्थक्षेत्र समान आहे.

किंबहुना हेच तीर्थक्षेत्र आहे असे समजावे. थोडक्यात आजही स्वामी त्यांच्या लिलेमधून आपल्याला सकारात्मक आनंदी जीवन जगण्याची समज देत आहेत. म्हणून स्वामी भक्तहो आपल्यासाठी ही स्वामींवणी म्हणजे खजिनाच आहे. या खजिनाचा अर्थ समजून घेण्यासाठी ग्रहनशील व्हायचे आहे. आणि पूर्णपणे ग्रहनशील होऊन ही कृपा प्राशन करायची आहे. आणि स्वामींना अपेक्षीत आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. हा बोध घेऊन आज आपण स्वामींना प्रार्थना करूया.

हे स्वामीराया तुम्ही अक्कलकोट नगरीत सगुण रुपात आलात. अनेक लीला केल्या ह्या लीला आजही आम्हाला अनेक गोष्टी शिकवत आहेत. हे आई तुमच्या मुखातून निघालेला एक एक शब्द म्हणजे अमृताप्रमाणे आहे. जो प्राशन करेल त्याचे कल्याणच होईल. हे गुरुराया आम्ही अल्पबुद्धि आहोत आम्हाला सज्ञानी करा. तुमच्या स्वामीवाणीचा अर्थ समजण्याचा विवेक जागृत करा. तो आचरणात आणण्याची शक्ती द्या. आणि तुम्हाला अपेक्षित यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घ्या. कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *