नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्वामी समर्थ महाराज अनुभव आणि प्रचिती या सदरामध्ये आपले स्वागत. अंगावर शहारे आणणारा सौ दीपा यांचा हृदय स्पर्शी अनुभव…
लातूर जिल्ह्यातील निलंगा सेवा केंद्रा मधील एका स्वामी सेवेकरी ताई चा अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे.
दीपा एका गरीब घरातील मुलगी होती. उपाय ती खूप सुंदर होती. सुशिल होती. बी ए पर्यंत वाचन चांगलं शिक्षण झालं होतं. ती नेहमी स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत असत. स्वामींच्या आशीर्वादाने तिला चांगले स्थळ चालून आले.
मुलगा मुंबईला शेअर मार्केटमध्ये कामाला होता. त्याची चांगली नोकरी होती पगारही चांगला होता. त्यांचा विवाह जमला.
राजा-राणीचा संसार अगदी सुरळीत चाललेला होता. दोघेही समजदार एकमेकांना समजून घेणारे होते दोघात कधीच वाद झाला नाही.
पण अचानक तिच्या नवऱ्याला पॅरालीसीस झाला. डॉक्टरांनी सांगितले होते डोक्याला जास्त तान येऊ देऊ नका. यादरम्यान ते दोघे उपचारासाठी गावाकडे गेले होते.
अचानक तिचा नवरा मुंबईला जावू म्हणू लागला. तो काही केल्या ऐकेना. काही इलाज चालेना चिडचिड चालू झाली. सर्वांनी समजावले पण ऐकायला तयार नव्हता सांगितले होते. महाराज काही सुचत नव्हते.
मग ते मुंबईला जाण्यासाठी निघाले. जाताना गाडीतून बाहेर पाहिले तर महाराज आमच्याबरोबर येताना मला दिसत होते. त्यांच्या पायामध्ये खडावा नव्हता.
मुंबईत जाऊन राहिलो काही दिवस निघून गेले एक दिवशी कामात उशीर झाला. नवऱ्याने पाठीमागून वार केला. तिला खूप लागले. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ती बरी होऊन घरी परतली बॅग भरली आणि मुलांना घेऊन गावी आली.
ती नेहमी स्वामींच्या केंद्रात जात असे तेथे भक्ताने तिला विचारले तू इतकी सेवा करतेस तुला काय मिळाले?
ती म्हणाली, फक्त स्वामींच्या आशीर्वादाने काय मिळाले तिने सांगितले मी जिथे जाईल तिथे स्वामी माऊली माझ्या सोबत असतात. माझे रक्षण करतात मी माऊलींनी सांगितलेली पांढरीची काठी सोबत ठेवते.
त्यामुळे मला कशाचीही भीती वाटत नाही त्या केंद्रातील स्वामी सेवेकरी त्यांनी सांगितलं की तुम्ही कधी या केंद्रामध्ये प्रश्न उत्तर केलीस का तर ती म्हणाली नाही उलट ती बोलली ती माऊली सांगतात तीन अध्याय स्वामी चरित्र नित्य सेवा केली यांचे प्रश्न उत्तर करायची गरज नाही.
सध्या तिचा लोकडाऊन मुळे जॉब गेला. पण ती प्रचिती आली होती की स्वामी पायात खडावा नसताना चालत होते. त्यांना संकेत द्यायचा होता तुझा पुढील प्रवास खडतर आहे. अनवाणी चालावे लागेल.
पण मला समजलं नाही पण स्वामींनी माझी साथ कधीही सोडली नाही असा असतो माऊलींच्या सेवेकर यांचा आत्मविश्वास काहीजण तर थोडी अडचण आली तर रडत बसतात.
सांगायचे एवढेच की निस्वार्थ सेवा हीच खरी सेवा कोणतीही अपेक्षा न ठेवता माऊली सांगतात तुम्ही लोकांची कामे करा स्वामी तुमची कामे करतील.
तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा स्वामी तुमचे प्रश्न सोडवतील. दिपाच्या स्वामीं बद्दलच्या श्रद्धेला आणि आत्मविश्वासला आपला सलाम आणि लवकरात लवकर दीपाला जॉब मिळावे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती.
स्वामी भक्त हो अनुभव कसा वाटला ते नक्की कळवा आणि आवडला तर आमच्या वायरल मराठी पेजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.