स्वामींना समर्थांना शरण जा…अन मानवी शरीराचे सार्थक करून घ्या…

नमस्कार मित्रांनो,

कोणाला कधी म र ण येईल सांगता येत नाही. आणि सध्या करोनाच्या अशा परिस्थितीत तर याची आणखी भिती प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. पण अशात काही पुस्तकं वाचावी विरंगुळा करतांना तो आ ठ व णी त राहील असा करावा.

एकूणात मनुष्य ज न्म सार्थकी लागावा यासाठी काही तरी पर्याय अवलंबावा. यासाठी हिंदीत एक गीत म्हटलं आहे “मनुष्य जनम अनमोल रे, मिट्टी से ना तोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नही कभी नही रे.” मनुष्य जन्म कसा सार्थकी लागेल याची ही एक कथा….

अश्वथामाने ब्राह्मास्त्राचा वापर करून उत्तरेचा गर्भ नष्ट केला. परंतु भगवान श्रीकृष्णाने तो गर्भ पु र्न जि वि त केला. आणि त्यातून पुढे तेजस्वी परीक्षिताचा जन्म झाला. पुढे हा राजा परीक्षित एकदा वनामध्ये शिकारीसाठी गेला होता, शिकार करता करता राजा खूप थकला होता.

तहान आणि भुकेने व्याकूळ होऊन वनात भटकू लागला. त्याला त्या वनात एका ऋषीचे आश्रम दिसले. परीक्षित राजा खूप आशेने आश्रमात गेला. तिथे तपस्वी शमीक ऋषी ध्यानयोगात लीन होते.

राजा परीक्षित तहान-भूकेने व्याकूळ अवस्थेत इकडे तिकडे पाहू लागले. तिथे त्यांचे स्वागत करण्यासाठी कोणीच आले नाही. हे ऋषी जागे आहेत आणि माझी मजा पाहत आहेत असे त्याला वाटले. देशाच्या राजा असून मान न मिळाल्याने, रागात राजा परीक्षिताने जवळच मृत पडलेल्या सापाला आपल्या बाणेच्या टोकावर उचलले आणि ऋषींच्या गळ्यात टाकले.

बाजूला ऋषी पु त्र खेळत होता. त्याने हा प्रकार पाहीला. तो राजा परीक्षिताकडे गेला आणि म्हणाला,” हे राजन तुम्ही राजे आहात देव, देश, गो आणि ब्रा ह्म ण याचे रक्षण करणे हे एका राजाचे परम कर्तव्य असते, ते सोडून तुम्ही एका ब्राह्मण ऋषीची चेष्टा करीत आहात. त्यामुळे मी ऋषीकुमार तुम्हाला शाप देतो आज पासून सातव्या दिवशी त क्ष क नागाचा दंशाने तुमचा मृत्यू होईल”

हे ऐकून शापित राजा परीक्षित आश्रमातून बाहेर पडले आणि वनात भटकू लागला आणि विचार करू लागला कि माझ्या आयुष्यात आता फक्त सातच दिवस राहिले आहेत,
आता मी काय केले पाहिजे? सात दिवसांनी माझ्या या मनुष्य देहाचा अंत होईल. या मानव देहाचे काय बरे प्रयोजन असेल? मानव देह का मिळाला आहे? काय करू नि काय करु नये?

मृत्यूच्या भयाने अस्वस्थ राजा परीक्षित भटकत भटकत गंगा नदीच्या तीरावर आले. तिथे व्यासनंदन गुरू शुकदेवजी महाराजांना पाहिले, तिथे शुकदेवजी सत्संग करत होते.

राजा परीक्षित गुरू शुकदेवजी कडे गेले. त्यांना गुरु वंदना केली पुढे राजा परीक्षित शुकदेवांना म्हणाले ” हे गुरूवर मी एका ऋषीकुमारा कडून शापित असून आज पासून सातव्या दिवशी माझा मृत्यू होणे अटळ आहे आता मी काय करावे? ज्याचा मृत्यू नजीक आहे त्याने काय करावे? मनुष्य जातीचे फलित काय आहे? मृत्यू भय कशाने नष्ट होईल? आता या समयी मी कोणास शरण जावे? माझे काय कर्तव्य आहे? हे आपण कृपा करून सांगावे.”

राजा परीक्षिताचे पश्न ऐकून शुकदेवजी म्हणाले ” हे राजन, जन्मा नंतर मृत्यू अटळ सत्य आहे. परंतु मृत्यूला अभय होउन स्विकारता आले पाहिजे. मृत्यू समयी आपण जे चिंतन करतो. त्यानुसार आपल्याला पुढील गती प्राप्त होते. मृत्यू समयी भगवंताचे स्मरण झाल्यास मोक्ष प्राप्त होतो.” यावर राजा परीक्षित म्हणाले ” हे गुरूवर मृत्यू समयी भगवंताचे स्मरण कसे बरे होईल?”

शुकदेवजी म्हणाले, “अंतिम समयी भगवंताचे स्मरण होणे असेल तर सतत नामस्मरण झाले पाहिजे. नामस्मरण होण्यासाठी नामात प्रिती झाली पाहिजे. नामात प्रिती होण्यासाठी भगवंताच्या लिला चरित्र श्रवण केले पाहिजे. म्हणूनच मी तुला आता श्रीमद भागवत महापुराण ऐकवतो श्रीकृष्णाच्या लीला चरित्राचे श्रवण केल्याने भगवंता प्रती गोडी आणि ज्ञान प्राप्त होते व पुढे हेच मुक्तीचे कारण ठरते.”

अशा तऱ्हेने शुकदेवजी राजा परीक्षिताला सात दिवसात भागवत महापुराण सांगतात. त्यामुळे राजा परीक्षिताला श्रीकृष्णात प्रिती होउन ब्रह्म ज्ञान प्राप्त होते. सातव्या दिवशी भागवत कथा संपते. राजा परीक्षित एका र्निजन स्थळी ध्यान लावून बसतो. मन,इंद्रिये.आणि बुद्धीने श्रीकृष्णाला शरण जातो.

श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे स्मरण करून ब्रह्मलीन होतो. ऋषी शापानुसार तक्षक नाग येउन राजा परीक्षिताला दंश करतो व राजा परीक्षिताच्या शरिराचा अंत होतो. पण आत्मा परमात्म्यात लीन होतो. अशा प्रकारे राजा परीक्षिताची हि मोक्ष कथा.

राजा परीक्षिता कडे तरी सात दिवस होते. सात दिवसाच्या आत तरी त्याचा मृत्यू होणे नव्हते. परंतु आपल्या कडे किती दिवस शिल्लक आहेत सात ,पाच , किंवा एक दिवस एक तास की एक क्षण, काहीच माहित नाही.

म्हणूनच जर आपल्या मनुष्य शरिराचे सार्थक करावयाचे असेल तर भगवंताचे नामस्मरण, किर्तन, लिला कथांचे अध्ययन याला पर्याय नाही. ॐ नमो भगवते वासुदेवाय…!

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर आणि कंमेन्ट नक्की करा.

अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *