नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना गुरू करतो. ज्या देवात ज्या माणसामध्ये आपण श्रद्धा असते, भक्ती असते त्यांना आपण गुरू करत असतो, गुरू करून घेत असतो.
मित्रांनो आपल्याला गुरू करणे शक्य नसेल, कारण गुरू केले तरी त्याचे भरपूर नियम व अटी असतात. नियमांचे पालन करावे लागते. मित्रांनो जर गुरू करता आले नाही किंवा तुमच्याकडून ते झाले नाही तर अशा वेळेस स्वामी समर्थांना किंवा गुरूंना गुरू कसे मानावे?
समजा तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करत आहात. पण तुम्ही स्वामींना गुरू केले नाही आहे. गुरुपद घेतले नाही आहे. तर गुरू कसे मानावे? मित्रांनो यासाठी कोणताही नियम नाही, कोणतीही सेवा नाही, भक्ती नाही.
फक्त स्वामींच्या सांगण्यानुसार तुम्हाला वागावे लागेल. तेव्हाच स्वामी तुमचे गुरू होतील आणि तुम्ही त्यांचे सेवेकरी, शिष्य होतील. यासाठी स्वामींनी काय सांगितले आहे.
यासाठी आपण चांगले कर्म केले पाहिजेत, स्वामींचे नामस्मरण आपण केले पाहिजे. कोणत्याही थोर माणसांचा किंवा आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा आपण मन धुखवले नाही पाहिजेत. त्यांना नाराज नाही केले पाहिजे.
या गोष्टीचे जर आपण पालन केले तर स्वामी आपले गुरुच राहतात. यासाठी वेगळे काही करण्याची किंवा त्यांना गुरू करण्याची विधी नसते किंवा कोणत्या गोष्टीचे होम हावन नसतात. फक्त मनापासून आपण कोणती गोष्ट केली,
समजा मनापासून स्वामींना आजच गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तर आजच तुम्ही स्वामींना जर मनापासून गुरु मानले, स्वामी अजपासून तुम्ही माझे गुरू आहात आणि मी तुमचा शिष्य आहे. तुम्ही सांगितलेले प्रत्येक गोष्टीचे नियमांनी मी पालन करेन.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागेन तर झाले स्वामी आपले गुरू आणि तुम्ही झाला सेवेकरी. फक्त काटेकोर पद्धतीने तुम्हाला स्वामींनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करायचे आहे. स्वामींचे नामस्मरण रोज केले पाहिजे.
कोणाचेही तुम्ही अपमान करू नका. ज्याला मदत हवी आहे मदत करा आणि चांगले कर्म करा. कारण स्वामींना चांगले कर्म आवडतात. जर तुम्ही वाईट कर्म करत आहात आणि स्वामींची सेवा करत आहात तर स्वामी तुमचे कधीच गुरू होणार नाहीत.
आणि स्वामींना ती सेवा सुद्धा आवडणार नाही. चांगले कर्म करा आणि स्वामींचे नामस्मरण करत रहा काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल. स्वामी प्र स न्न होतील
आणि या सर्व गोष्टी करत जा आणि स्वामींना मनापासून गुरू माना. ना कोणत्या पूजा विधीतून .
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.