नमस्कार मित्रांनो,
एकदा 1 माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती तेव्हा तिथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा. जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल. संतांनी सांगितलं जर स्वर्गातील माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल.
सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल. संतांच ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
सर्वांनी हे पाहिले आणि सर्व चकित झाले या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की, काही क्षणातच तू तिथे माती आणली. लहान मुलांनी सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईचा आ शी र्वा द आणि तिच्या पावलामध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो.
तेव्हा संत म्हणाले खर आहे ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमा, आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलेही दानधर्म केल्यानंतरच मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही.
स्वामी प्रिय भक्तहो वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्षांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोलच नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोगाच्या अंगातला ताप निघाला की, त्याला शक्तीचे औषध लागू पडते.
कारण शक्ती येणे हे स्वा भा वि क आहे त्याचप्रमाणे अंतकरण शुद्ध झाले की, परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल.
मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की, इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते. धन, सुख, दारा वेगळे आड येत नाही.
तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आद येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर असक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसणे तो विरक्त, आहे ते परमात्मने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी.
वैराग वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्यामाणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही आपले आप्त कोणी नाही जिथे आपल्याला कुणी मान देत नाहीत अशा ठिकाणी राहून अनुसंधनाचा अभ्यास करावा.
जिथे कोणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते. आपल्या यातना दूर करायचे असतील, आपल्या मनातील घालमेल दूर करायची असेल आणि समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी आपल्या स्वामींचा तारक मंत्राचे तुम्ही पठण करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.