नमस्कार मित्रांनो,
आजचा हा अनुभव एका स्वामी सेवेकरी दादांना आलेला आहे. त्यांच्या शब्दात आज मी तुम्हाला तो अनुभव सांगणार आहे. ते दादा बोलतात श्री स्वामी समर्थ गोष्ट माझ्या लग्नाच्या आधीची आहे. त्यावेळी माझी बायको हि 11 वी मध्ये शिकत होतो.
नागाठाणे पासून अंकलखोप हे गाव जवळपास सहा किलोमीटर असेल. नागठाणेवरून त्यावेळी लोक पायीच तिथे जात. उन्हाळ्याचे दिवस होते परंतु सूर्यदेव आग ओकत होता. अशा या दिवसांमध्ये अंकलखोपला श्री बसवेश्वर मंदिरामध्ये दत्तात्रेय महाराजांचे सात दिवसांचे पारायण चालू होते.
आमची ही आणि तिच्या मैत्रिणी देखील यावेळी पारायणाला बसायचे ठरवले होते. सात दिवसांमध्ये सगळे अध्याय पूर्ण करायचे होते. सोबत स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा अकरा माळी रोज जप करायचा. असा कार्यक्रम होता त्यानंतर सेवा झाल्यावर जवळच पाई असलेल्या श्री क्षेत्र औदुंबर येथे दत्त दर्शनासाठी जायचे असा कार्यक्रम होता.
सर्व मैत्रिणी डबे आणि पाणी सोबत घेतले होते. कधी जेवण औदुंबर मंदिरात तर कधी सभामंडपामध्ये करायची असे ठरले होते. नित्यनियमाने हा कार्यक्रम चालू होता. पाचवा दिवस उजाडला अशा कार्यक्रमाला किंवा पारायणाला बसायचं असेल तर परअन्न आणि दुसऱ्याच्या घरचे पाणी प्यायचे नसते. त्या दिवशी कार्यक्रम संपला सगळ्या मैत्रिणी पायी निघाले होते.
साधारणपणे 3 किलोमीटर चाले असते. पण त्यांच्याकडचे पाणी संपलेले होते. वरील नियमामुळे त्या कुणाकडे पाणी मागू शकत नव्हते. सगळे तहानलेल्या व्याकुळ झालेल्या होत्या. वरून सूर्य आग ओकत होता. सगळ्याजणी एका रस्त्याच्या कडेच्या घराजवळच्या असणाऱ्या झाडापाशी विश्रांती घेत थांबल्या. सगळ्या मैत्रिणी जाताना अनेकदा तिथे आल्या होत्या.
पण तिथे जवळच असलेल्या नळाला कधीही त्यांनी पाणी पाहिले नव्हते. पण जश्या त्या तिथेच थांबल्या एखादा च म त्का र घडावा असे त्या नळाला पाणी सुरू झाले. नैसर्गिक पाणी हे परअन्नमध्ये येत नसते. घरातून काकू आल्या आणि त्या देखील नवलाने नळाकडे पाहत होत्या. अग बया याला कसे पाणी आले ग.
गेले अनेक आठवडे नळाला पाणी नव्हते आले. बरे झाले बाई सगळ्या मुली एकदम खुश झाल्या होत्या. सर्वांनी जाऊन मनसोक्त पाणी पिले त्यांचे सगळ्यांचे पाणी पिऊन झाले आणि नाला कधी पाणी आलेच नव्हते अशा अविर्भावात नळाचे पाणी पुन्हा बंद झाले. घरातल्या मावशी कळशी घेऊन आल्या होत्या.
पण पाणी नाही हे पाहताच त्यांचा चेहरा उतरला. स्वामी म्हणतात तू माझ्याकडे एक पाऊल उचल मी तुझ्याकडे शंभर पावले चालेल. स्वामी महाराज आपल्या भक्तांची तहान नेहमीच भागवतात. मी स्वतः विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. पण मित्रांनो तुम्ही स्वामींना सरळ शरण जा आणि प्रार्थना करा माझी खात्री आहे तुम्हाला स्वामी नक्कीच साथ देतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.