नमस्कार मित्रांनो,
आधुनिक काळात व्यवहारांना अधिक म ह त्त्व आल्याचे दिसते. त्यामुळे बहुतांश गोष्टी हा प्रथमता व्यवहार पाहिला जातो. अगदी नियमितपणे सुरू असलेले नामस्मरण, आराधना, उपासना व भक्तीभाव यामध्येही अनेकदा व्यवहार पाहिला जातो असे पाहायला मिळते.
कोट्यावधी भाविकांपैकी काही हजार श्रद्धाळू निर्मोही आणि निरपेक्ष बुद्धीने तसेच समर्पण वृत्तीने आपापल्या आराध्याला स्मरण पूजत असतात. मात्र कोणतीही आशा अपेक्षा, अट न ठेवता भगवंताला शरण जावे अशी शिकवण प्रत्येक संतांनी आपल्याला दिलेली आहे. आधुनिक काळात अमुक एक गोष्ट मला मिळणार असेल तरच मी एखादी कृती वा गोष्ट करेल अशी अनेकांची धारणा असल्याचे दिसते.
मात्र स्वामी समर्थ महाराज यांनी एका प्रसंगात भक्तीत अटी असाव्यात असा उपदेश दिला आहे. नेमके काय घडले ते आज आपण येथे जाणून घेऊया. स्वामी भक्तहो लता नामक एका तरुणीची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. तिचे बाबा तिचा सांभाळ करत ते स्वामींचे भक्त होते. मात्र लताची स्वामींवर श्रद्धा नव्हती.
बाबा स्वामींचे मोठे भक्त असतानाही त्यांना पत्नीयोग का झाला असावा असा तिला कायम प्रश्न पडत असे. उपवर झाल्यावर लताचा विवाह होऊन ती सासरी जाते. सासरी गेल्यावर लगेच काही दिवसांनी तिचे बाबा आजारी पडल्याचे समजताच ती तातडीने माहेरी येते. वैद्यबुवा शय आणि कावीळ झाल्याचे निदान करतात. अनेक दिवस औषधोपचार करूनही काहीच गुण येत नसल्यामुळे शेवटी लता स्वामींची करुणा बगते.
स्वामी माझ्या बाबांना बरे केले तर मी आजन्म तुमची भक्ती करेल असा संकल्प करते. त्याच दरम्यान बाळप्पाचे लताच्या माहेरी येणे होते. ते तिच्या बाबांचे जुने स्नेही बाळप्पाच्या सांगण्यावरून लता स्वामींकडे जाते छान देवासमोर अटी ठेवा. माझ्या मनासारखे झाले तर मी भक्ती करेन अरे भक्तीत अटी नको. ज्याची भक्ती करतो ज्यांनी जसे ठेवले तसे राहायची तयारी असावी.
अशा कडक शब्दात स्वामी लताची चांगली हजेरी घेतात. लता आपली चूक मान्य करते स्वामी तिला एक मोरपीस देतात. लता ते मोरपिस बाबांच्या उशीखाली ठेवते. लताचे बाबा मनोमन स्वामींची प्रार्थना करतात. स्वामींनी आपल्या मुलीचे पितृत्व स्वीकारावे अशी इच्छा मनोमन प्रकट करतात. स्वामी प्रार्थना मान्य करतात. काही दिवसांनी तिचे बाबा हळूहळू बरे होतात.
बाबा खडखडीत बरे झाल्यावर लता सासरी परतते. काही दिवसांनी बाबा तिच्या सासरी येतात. तिला व जावईबापूंना तिच्या आईच्या श्राद्ध विधींसाठी आमंत्रित करतात. लता माहेरी येते तेव्हा तिला कळते की, तिचे बाबा चार दिवसांपूर्वी अनंतात विलीन झाले आहेत. तिला एकदम धक्काच बसतो कारण दोन दिवसांपूर्वीच बाबा तिच्या घरी गेलेले असतात. ती स्वामींकडे येऊन सर्व वृत्तांत कथन सांगते.
स्वामी म्हणतात की, लता खरे तर तुझ्या बाबांचे आयुष्य तेव्हा संपलं होतं, आम्ही ते तुझ्यासाठी काही वेळ लांबवले. प्रारब्ध आणि सृष्टी नियमात आम्ही बदल करत नाही. प्रारब्ध देवादिकांनाही चुकलेले नाही. सद्गुरूचे कार्य भक्तांना मार्गदर्शन करायचे असते. ज्यामुळे ते कर्माच्या बंधनापासून मुक्त होऊन मोक्षच्या वाटेवर चालू लागतात.
तुझ्या वडिलांनी तुझे पितृत्व आमच्यावर सोपवले होते. आम्हीच तुझ्या घरी बाबा म्हणून आलो होतो. तुझ्या बाबांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्ही तुझे जीवनभर पितासारखेच रक्षण करू असे स्वामी म्हणतात. स्वामींचे बोल ऐकून लता स्तब्ध होते आणि अनन्यभावाने स्वामीचरणी लिन होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.