श्री स्वामी समर्थ लोकांना म्हणतात !!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!!

नमस्कार मित्रांनो,

कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रितीने काम करीत असतो. ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्मच कधीही करू नये. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म प्रवाहात वाहत जात असतो.

मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते.

संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, किर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे.

भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टिकर्त्याचे शक्तिसामर्थ्य आहे. मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्वमीच आहे.

दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन, कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो.

सत्पुरूषांस, योगीयास दान-धर्म केल्याने, दैवी कृपेमुळे पाप कर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करूणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात.

अवतारी पुरूष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऎंशी पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरूषाचे गुरू होणा-या व्यक्तिचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो. या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो.

मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो. परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत.

परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *