नमस्कार मित्रांनो,
मी लहानपणापासून श्री बल्लाळेश्वर गणपतीचा भोळाभाबडा भक्त म्हणण्यापेक्षा वेळ मिळेल तसा गणपती मंदिरात जात असे गणपती या पलीकडे काय असते हे मला ठाऊक नव्हते. नोकरी निमित्त मी नवी मुंबईमध्ये स्थायिक झालो. मला वाटते की माझी मुलगी 2009-10 मध्ये टायफाईडने 5 दिवस ऍडमिट होती. मी तसा हळवा असल्याने मुलगी आजारी असल्याने भावूक झालो होतो आणि आर्थिक चणचण यामुळे तर आणखी खचून गेलो होतो.
मुलगी बरी झाली. काही दिवसांनी मला आठवते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. तशी माझी पत्नी देवभोळी असल्यामुळे आम्ही दर संकष्टीला घरी गणपती अभिषेक करून जमेल तशी पूजा करायचो. माझ्या ऑफिसमध्ये त्यावेळी दर शनिवारी सर्व स्टाफला चेकअपसाठी डॉक्टर यायचे तो शनिवार होता. संकष्टी अडल्यामुळे मला पत्नीने ऑफिसवरून येताना दुर्वा, फुले आणि अभिषेकसाठी लागणारे पुजेचे साहित्य आणायला सांगितले.
मी जेव्हा ऑफिसमध्ये डॉक्टरकडून चेकअप करून घेतले तेव्हा माझा BP खूप वाढला असे सांगितले गेले. ते म्हणाले जाताना एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खात्री करून घ्या. मी फुले मार्केटमध्ये अभिषेकला लागणारे साहित्य घ्यायला गेलो. त्याआधी जवळ हॉस्पिटल होते म्हणून सहज डॉक्टराने सांगितले म्हणून पुन्हा BP चेक करायला गेलो तेथे पण तेच सांगितले की, बीपी खूप High झाला आहे. आत्ताच्या आत्ता ॲडमिट व्हावे लागेल.
घरी पत्नीने नैवेद्यासाठी मोदक करून ठेवले होते मी पूजेचे साहित्य आणले कि, अभिषेक करून नैवेद्य दाखवून उपास सोडायचा होता. मला पण अचानक ऍडमिट व्हावे लागले. त्यामुळे ती संकष्टी आम्हाला खूप कष्ट देऊन गेली सर्व टेस्ट करून मला 3 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. अगदी मुलीचा आजार आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट त्यामुळे मी आ र्थि क दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या खूप खचलो गेलो. मला आठवतं माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी स्वामींच फक्त नाव घ्यायचो.
पण वरच्यावर कारण बल्लाळेश्वर शिवाय मला दुसरा कोणताही देव किंवा संत माहीतच नव्हते. किंबहुना मी मानतच नव्हतो. मला BP च्या गोळ्या सुरु झाल्या. मेडिकलचा खर्च वाढला नंतर एक ना एक असे आ र्थि क ताण वाढतच गेला. त्यानंतर मी ऍडमिट झाल्याचा नंतर पुढची संकष्टी आली. पत्नीच्या सांगण्यावरून आम्ही घरी नित्यनियमाने अभिषेक केला. पण माझे मन पार उडाले होते. मी डिप्रेशनमध्ये बल्लाळेश्वरला खूप घाणेरड्या भाषेत बोललो की, मी लहानपणापासून तुझी भक्ती करतोय आणि तू एकवर एक संकट देतोस तू देव आहेस की कोण, वगैरे.
मी त्या रात्री मी तसाच टेन्शनमध्ये झोपलो. काही तरी पहाटे 4 वाजता मला अचानक जाग आली आणि मी तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठणार तेव्हा मला माझी वाकडी झाल्याचे जाणवले. मी पत्नीला उठवण्याचा प्र य त्न केला पण काहीच शब्द फुटेना. मग मी तसाच निपचित झोपून राहिलो. जवळ जवळ अर्धा तास गेला असेल तेवढ्यात मला स्वप्नात असे दिसले की, मी पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात उभा आहे. मला बल्लाळेश्वर मूर्तीमधून एक सफेद सोहळं नेसलेला पुजारी येताना दिसला. त्याच्या हातात एक मोठी फोटो फ्रेम होती.
ती फ्रेम घेऊन तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, वेड्या मला का शिव्या घालतोस. त्यावेळी त्याने त्या फोटो फ्रेममधील 3 फोटोवर क्रमाक्रमाने बोट ठेवले. पहिले बोट त्याने साईबाबा यावर ठेवून बोलला की, मी इथे आहे. दुसरा बोट गजानन महाराज यांच्या फोटोवर ठेवून तो पुन्हा म्हणाला की, मी इथे आहे आणि तिसरे बोट त्याने जेव्हा स्वामींवर ठेऊन जेव्हा बोलला कि, बाळा मी येथे सुद्धा आहे. झालं त्या क्षणी मला दरदरून घाम आला आणि मी जागा होऊन गणपतीची शमा मागितली.
तेव्हाच कळले की, श्री बल्लाळेश्वर आणि श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. शेवटी सांगण्याचा उद्देश हाच आहे की, आपले भोग आणि प्रारब्ध हे आपल्यालाच भोगावे लागतात. पण आपली श्रद्धा, भक्ती आणि विशेष म्हणजे नीती साफ असेल तर देव स्वतः आपल्या पाठीशी राहतो. मी तसा अजूनही काही त्रास भोगतोय. पण गणपती आणि स्वामींमुळे अडचणी सुटून एक एक श्वास हा त्यांच्या मुळेच घेतोय.
आजचा अनुभव बोध : आपण कोणत्याही ईश्वराची सेवा करा, भक्ती करा गुरुतत्व एकच आहे. कोणी त्याला बल्लाळेश्वर म्हणतं, कोणी श्री स्वामी समर्थ, कोणी येशू वा अल्ला फक्त ज्या नावाने आपण त्याला आवळत ते मनापासून हवं. हृदयाच्या तळापासून त्याला आवळले पाहिजे. जसे सुरेशजींच्या भक्तीत अनन्य भाव होता. त्या अनन्य भावाने मुळे त्या गुरुतत्त्वला स्वप्नात यावे लागले आणि दृष्टांत देऊन सांगितले की, मीच साई, मीच गजानन स्वामी आणि आता मीच स्वामी आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.