नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहेत. यातील महाराजांचे काही भक्त असे आहेत त्यांना महाराजांच्या सेवेचा योग्य तो मार्ग आणि परिणामही मिळाला आहे. परंतु काही भक्त मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे बळी गेले आहेत. आणि अशा लोकांना महाराजांची कित्येक वर्ष सेवा करूनही यश प्राप्ती झाली नाही.
कारण चुकूच्या मार्गदर्शनामुळे लोक महाराजांचे नित्यसेवा ही चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे योग्य ते परिणाम आपल्याला दिसून येत नाही. महाराजांची नित्यसेवा कशी करावी ते आज तुम्हाला या माहितीच्या आधारे सांगणार आहे. महाराजांची नित्यसेवा ही स्वतः महाराजांनी लिहिलेली आहे.
अंधश्रद्धेचा बळी न जाता योग्य ती सेवा करा यश नक्कीच मिळेल. चला तर मित्रांनो ‘सेवा करूया आणि सेवेकरी वाढवूया’
मित्रांनो महाराजांची नित्यसेवा आणि पूजा करणाऱ्यांनी लक्षात ठेवा. महाराजांच्या सेवेच्या आणि पूजेच्या दरम्यान काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. कारण काळा रंग हा नैराश्याचे प्रतिक आहे.
म्हणून महाराजांना हा रंग आवडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांना फक्त अष्टगंधाचा टीका लावा. महाराजांना हळद कुंकू लावू नये. शक्यतो लाल रंगाचे किंवा प्राधान्याने गुलाबाचे फुल अर्पण करा. मित्रांनो महाराजांची नित्यसेवा करत असताना आपण महाराजांचे नामस्मरण करणे याला प्राधान्य दिले पाहिजे.
नित्यसेवा करत असताना रोज नित्य नियमाने 11 माळ जपा. पण आपल्याला शक्य होत नसेल तर दिवसभरातून किमान एकदा तरी 108 वेळा ‘श्री स्वामी समर्थ’ मंत्राचा जाप करत माळ जपा. रोज होत असेल तर ‘श्री स्वामी चरित्र सारामृत’ या पोतीचे पाठोपाठ म्हणजे क्रमशः एक दोन तीन असे अध्याय वाचा.
रोज आपण जे खातो ते महाराजांना द्या. महाराजांची रोज नैवेद्य आरती करा. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले विचार स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा. मास मच्छि खाऊ नका, मोठ्या माणसांचा आदर करा आणि आई वडिलांचे आधार बना. आणि जेव्हा वाटेल तेव्हा वेळ मिळेल तिथे श्री स्वामी समर्थ अस जप करत रहा.
यामुळे सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य आपल्यापासून कधीच दूर होणार नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.