नमस्कार मित्रांनो,
दि. 27 मे 2018 रोजी आमच्या छोटे बंधू यांच्या लग्नानिमित्त कुलदैवत दर्शनासाठी कोल्हापूर येथे गेलो असता सर्व देवस्थानाची दर्शन आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो. आणि परतीचा प्रवास करत असताना दुपारचे जेवण करण्यासाठी आम्ही सर्वजण पुण्याजवळील नारायणगाव येथे थांबलो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर अचानक माझ्या छातीमध्ये असह्य अशा वेदना होऊ लागल्या.
तेव्हा मी नारायणगाव मध्येच तात्काळ हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरांना दाखवले आणि ECG केलं तर रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही सर्वजण पुढच्या प्रवासाला निघालो. प्रवास सुरू असताना माझ्या छातीतील वेदना वाढतच होत्या. जवळ जवळ 3.30 तास प्रवास करून आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर हि त्रास होतच होता. माझ्या छातीत वेदना खूपच वाढू लागल्या माझी पत्नी आणि छोटा भाऊ ह्यांनी माझ्या छातीवर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला.
पण वेदना खूपच तीव्र होत होत्या. गावात डॉक्टर संध्याकाळी येतात म्हणून त्यांची वाट बघत होतो. पण वेदना खूपच तीव्र व्हायला लागल्याने जवळील भगूर येथे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालो. आणि तेवढ्यात गावातील डॉक्टर आले मग त्यांनी तपासले आणि ECG केलं रिपोर्ट बघून त्यांनी तातडीने पुढे जाण्यास सांगितले. मग आम्ही भगूर येथे जाण्यास निघालो जात असताना माझ्या छोट्या बंधूंनी स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांसोबत संपर्क करून सर्वांना घडलेली घटना सांगितली.
त्यानंतर दुसऱ्या गाडीने सेवेकरी सर्व भगूर येथे, भगूर येथे पुन्हा तपासले असता परिस्थिती खूपच बिकट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ECG रिपोर्ट सतत बदलत होते. माझ्या शरीरातून इतका घाम सुरू झाला की, माझे सर्व कपडे ओले चिंब झाले होते. मनातल्या मनात स्वामी जप सुरू होता. त्यानंतर सेवेकर्यांनी मला गाडी टाकून तात्काळ नाशिक रोड येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक रोड येथे सहरा हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले व पुन्हा ECG करण्यात आले.
तेव्हा तर डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले आणि 80% ब्लॉकेज सांगितला आणि शरीरातील महत्त्वाचा 3 नसानी काम बंद केलयं. तेथे गाठ तयार झाली आहे. त्यानंतर रात्री 9 वाजता मला ते तातडीचे महागडे इंजेक्शन देण्यात आले. तोपर्यंत माझे काही नातेवाईक जमा झालेली होती. त्यातील काही डॉक्टर पेशातील असल्याने त्यांनी रात्री 11 वाजता नाशिक येथे व्हिजन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. ऍन्जिओग्राफी व अँजिओप्लास्टी करून आज मी आपल्यासमोर माझा अनुभव सांगत आहे.
खरतर माझ्या हृदयात 80% ब्लॉकेज होते. सकाळी 11 ते 12 वाजलेच मला हृदयाचा झटका आलेला होता. परंतु रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान माझ्यावर हृदयविकारवर उपचार सुरू झाला. खरं तर मला ही स्वतःला खूप आश्चर्य वाटते आहे की, इतकी इच्छाशक्ती माझ्यात कुठून आली. आणि सकाळपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हृदयविकाराच्या तीव्र झटका सामना केला गेला.
खरोखर ही स्वामींची शक्ती आहे. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ह्या स्वामी वाणीचा अनुभव मी व माझ्या कुटुंबियांनी घेतला. सर्व स्वामी सेवेकरी परिवाराने सामुदायिक केलेली प्रार्थना स्वामींनी ऐकली व देव तारी त्याला कोण मारी ह्या अभी वचनाची प्रचिती आली. डॉक्टरांनी सुद्धा आऊट ऑफ डेंजर सांगून हा दैवी चमत्कारच घडून आल्याचं सांगितलं.
आजचा अनुभव बोध : खरतर श्री राजेंद्र नामदेव दळवी ह्यांच्या अनुभवाचे मनन चिंतन केले असता हेच लक्षात येते की, स्वामींवर जेव्हा आपण अतुट विश्वास ठेवतो. स्वामींची भक्ती करतो, स्वामी सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्यात विविध गुण विकसित करत असतात. श्री राजेंद्र नामदेव दळवी ह्यांच्या मध्ये दैनंदिन सेवा करत असताना स्वामींनी तीव्र विश्वास शक्ती, इच्छाशक्ती विकसित केली होती.
आणि ह्या इच्छाशक्तीच्या जोरावर, विश्वास शक्तीच्या जोरावर त्यांनी इतका मोठ्या हृदयविकाराचा सहज सामना केला. त्यांच्या शरिराने डॉक्टरांच्या उपचारास सहज प्रतिसाद दिला. तसेच घरातील सर्व मंडळी, सर्व सेवेकरी मंडळी ह्यांनी केलेल्या सामुदायिक प्रार्थना मुळे ह्या इच्छाशक्तीला अजून बळ भेटले आणि स्वामींनी त्यांना इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढले.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.