नमस्कार मित्रांनो,
सोलापूरमध्ये टीकाजी नावाचे सदाचारी स्वभावाचे पांडुरंगाचे अनन्य भक्त राहत होते. त्यांना दोन मुले होते एकाचे नाव पिराजीराव तर दुसरे विठ्ठलराव दोघेही सरळ स्वभावाचे बुद्धिमान होते. एके दिवशी पिराजीराव स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटी आले. त्यावेळी स्वामी महाराज पटवर्धनांच्या गणेश मंदिरात बसलेले होते.
जेव्हा पिराजीराव स्वामींच्या दर्शनासाठी आले तेव्हा स्वामींचे आजानूबाहू तेजस्वी रूप बघून भारावून गेली आणि स्वामींच्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंगच बसलेले आहे असे त्यांना वाटू लागले. आणि आपण प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतो आहे या भावनेने ते स्वामींचा समोर नतमस्तक झाले. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले स्मितहास्य करत सभोवताली जमलेल्या सर्व मंडळींकडे बघून बोलले अहो यांचा वंश विठ्ठल भक्त परायण आहे.
असे बोलून दुसऱ्याच क्षणाला स्वामींनी आपल्या गळ्यातील हार पिराजीराव यांच्या गळ्यात टाकला. प्रत्यक्ष पांडुरंगाने आपल्याला आ शी र्वा द दिला हा अतूट अभेद्य विश्वासाचा भाव त्यांच्यामध्ये जागृत झाला. स्वामी भक्तहो त्यानंतर त्यांच्या घराण्याची प्रगती झाली. गुरुलीलामृतकार खूप छान वर्णन करत सांगतात की, त्या दिवसापासून या घराण्याचे होत चालले कल्याण वृद्धीस पावले अनुदिन स्वामीराज कृपेने.
पिराजीरावांचे धाकटे बंधू विठ्ठलराव इंग्रज राजवटीत मामलेदार झाले. त्यानंतर श्री मालोजीराजे यांचे पुत्र शहाजीराजे ज्यांना बाबासाहेब असे बोलत. यांनीही विठ्ठलरावांची कारभारी म्हणून नियुक्ती केली. पुढे त्यांच्याकडून अनेक जनहितार्थ कामे झाली. स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या घराण्याचा नावलौकिक वाढला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आजच्या लिलेतून नस्वामी आपल्याला खूप छान शिकवण देत आहेत. जेव्हा पिराजीराव स्वामींकडे आहे तेव्हा त्यांचा भाव शुद्ध होता. त्यांना स्वामींमध्ये पांडुरंग दिसला आणि त्यांचा भाव स्वामींना समजला तेव्हा स्वामींनी जमलेल्या लोकांना यांचा वंश विठ्ठल भक्त परायण आहे असे गौरव उदगार सांगून त्यांच्या भक्तीची स्तुती करत अनन्यभावानेचा स्वीकार केला.
आणि गळ्यात पुष्पमाला टाकून भविष्यातील अनेक पिढ्यांना शिकवण दिली की, कोणी कोणत्याही धर्माचा असुदे, कोणत्याही देवाची भक्ती करत असूदे, सर्वांचा ईश्वर एकच आहे. ईश्वराला मात्र शुद्ध भाव हवा आहे. अशा शुद्ध भाव असलेल्या भक्ताच्या भक्तीचा ईश्वर नेहमी स्वीकार करतो. ईश्वरच त्या भक्ताच्या भक्तीची स्तुती करतो.
आणि त्याच्या पाठीशी उभे राहून त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याणच करत असतो. विकासाच करत असतो ही खूप छान समज स्वामी आज आपल्याला आजच्या पिढीसाठी देत आहेत. स्वामीभक्त हो म्हणून आजच्या लिलेतून प्रेरणा घेत जे जे ईश्वराचे अनन्य भक्त झाले मग ते हिंदू असो व मुस्लिम असो, ख्रिश्चन असुदे व पांडुरंगाचे असू दे किंवा अन्य कोणत्याही देवाची असुदे त्यांच्यामध्ये असलेल्या भक्तीचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे.
त्यांच्या मनात असलेला भक्तीचा भाव समर्पणाचा भाव आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे समर्थ तुम्हाला मात्र शुद्ध भाव आहे. शुद्ध समर्पित भावनेने केलेले प्रामाणिक कर्म हवे आहे. असे केल्याने आमचे कल्याण होते, विकास होतो. ही खूप छान समज आज आम्हा बालकांना दिली तुम्हाला धन्यवाद तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद स्वामी अनंत कोटी धन्यवाद.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.