नमस्कार मित्रांनो,
मी सुरेखा केंद्रे बोलते. मी कळवा येथे राहते. मला खूप खूप मोठे अनुभव आहे स्वामींचे. माझ्या लग्नाला 17 वर्षे झाली होती तरीही मला बाळ होत नव्हते. खूप हॉस्पिटल केले, खूप काही केले शेवटी मग माझी छोटी बहिण पुष्पा केंद्रे तिने मला केंद्रात जायला सांगितले. मग कळव्यात माझ्या घराजवळ स्वामींचे केंद्र होते तेथे मी मग जायला लागले. स्वामींची सेवा हळु-हळु करायला सुरुवात केली.
थोडे दिवसांनी मला बाळ राहिले. 6 महिने झाले मधेच प्रॉब्लेम झाला. माझे बाळ गेले असे 4 वेळा बाळ राहिले आणि 4 वेळा प्रॉब्लेम झाले, बाळ रहात नव्हते. शेवटी डॉक्टर बोलले बस कर आता खूप झाले तुझ्या शरीराचे किती हाल करशील. पण माझा स्वामींवर खूप विश्वास होता. स्वामी कृपेने मला बाळ होणार असे मला वाटायचे. त्यानंतर पाचव्या वेळेला मी प्रेग्नेंट राहिली.
मनात भीती होती काय होणार? स्वामींच्या पुढे मी रडली. स्वामींना मी बोलले..स्वामी तुम्ही मला सांगाच आज..खूप झाले आता माझे बाळ व्यवस्थित होणार की नाही? खूप खूप रडली महाराजांसमोर. त्याच दिवशी स्वामी रात्री स्वप्नात आले आणि मला बोलले बाळ तू आता काही काळजी करू नको तुझे बाळ व्यवस्थित आहे.
तुला काहीच होणार नाही. तुझी डिलिव्हरी व्यवस्थित होईल. त्यानंतर नऊ महिने पूर्ण भरले मला काही सुद्धा झाले नाही. स्वामी कृपेने छान एक मुलगा झाला. आता तो 2 वर्षाचा आहे स्वामींचे अनुभव काय सांगू अजून.
आजचा अनुभव बोध : स्वामी आई आहे. खरोखर सुरेखा ताईंच्या अभेद्य विश्वासाला सर्व स्वामी भक्तांच्या सलाम. वरील स्वामी अनुभवातून आपणास हाच बोध येतो की, आपल्याला अतूट अभेद्य विश्वास ठेवायचा आहे. आपल्या विश्वासाला स्वामी नक्कीच प्रतिसाद देतात. तसे वरील अनुभवात ताईंच्या स्वप्नात स्वामींनी येऊन आधार दिला आणि निशंक राहण्यास सांगितले.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.