स्वामी कृपा होणारच, स्वामींची प्रचिती आली, स्वामींच्या कृपेने इच्छा पूर्ण झाली.

नमस्कार मित्रांनो,

स्वामी भक्तहो नमस्कार आप्पासाहेब हसबनीस नावाचे पुण्यात एक स्वामींचे सेवेकरी राहत होते ते वकिलीचा व्यवसाय करत. त्यांच्यावर स्वामी कृपा होती. स्वामींचे अनेक अनुभव त्यांना आलेले होते आणि म्हणून त्यांची स्वामी चरणी दृढ श्रद्धा होती. आप्पासाहेब हसबनीस आणि त्यांची पत्नी सरस्वतीबाई आणि त्यांच्या मातोश्री हे सर्वही स्वामींची सेवा करत. घरची परिस्थिती उत्तम होती. परंतु त्यांना मूलबाळ नव्हते.

आणि ही खंत त्यांच्या मनात आणि विशेषतः आप्पासाहेब हसबनीस यांच्या मातोश्रींच्या मनात होती. अक्कलकोट येथे जाऊन स्वामींना विनंती करावी असे आप्पासाहेब हसबनीस यांच्या मातोश्रींना वाटले आणि ठरल्याप्रमाणे ते सर्व एके दिवशी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी आले. स्वामींचे दर्शन घेऊन आप्पासाहेब हसबनीस यांच्या मातोश्रींनी स्वामींना हात जोडून विनंती केली की, स्वामी सरस्वतीला पुत्र नसल्याने जहागिरी फुकट जात आहे.

मातोश्रींनी असे बोलताच स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले, अगं या जन्मात तिला काहीच होणार नाही पुढच्या जन्मी तिला मुलगी होईल. स्वामींनी असे बोलताच आप्पासाहेब हसबनीस यांच्या मातोश्री अजून व्याकुळ झाल्या आणि पदर पसरून बोलल्या की स्वामी ती कन्या ह्याच जन्मात प्राप्त झाली तर मी सुखाने डोळे मिटीन. स्वामी भक्तहो स्वामींना व्याकुळतेने हलविले असता स्वामींना ऐकावेच लागते आणि त्याचप्रमाणे घडले. त्या माऊलीची व्याकूळतेची प्रार्थना ऐकताच स्वामींनी लगेच उत्तर दिले की ठीक आहे. ह्या जन्म घ्या.

स्वामींची ही वाणी होताच आप्पासाहेबांच्या मातोश्रींना खूप बरे वाटले आणि स्वामी कृपा होणारच या दृढ विश्वासाने त्या घरी आल्या. आणि स्वामी वाणीप्रमाणेच त्यांना अनुभव आला. पुढील एक वर्षात सरस्वतीने एका सुंदर कन्येस जन्म दिला. पुढे आप्पासाहेब हसबनीस यांनी एक घर विकत घेतले आणि त्यात वर्षभर पुरेल इतकी शिधासामुग्री भरून ती स्वामींच्या चरणी अर्पित केली. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या लिलेतून पुन्हा आपल्याला असंख्य बोध मिळत आहेत. जेव्हा आपण स्वतःसाठी प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना फलद्रूप होते.

परंतु जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपल्या पुण्याईच्या बळाने त्याचेसुद्धा समोरील व्यक्तीला फळ मिळते. आणि अ श क्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात आणि हा खूप छान बोध मिळतो आहे. स्वामी भक्तहो बघा जसे कर्म तसे फळ ह्या कर्माचा नियमानुसार आप्पासाहेब आणि सरस्वतीला ह्या जन्मात संतती प्राप्तीचा योग नव्हता. परंतु आप्पासाहेब यांच्या मातोश्रींचे खरोखर पुण्य कि, त्यांच्या पुण्याईच्या बळाने त्यांनी केलेल्या प्रार्थनेच्या बळाने स्वामींना ऐकावेच लागले. आणि त्यांना फळ द्यावेच लागले.

स्वामी भक्तहो ह्यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्या वेळी ती व्यक्ती सुद्धा स का रा त्म क हवी. जसे आजच्या लिलेत साहजिकच आप्पासाहेब आणि सरस्वती यांना आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावे असे वाटतच होते. किंवा मनोमन ते स्वामींना प्रार्थना करतच होते. आणि ह्यात आप्पासाहेब यांच्या मातोश्रींच्या प्रार्थनेच्या शक्तीने त्यांच्या प्रार्थनेस बळ लाभले आणि उभयंतास कन्यारत्न प्राप्त झाले. म्हणून जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो जर तो स्वतः स का रा त्म क असेल तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील.

जसे एका मुलाचे आई-वडील आपला मुलगा शाळेत पहिला यावा म्हणून प्रार्थना करत असतील. पण त्या मुलाची शाळेत पहिली यावा अशी इच्छा नसेल तर निश्चितच आई वडिलांच्या प्रार्थनेचे परिणाम तात्काळ दिसून येणार नाही. परंतु जर मुलाची शाळेत पहिला यावा ही तीव्र इच्छा असेल तर अशावेळी निश्चितच आई वडिलांच्या प्रार्थना त्या मुलाला मदतनीस म्हणून काम करतील. आणि त्यांना लवकरच परिणाम दिसतील. आजपर्यंत जी जी संत मंडळी होऊन गेली त्या सर्वांनी इतरांसाठीच मागितले. कारण त्यांना हे कर्माचे विज्ञान माहीत होते.

म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या लिलेतून बोध घेता, जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो, दुवा करतो तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदतनीस म्हणून काम करते. आणि अ श क्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि ही समज लक्षात ठेवून जर कुणी दुःखी व पिढीत असेल तर त्याचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामींकडे सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे कल्याण होवो ही प्रार्थना करायची आहे. त्याचे दुःख दूर होऊन त्याला समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे.

निश्चितच आपली प्रार्थना त्यांच्या जीवनावर स का रा त्म क परिणाम घडवून आणेल. आणि कर्माच्या विज्ञानाप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा हजारो पट्टीने वाढवून मिळेल. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे परमपित्या सर्वांचे दुःख दूर करा. सर्वांची संकटे दूर करा. सर्वांना शांती द्या, आरोग्य द्या, ऐश्वर्य द्या, सर्वांना सुखी ठेवा. प्रत्येकाच्या जीवनात अ श क्य वाटणाऱ्या गोष्टी शक्‍य करा. कारण तुम्ही या विश्वाचा चालक-मालक पालक आहात. तुम्ही या ब्रम्हांडातील सर्वात मोठी शक्ती आहात. तुमच्या शिवाय आम्हाला दुसरे कोणीच नाही. आणि हे आई अ त्यं त महत्त्वाचे म्हणजे आम्हाला बालकांना ही प्रार्थना करण्याची सद्बुद्धी दिली ह्या बद्दल तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद स्वामी, तुम्हाला धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *