नमस्कार मित्रांनो,
स्वामी भक्तहो हा अनुभव एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे. त्यांच्या शब्दांत त्यांचा अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या ताई बोलतात नमस्कार मित्रांनो मी सारिका. आम्ही डोंबिवलीमध्ये राहतो स्वामींच्या केंद्रात जाऊन सेवा करणे हे मला खूप आवडते. केंद्रातील आम्ही सगळे सेवेकरी एका कुटुंबाससारखे आहोत. स्वामींचे आम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टीने राहिले आहे.
माझा अनुभव असा आहे की, काही दिवसांपूर्वी आमच्या केंद्रामध्ये चैताली हिला बरं वाटत नव्हते. आणि त्यामुळे तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावे लागले होते. जसजसे दिवस जात होते तशी तशी तिची प्रकृती बिघडत चालली होती. तिला दोन ते तीन दिवसांनी एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.
जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिच्या मेडिकल रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की, फुफ्फुसे 90 टक्के संसर्ग दाखवत होते. विचारणा केली असता डॉक्टर म्हणाले केस सिरीयस आहे. डॉक्टरांनी आम्हाला इतके सांगितले की, तिच्या जगण्याची शाश्वती देता येत नाही. सेकंड ओपिनियन म्हणून आम्ही इतर डॉक्टरांना देखील तिचे रिपोर्ट नेऊन दाखवले.
तेव्हा ते देखील म्हणाले की, खूप सिरीयस कंडिशन आहे आणि काहीच सांगता येत नाही. दोन्ही डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही गॅरेंटी देऊ शकत नाही. आम्ही तिसरे एका डॉक्टरांना भेटलो तेव्हा हे डॉक्टर तर येवढे म्हणाले की, ही मुलगी दोन दिवसांपेक्षा जास्त जगणार नाही आणि काही च म त्का र घडला तरच ही मुलगी वाचेल. आमचे संपूर्ण केंद्र सुटकामध्ये होते. केंद्रातील प्रत्येक जण हा खूप टेन्शनमध्ये होता.
आम्ही हताश उदास बसलो होतो सगळ्यांनी आता आशा सोडली होती. सगळे मिळून आम्ही सगळ्यांनी महाराज यांना खुप प्रार्थना केली. आणि अचानक आमच्या केंद्रातील एक म्हातारी सेवेकरी आले. म्हताऱ्या बाबांना जेव्हा सगळे सांगितले तेव्हा ते म्हणाले सगळे स्वामींच्या हातात आहे आपण काय करू शकतो. तर आपण सर्वांनी तुळशीच्या माळेवर स्वामींचा सामूहिक जप करावा.
सगळ्यांना हा उपाय पटला बाबांच्या मतानुसार प्रत्येकाने त्याच्या कुवतीनुसार माळेवर जप करण्याचा संकल्प सोडला. चैताली जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत रोज प्रत्येक जण महाराजांना जप करणार होता. डॉक्टरांच्या म्हणण्याला आमच्यात आता काही अर्थ उरला नव्हता. कोणी 21 वेळेस, कोणी 25 आणि कोणी 51 वेळा मंत्र म्हणु लागले. तुम्हाला कदाचित भरोसा बसणार नाही पण च म त्का र घडला.
आम्ही सगळे म्हणू लागल्यापासून तीन तासाने डॉक्टरने तिला आउट ऑफ डेंजर सांगितले. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही दुसर्या दिवशी देखील जप चालू ठेवले होते आणि पुन्हा एकदा स्वामींनी कृपा केली. तिला ICU मधून नॉर्मल वार्डमध्ये शिफ्ट केले होते आणि ती आता नॉर्मल आहे असे सांगितले. काही दिवसांनी तिला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आणि ती ठणठणीत बरी होऊन घरी परत आली.
खरोखर श्री स्वामी समर्थ महाराज आणि जपमाळ पठण केल्याने चैताली मृत्यूच्या दारेतून परत आली. खरच स्वामींवर निःशंक होऊन जर श्रद्धा ठेवली तर स्वामी आपल्या भक्तांसाठी नक्की धावतात. स्वामींनी अनेक लीला केल्या आहेत आणि त्यांच्या लीला अखंड चालू आहे. तुम्ही स्वामींच्या भक्तीत लिन होऊन नक्की स्वामींची सेवा करत रहा. स्वामी भक्तहो स्वामींची कीर्ती आणि भक्तांचे अनुभव संपूर्ण जगात पसरावे ही आपली इच्छा आणि ध्येय. आपल्या स्वामींचे अनुभवांना खूप छान प्रतिसाद मिळत आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.