स्वामी भक्तांची परीक्षा का घेतात? अतिशय मोलाचा संदेश देणारी स्वामींची लीला

नमस्कार मित्रांनो,

एकेदिवशी स्वामी महाराज राजेसाहेबांच्या अंगणात फिरत होते. त्यावेळेला एका होजऱ्याच्या हातात सोन्याचा चौफुला असलेला स्वामींनी बघितला आणि लगेच हिसकावून घेतला. त्या अंगणाच्या समोरच खोल विहीर होती. स्वामींनी चौफुला हातात घेऊन राजेसाहेबांकडे बघितले आणि बोलले चौफुला विहिरीत टाकू तेव्हा राजेसाहेबांनी अतिशय नम्रपणे हात जोडून स्वामींना विनंती केली की स्वामी चौफुला आपलाच आहे.

आपण त्याचे पाहिजे ते करावे. हे ऐकून स्वामींनी चौफुला लगेच विहिरीत फेकून दिला. स्वामी भक्तहो चौफुला सोन्याचा होता. आणि म्हणून तेथे उपस्थित अनेकांना याचे वाईट वाटले. परंतु राजेसाहेबांची स्वामींच्या चरणी दृढ निष्ठा होती. स्वामींच्या सामर्थ्याबद्दल राजेसाहेबांना पूर्णपणे जाणीव होती. असो त्या रात्री स्वामी महाराज राजेसाहेबांच्या वाड्यातच राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी महाराज पुन्हा अंगणात आले आणि आपल्या बाललीला करू लागले. त्या वेळेला राजेसाहेब सुद्धा तिथेच होते. स्वामींनी राजेसाहेबांनाकडे बघितले आणि बोलले अरे तो पोहरा आण इकडे स्वामी हुकूम म्हणून राजेसाहेबांनी स्वामींकडे पोहरा आणि दोर आणून दिला. स्वामींनी पोहरा विहिरीत सोडला आणि लगेच बाहेर काढला.

तो चमत्कार असा की, त्या पोहऱ्यात टाकलेला सोन्याचा चोफुला बाहेर निघाला. इतकेच नाही तर जेव्हा चौफुला बघितला तर त्यात असलेले लवंग, वेलदोडे जसेच्या तसे कोरडे असल्याचे दिसले. खर तर चौफुला रात्रभर पाण्यात होता. त्यातील वस्तू भिजायला हव्या होत्या पण तसे काय झाले नाही. स्वामींचा हा चमत्कार बघून सर्वांना आश्चर्य वाटले. आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नामाचा जय जयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

आजच्या लिलेतून स्वामी आपली कशी परीक्षा बगतात, टीव परीक्षेच्या काळात कसे आपले संरक्षण करतात आणि आपल्याला योग्य धडा शिकवून पुन्हा सहीसलामत बाहेर काढून आपल्या अतूट श्रद्धेला न्याय देतात हा खूप छान बोध स्वामी आज आपल्याला देत आहेत. स्वामी भक्तहो आपल्या जीवनात कधी कधी कठीण वेळ येते. ही कठीण वेळ म्हणजे आपला परीक्षेचा काळ असतो.

आपल्याला या परीक्षेच्या काळात सुद्धा राजेसाहेबांसारखा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. स्वामींच्या सामर्थ्यावर संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आणि आपल्या मनाला सतत सांगायचे आहे की, हे मना स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहे. हे संकट म्हणजे विकासाची शिडी आहे. ह्यातून स्वामी आपली तयारी करवून घेत आहे. तुझा स्वामी चरणांवर विश्वास दृढ असू दे. स्वामी भक्तांच्या श्रद्धेला न्याय नक्कीच देतात.

स्वामी भक्तहो बघा जसे स्वामींनी पोहरा स्वतः विहिरीत सोडून चौफुला बाहेर काढला आणि रात्रभर पाण्यात पडून सुद्धा लवंग, वेलदोडे भिजले नाही. ते जसेच्या तसे बाहेर निघाले अगदी तसेच आपल्याला सुद्धा स्वतः स्वामी सहीसलामत संघटनेतून बाहेर काढतात आणि आपल्या विश्वासाचे भक्तीचे करतात. असा अनुभवी चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया.

हे भक्तोवत्सला तुम्ही आमचे चांगलेच करत आहात. ह्या आमच्या श्रद्धेचे संरक्षण तुम्ही करत आहात ही समज आज आम्हाला दिली. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही आमची परीक्षा घेतात ह्यात आमचेच कल्याण आहे. ह्यात आमचाच विकास आहे. ही समज दिली तुम्हाला धन्यवाद। हे आई असेच आम्हा बालकावर प्रेम करा. कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *