स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि मोठीमोठी ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करत आहेत

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी म्हणाले अरे ह्या जैनास आणि बोड्कीस काय भितोस? गंगा आण आणि टाक आमच्या अंगावर. अक्कलकोट नगरीत स्वामी महाराज असंख्य लीला करत होते. स्वामी महाराज प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन करत असत. अक्कलकोट दरबारात चोळाप्पा आणि सुंदराबाई यांचे मुख्यत्वे वर्चस्व होते. स्वामी महाराज चोळाप्पा यांना जैन नावाने हाक मारत आणि सुंदराबाईला बोडकी म्हणून हाक मारत.

त्या दोघांमध्ये श्रेय घेण्यासाठी नेहमीच चढाओढ लागली आणि यातूनच कधीकधी वाद सुद्धा होत. परंतु तेथे जे निष्काम निश्चिम स्वामी भक्त होते त्यांची ह्या सर्व प्रकारांमध्ये कधीकधी पिळवणूक होत असे आणि ही पिळवणूक सुरू झाल्यास स्वतः स्वामी हस्तक्षेप करत. आणि आपल्या निश्चिम भक्तांचे रक्षण करत. त्याच्या अनन्य भक्तीला न्याय देत. असेच एकदा श्री वामन बुवा यांना वाटले की, उद्या आपण प्राप्तकाळी स्वामींना गंगेच्या पाण्याने स्नान घालावे.

आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वामन बुवा पहाटे लवकर उठले. स्वामींच्या दरबारात आले. तेव्हा स्वामीरायांची स्वारी स्नानासाठी बसलेली होती. वामन बुवा यांनी गंगाजलाने भरलेले भांडे आपल्या हातात घेतले आणि हे गंगेचे पाणी स्वामींच्या अंगावर ओतण्याच्या तयारीत होते. तेव्हा तेथे असलेले चोळाप्पा आणि सुंदराबाई यांनी श्री वामन बुवांना हठकवले आणि त्यांना गंगाजल अर्पण करण्यास मज्जाव केला.

त्या वेळेला वामन बुवांना खूप वाईट वाटले आणि ते बाजूला जाऊन उभे राहिले. आणि हा सर्व प्रकार स्वामींनी बघितला. श्री वामन बुवा यांच्या मनात स्वामी बद्दल अनन्य भाव होता. अत्यंत अनन्य भक्तीच्या भावनेने त्यांना स्वामींना स्नान घालायचे होते. आपले स्वामी भक्तवत्सल आहेत. स्वामींना आपला भाव समजतो.

श्री वामन बुवा यांच्या मनातील भाव स्वामींना समजला आणि स्वामी महाराज चोळाप्पा आणि सुंदराबाईवर अत्यंत क्रोधित झाले. आणि श्री वामन बुवा यांच्याकडे बघून बोले अरे ह्या जैनास आणि बोड्कीस काय भितोस? गंगा आण आणि टाक आमच्या अंगावर प्रत्यक्ष ब्रह्मांडनायकाचा असा हुकूम आल्यानंतर चोळप्पा आणि सुंदराबाई शांतच झाले. त्यानंतर श्री वामन बुवा यांनी मोठ्या प्रेमाने स्वामींना गंगा स्नान घातले.

त्यानंतर रेश्मी वस्त्र महाराजांच्या अंगावर घातले आणि अतिशय आनंदने आपल्या घरी परत आले. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या स्वामीवाणीतून स्वामी आपल्याला अनन्य भक्तीची प्रेरणा देत आहेत. आजच्या लिलेत चोळाप्पा आणि सुंदरबाई हे आपल्याच मनातील न का रा त्म क विचार, भावना, न का रा त्म क सवयींचे प्रतीक आहे. आणि श्री वामन बुवा हे शुद्ध स्वामी भक्तांच्या भावनेचे प्रतीक आहे.

या लिलेचे जर आपण मनन चिंतन केले तर स्वामी आपल्याला असंख्य बोध देतात. पैकी स्वामी आपल्याला सांगतात की, जेव्हा जेव्हा आपल्या मनात अनन्य भक्तिचा भाव येतो आणि आपण त्याची अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्यात असलेले नकारात्मक विचार त्याला आडवी येतात. ते न्यूनगंडाची भावना निर्माण करतात, भीतीचे भाव निर्माण करतात आणि आपल्याला अभिव्यक्ती करण्यापासून परावृत्त करतात. अशा वेळेला जैनास आणि बोड्कीस काय भितोस.

म्हणजेच अरे या न का रा त्म क मनाला घाबरतोस कशाला तू माझा बाळ आहेस. तुझ्यात साहस खचखचणून भरलेले आहे. घाबरू नकोस तुझे प्रामाणिक कर्म कर मी तुज्या पाठीशी आहे. तुला यश निश्चित आहे. यासह आजच्या स्वामीवाणीचे आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण द्यायचे झाले तर समजा एखादा विद्यार्थी संकल्प करतो की, त्याला पहिला क्रमांक आणायचा आहे आणि तो अभ्यासाला सुरुवात करतो.

परंतु समजा त्याला यापूर्वी काही विषय अवघड गेले असतील तेव्हा त्याचे न का रा त्म क मन त्या अवघड विषयाबद्दल सतत बडबड करते. तो विषय किती अवघड आहे आणि या पूर्वीच्या अनुभवाची चित्रफीत डोळ्यासमोर निर्माण करून त्याला अजून त्या विषयाबद्दल भय निर्माण होते आणि वेळीच या न का रा त्म क मनाला सावरले नाही तर याचा परिणाम म्हणजे पहिला नंबर आणायचा आहे.

हा त्याच्यामध्ये असलेला जोश उत्साह कमी होईल आणि शेवटी त्याचे ध्येय साध्य होणार नाही. म्हणून आजच्या लिलेचे आपल्याला सतत स्मरण करायचे आहे. स्वामी आपल्या पाठीशी आहे. हा अतूट अभ्याध्य विश्वास ठेवून मोठी मोठी ध्येय साध्य करायची आहे. चला तर मग आज आपण प्रार्थना करूया. हे ब्रह्मांडनायका जेव्हा माझे मन संकटासमोर हात टेकवते जेव्हा मी पूर्णपणे खचून जातो तेव्हा हे समर्था तुम्ही स्वतः येतात माझ्या खांद्यावर हात ठेवतात आणि बोलतात अरे बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

हे गुरुराया जेव्हा तुमचे हे अभय वचन माझ्या कानी पडते तेव्हा माझ्या मनात अनन्य भक्तीचा संचार होतो. माझा आत्मविश्वास उंचावतो आणि माझ्याकडून उत्कृष्ट कर्म करून घेऊन शेवटी सर्व संकटांना गुडघे टेकण्यास भाग पाडतात. हे आई तुम्ही किती प्रेम करतात तुमच्या बाळांवर..! तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद आई तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *