नमस्कार मित्रांनो,
माझ्या बालपणीची मैत्रीण तिचं ही नाव राजश्री. आम्हा दोघींची अगदी घट्ट मैत्री. समजत नव्हतं तेव्हापासूनची आमची मैत्री. लंगोटीयार म्हणा ना. तिचे वडिलांचे गुरु सहस्त्रबुद्धे महाराज. ते आम्हा दोघींना अगदी कळत नव्हतं तेव्हा पासून पुण्यात सहस्त्रबुद्धे महाराजांचा मठ आहे. कर्वे रोडला तिथे घेऊन जात असत. नंतर आम्ही दोघी चौथीला गेल्या पासून एकट्याच पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या स्वामींच्या मठात जायला लागलो.
तेव्हा आली लहर की, स्वामींच्या दर्शनाला बुधवार पेठेतल्या मठात जायचो. मग 5 वी गेलो व तेव्हा पासून स्वामींचा गुरुवार उपवास दोघींनी करायला सुरुवात केली. मग स्वामींचं वेडच लागलं. मंडईत गेलो की, जा स्वामींना. तुळशीबागेत गेलो की, जा स्वामींना. मग दोघींनी स्वामींचा जप करायला सुरवात केली. मनाला येईल तेव्हा दोघी जनी जपाची माळ घेऊन जप करायचा.
किती जप केला हा हिशोबच कधी ठेवला नाही. फक्त जप. पोथी वगैरे नाही मग सवय झाली की, काहीही झालं की स्वामींना मठात येऊन सांगायचं. आनंदाची गोष्ट असू दे की, शाळेत काही झालेलं असू दे किंवा मैत्रिणी मध्ये काही झालेला असू दे. माझी मैत्रीण राज्यश्री व मी दोघी मठात स्वामीं जवळ अकरावीला गेले तेव्हा मला एक स्थळ आलं इचलकरंजीचे गरगट्टे. मी तेव्हा सोळा वर्षांची फक्त.
स्थळ चांगलं होतं. माझी आई आणि मावशी काही ऐकायलाच तयार होईना. मी म्हणायचे मला लग्नंच करायचे नाही. दोघी माझ्याशी 8 दिवस बोलल्या नाहीत चकार शब्दही नाही. माझी मैत्रीण राज्यश्री ती पण आई व मावशीच्याच बाजूनी बोलायची. आता काय करायचं? मला फक्त एकमेव आधार स्वामींचाच होता. स्वामींशिवाय माझं कोणीच नाही. मग काय त्या दिवशी बुधवार पेठेतल्या स्वामींच्या मठात दुपारी 4 वाजता गेले. मठात कोणीच नव्हतं. बसले स्वामीं समोर.
स्वामींना सगळं सांगितलं. मग कितीतरी वेळ तशीच बसले होते स्वामींकडे बघत, एकदम सुन्न. मागून अचानक एक बाबा आले. एकदम उंच साडेसहा फूट उंची असेल त्यांची. खूप गोरे व खूप तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. पांढरं सोहळं नेसलेले. भरदार छाती, हातपाय एकदम गोरे व गुलाबी. माझ्या जवळ आले तेव्हा चंदन मिश्रित अष्टगंधाच्या सुवासाची झुळूक आली. मी खाली बसलेली. माझ्या मागून आले व डोक्यावर त्यांचा हात ठेवून म्हणाले, काही काळजी करू नकोस सगळं ठीक होईल ऐवढंच म्हणाले. मी मान वर करून बघितलं.
डोळे डबडबलेले तर, हसले माझ्याकडे बघून. उठले पटकन व त्यांच्या पाया पडणार तेवढ्यात ते निघाले. मी त्यांच्या मागे पळत गेले तर नंतर ते दिसलेच नाहीत कुठे गायबच झाले. बाहेर दोन जणं बसले होते. त्यांना विचारलं इथे एक बाबा आले होते त्यांना पाहिलं का तर ते दोघे ही म्हणाले येथे बाहेरून आता कोणी आलाच नाही. आम्ही इथेच बसलेलो होतो. मग लक्षात आलं ते स्वामीच होते. तो आनंद काय सांगावा मी. मग एकदम बांध फुटला व खूप रडले ढसाढसा स्वामींजवळ.
घरी आले तर माझ्या आईने मला मिठीच मारली. मला म्हणाली, नाही करत तुझं लग्न. तुला बळजबरी नाही करत आहेत की, नाही आपले बाबा धावून येणारे. कुठलाही भक्त दुःखात असू दे की, संकटात बाबा हाकेला धावून येणारच. तुम्ही फक्त बाबांना आर्ततेने साद घाला न् मग बघा तुम्हालाही कसे अनुभव येतील. बाबांचे लगेच चाळसेंच स्थळ आलं. ते 2 वर्षे थांबले. माझ्या आईने तरी 19 वर्षी माझं लग्न केलंच तो भाग वेगळाच
आजचा अनुभव बोध : स्वामी हे गुरुतत्व आहे हे गुरुतत्व आजही सगुण रूपात दर्शन देत आहे विविध शरीरातून आधार देत आहे आणि मार्गदर्शन करत आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.