स्वामी आरोग्यदाता आहेत.

नमस्कार मित्रांनो,

मी सागर सुर्यकांत डहाळे राहणार नांदेड महाराष्ट्र. माझा एक अनुभव शेअर करतो, मी खूप दिवसांपासून एक व्याधीने त्रस्त झालो होतो. सर्व काही केले मोठ्यात मोठी हॉस्पिटलमध्ये माझा इलाज केला, हैदराबादमधील नामांकित हॉस्पिटल अपोलो, औरंगाबाद मधील कामलनयन बजाज, नांदेडमधील जवळपास 12 ते 15 हॉस्पिटल्स मला अचानक चक्कर यायचे. फार फार डोके दुखायचे व BP पण कमीत कमी 180 ते 200 राहायचा

अपोलोमध्ये माझ्यावर बरेच प्रयोग केले ते सांगायचं की, मला शुगर, BP व अंगात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहे. मला बाइक चालवताना मला फार घबराहट होत असे. मी बाईक चालवू शकत नसे. माझे कामच बाईकवर मार्केटिंगचे होते. जवळपास एक वर्षापासून माझे काम बंद झाले. घरात 3 लेकरे, 1 बायको, आई वडील लहान भाऊ असा आमचा परिवार. मी तो इलाज जवळपास 1 वर्षे भर केला तरी माझा प्रॉब्लेम कोणीही डॉक्टर बरा करू शकला नव्हता.

माझी आई व लहान भाऊ स्वामी सेवेकरी होते. भाऊ रोज सकाळच्या 8 च्या आरतीला नित्यनेमाने जात असे. मला रोज म्हणायचं तू माझ्यासोबत स्वामींच्या दरबारात येऊन तर बघ त्यांना आपला त्रास सांगून तर बघ. मग मी पण ठरवले त्याच्या सोबत रोज 8 च्या आरती ला जाण्याचे. मी रोज स्वामींना आपले गाऱ्हाणे सांगायचो असे मी 3 महिने त्याच्या सोबत न चुकता जायचो. अचानक माझी प्रकृती मध्ये बदल होण्यास सुरुवात झाली.

मी रोज स्वामी समर्थ सारामृत व 11 माळी जप करायचो. काही दिवसातच मला पहिल्यासारखे बरे वाटायला सुरवात झाली. मी स्वतः बाईकने जात असे व माझे बंद पडलेले काम करायला चालू केले व आजही मी माझे बॉडी चेकअप केले तर माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल निघाले. शुगर व BP मुळापासून स्वामींनी घालविली.

मी हा छोटासा अनुभव आपणा सर्वांना शेअर करतो. स्वामी सदैव आपल्या सोबत असतात व आपल्या आजारांना मुळापासून नाहीशी करतात. श्री स्वामी समर्थ मला जमेल तसे मी लिहिले काही चूक झाल्यास क्षमा करावी. पदोपदी मला स्वामींची प्रतीती येत राहिली.

आजचा अनुभव बोध : निरंतरतेने आणि तळमळीने स्वामींना आळवणे खूप महत्त्वाचे आहे. हेच आपणास श्री सागर यांच्या भक्तीतून समजते आहे. निरंतरता आणि तळमळ ठेवली असता स्वामींना ऐकावेच लागते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *