नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदू धर्मात सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. कारण सर्व देवांमध्ये सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोनच देव आहे जे आपल्याला दररोज दर्शन देतात. यामुळे या देवांचे जर पूजन केले तर त्याचे फळही लगेचच मिळते.
वैदिक काळापासूनच सूर्य देवाचे पूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. ब्रह्मपुराण विष्णुपुराण व अशा कितीतरी धर्मग्रंथांमध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करण्याविषयी सांगितलेले आहे. अशी मान्यता आहे की, सूर्य देवांच्या पूजनाने कितीतरी प्रकारच्या रोगांचा व दुःखांचा नाश होतो.
पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा श्रीहरी श्रीविष्णूंनी राम अवतार धारण केला होता त्यावेळी ते स्वतः आपल्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवाला जल अर्पण करून करीत असत. सूर्यदेव साक्षत दर्शन देतात. म्हणूनच त्यांचे पूजन विशेष मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तींच्या कुंडलीतही सुर्य ग्रहाला जेष्ठ ग्रहाचा दर्जा दिला जातो.
ज्या जातकाच्या कुंडलीत सुर्यदेवांची स्थिती कमजोर असेल किंवा त्यांचा ताप अधिक असेल अशा जातकांने सुर्यदेवांना नियमित जल अर्पण करणे आवश्यक आहे. परंतु काही वेळा असे होते की दररोज नियमितपणे जल अर्पण करूनही काहीही फायदा होत नाही. अशा वेळी व्यक्तींचा अशा उपायांवरील विश्वास उडू लागतो.
परंतु हे योग्य नाही. असेही असू शकते की, तुम्ही जो काही उपाय करीत आहात त्यात काहीतरी त्रुटी राहत असेल किंवा तुमची करण्याची पद्धत चुकीची असेल त्यामुळे तुम्हाला त्याचे योग्य फळ मिळत नसेल. आज मी तुम्हाला सुर्यदेवांची पूजन करण्याची अशी एक पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल.
तुमचे शत्रू तुमचे मित्र होतील व तुमच्या प्रगतीचे किरणे सूर्याच्या किरणाप्रमाणे सगळीकडे पसरतील. चला तर पाहूया तो उपाय. सर्वात आधी सूर्यदेवांना जल अर्पण करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नानाधी करणे आटोपून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. नंतर एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात थोडेसे गंगेचे पाणी घ्यावे.
त्यानंतर त्यात एक लाल फूल अक्षता व किंचित खडीसाखर त्या पाण्यात टाकावी. त्यानंतर सूर्यदेवांना नमस्कार करावा आणि ज्यावेळी आपण ते जल सूर्यदेवांना अर्पण करतो त्यावेळी ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा उच्चार करावा. त्यानंतर सुर्यदेवांकडे प्रार्थना करावी व त्यांना सांगावे की, हे सूर्यदेवा ज्याप्रमाणे तुमच्या किरणांचा प्रकाश सगळीकडे पसरला आहे.
त्याप्रमाणे माझ्या जीवनाचा प्रकाशही चारही दिशांना पसरवा आणि माझे शत्रूही माझे मित्र व्हावे. दररोज जर याप्रकारे तुम्ही सुर्यदेवांना जल अर्पण केले तर तुमची प्रगती वेगाने होईल. तुमच्या प्रगतीची सगळीकडे वाह वाह होईल व तुमचे शत्रूही तुमचे मित्र होतील. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो हा उपाय करा जीवनात उत्तरोत्तर प्रगती करीत राहा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.