नमस्कार मित्रांनो,
आज आपण प्रधान सेवा केंद्र श्री क्षेत्र दिंडोरी यांची माहिती घेणार आहोत. महाराजांनी इ.स. 1878 साली अक्कलकोटला लौकिक दृष्ट्या समाधी घेऊन अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणे या पृथ्वीतलावर आहेत हे तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या 22 वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छापूर्ती बरोबरच अनेक संत सिद्ध यांना विविध भागात पाठवले.
कालांतराने मानवाच्या स्खलनशील स्वभावामुळे मूळ गुरूतत्त्वाचा विचार पडला व महाराजांच्या नावाखाली स्वतःचे स्तोम माजवणे व सर्वसामान्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन पैसे कमविणे हा धंदा सुरू केला. यामुळे बहुसंख्य समाज हा धर्माविषयी उदासीन व मूळ वैदिक तत्त्वज्ञानापासून वंचित झाला. त्यामुळे कलियुगाच्या चालक-मालक पालक व संचालक असणाऱ्या दत्त महाराज म्हणजेच स्वामी महाराजांनी मूळ गुरूप्रणित तत्त्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्व मानवासाठी उपलब्ध व्हावे म्हणून ब्रह्मीभूत पिठली महाराजांचे इ.स. 1878 ते 1974 गुरुपद घेऊन त्यांच्याकडून दीर्घकाळ हिमालय काळ त्रंबकेश्वर व नाशिक येथे विविध उपासना तपस्या करून घेतल्या.
पुढील कार्य नियोजनासाठी आज्ञा दिली. ब्रम्हीभूत पिठली महाराजांनी सदगुरु मोरेदादा इ.स. 1922 ते 1988 यांचे गुरुपद घेऊन स्वामी महाराजांच्या वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली. सद्गुरु मोरेदादा मुळ गुरुप्रणित तत्त्वज्ञान काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्वसामान्यापर्यंत पोहचवले. म्हणजेच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा व आ ध्या त्मि क विकास मार्ग होईल. गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे.
आज परमपूज्य गुरुमाऊलींचे रूपाने महाराजच कार्यरत आहे अशाप्रकारे तेज तत्त्वाची मूळ प्रेरणा लाभलेला श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग तेजाकडून तेजाकडेच वाटचाल करत आहे श्री स्वामी समर्थ सेवा व आ ध्या त्मि क विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित या नावाने कार्यरत असणारी सेवा केंद्रे जनहित, राष्ट्रहित देशहित व विज्ञानाला सामोरे जाउन विविध कार्य करीत आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्तीज्ञान, वैराग्य, नाम, जप, तप, यज्ञ आणि सेवा त्याच्या अनुषंगाने कार्य करीत आहे.
मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन करून समस्या सोडवित आहेत. सेवेकर्यांनी पाळावयाचे आचारसंहिता श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे कर्मश: 3 अध्याय वाचावे. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आपण जे जे जेवू-खाऊ ते तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे. सकाळी उठतांना, रात्री झोपतांना व एरवीदेखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे.
श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी. आपले आचार-विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत. मध्यमाऊस वर्ज, माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे. थोरांचा मान ठेवावा सर्वांची नम्र भावाने वागावे. सद्गुरु प्रणित मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे.
श्री कुलदेवतेच्या रोज स्मरण नमन करावे. कुलाचार पाळावेत, रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा दर्शनास जातांना हार, फुले, उदबत्ती, श्रीफळ व प्रसाद ठेऊन यथाविधी दर्शन घ्यावे. उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्यसेवा संकल्प पूर्वक असावी. श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे महत्त्व प्रारब्धाची तीव्रता कमी होते. समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते.
प्रारब्ध क्षमता वाढते. घरात सात्विकता वाढते. सांसारिक अडचणी कमी होतात. प्रेमभाव निर्माण होतो. घरात भगवंतांचा वास राहतो. काळजी मिटते, भीती जाते, संकटाला सामोरे जाता येते. तसेच स्वभावात बदल होतो. आपल्या गरजा कमी होतात. आपल्या सत्वगुणाचे जलद गतीने वृद्धी होते. सद्गुरूंचा कृपा आ शी र्वा द आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो. आणि अखंड अनुसंधनानंतर भगवंतांची भेट होते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.